बायकांचे मराठी उखाणे Ukhane Marathi

Ukhane Marathi उखाण्यांमध्ये नाव घेणे ही आपली पूर्वापार पासून चालत आलेली परंपरा. लग्न समभारंभ, गृहप्रवेश, हळदी कुंकू असो किंवा इतर कोणत्याही शुभकार्यक्रमाच्या वेळी महिलांनी त्यांच्या पतीसाठी किंवा पतीने आपल्या पत्नीसाठी नाव घेण्याची पद्धत अजूनही टिकून आहे. खाली दिलेली मराठमोळी उखाणे तुम्हाला नक्कीच आवडतील. (Haldi Kunku Ukhane).

बायकांचे मराठी उखाणे Ukhane Marathi

कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला,

****शी लग्न करून ***जन्माचा धुपला.

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर,

****चं नाव घेते ****ची लव्हर.

वन टू थ्री, वन टू थ्री,

गणपतरावांचे नाव घेते, मला करा फ्री.

श्रीकृष्णाने भगवतगीतेतून जगाला केला उपदेश

***नी माझ्या जीवनात केला २७ जून  ला  प्रवेश.

श्रीकृष्णाने लिहिली भगवतगीता

***माझे राम तर मी त्यांची सीता.

भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ

***रावांशिवाय माझे जीवन माझे व्यर्थ

कळी हसेल फुल उमललं, मोहरून येईल सुगंध,

***च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद,

मंगळसूत्राचे दोन डोरले, एक सासर अन दुसरे माहेर,

***रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

हंसराज पक्षी दिसतात हौशी,

***चे नाव घेते सत्यनारायण दिवशी.

सुखद वाटते हिवाळ्यातले ऊन,

***रावांचे नाव घेते***ची सून.

भाजीत भाजी पालक,

***माझी मालकीन अन मी मालक.

बारीक मणी घरभर पसरले,

***साठी माहेर विसरले.

निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट,

***रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.

पाव शेर रवा, पावशेर खवा,

***चे नाव घेते हजार रुपये ठेवा.

तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून मी सप्तपदी चालले,

आणि ***नाथा मी तुझीच जाहले.

पाव शेर रवा, पाव शेर खवा,

***चे नाव घेते हजार रुपये ठेवा.

शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ती पेक्षा युक्तीने,

***रावांचं नाव घेते प्रेमा पेक्षा भक्तीने.

श्रावणात पडतात सरीवर सरी,

***रावांचे नाव घेते ***ही बावरी.

चांदीच्या ताटात गाजराचा हलवा,

***रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा.

हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे,

***चे नाव घेते सत्यनारायण पुढे.

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट,

***चे नाव घेते सोडा माझी वाट.

मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा,

***रावांना घास घालते श्रीखंडपुरीचा.

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न,

***च्या सोबत झाले आताच माझे लग्न.

नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती,

***ची झाले आज मी सौभाग्यवती.

पाच बोटातून होते कलेची निर्मिती,

***ची आणि माझी जडली प्रीत.

संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले,

प्रत्यक्षात ***चे आज मी जीवनसाथी झाले.

मंगळसूत्राच्या दोन वाट्या, एक माहेरची एक सासरची खूण,

***आर्धागिनी जाहले, भाग्य कुठले याहून.

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मी सुबक मेंदी,

***चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

एक तीळ सातजण खाई,

***ना जन्म देणारी धन्य ती आई.

वर्षाकाठचे महिने बारा,

***या नावात सामावलाय आनंद सारा.

मुर्तीकाराने घडवली सुंदर मूर्ती,

***रावांची वाढो सर्वदूर किर्ती.

जाईच्या वेलीला आलाय बहार,

***ना घातला २५ जानेवारीला हार.

फुलासंगे मातीस सुवास लागे,

***नि माझे जन्मोजन्मीचे धागे.

पाणीपुरी खाताना लागतो जोरदार ठसका,

***ला आवडते बिस्कीट ब्रिटानिया मस्का-चस्का.

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

• मराठी उखाणे नवरीसाठी Marathi Ukhane for Female

• मराठी उखाणे नवरदेवासाठी Ukhane Marathi Male

• उखाणे मराठी कॉमेडी Funny Marathi Ukhane

Enjoyed this article? Share it!

Marahti Moral
Written By

Marahti Moral

107 Articles

This author has not yet added a bio.