Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करुन विधिशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, दलित, शोषित, पिडित लोकांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे, एक खंबीर पत्रकार, एक शिक्षण संस्थापक, दलितोध्दारक, ग्रंथवेडे व्यक्तीमत्व.  स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय या चार आधारभूत तत्वांचे पुरस्कर्ते म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

Dr Babasaheb Ambedkar information in marathi । Dr Babasaheb Ambedkar photos । Babasaheb Ambedkar birth place । Dr Babasaheb Ambedkar death date । Dr Babasaheb Ambedkar father name । babasaheb Ambedkar quotes in marathi Dr Babasaheb Ambedkar speech in marathi । Dr Babasaheb Ambedkar in marathi । बाबासाहेब आंबेडकर इतिहास । डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती । डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी pdf । डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य । डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध । डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे

खरोखर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक महान विचार आहे. एक दलितांची, शोषीतांची अस्मीता आहे. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाने, अभ्यासाने हजारो वर्षे गुलामगीरित पडलेल्या लोकांना गुलामगीरिविरुध्द लढण्याची हिम्मत दिली. त्यांचे विचार म्हणजे परीवर्तनवादी धगधगता ज्वालामुखीच अशा या महामानवाचे सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार पुढीलप्रमाणे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. (Dr Babasaheb Ambedkar in Marathi). 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, कुशाग्र बुद्धीमत्ता लाभलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी होते. त्यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश देऊन प्रकाशात आणले.

१४ एप्रिल, १८९१ मध्ये मध्य प्रदेश मधील सागर जिल्हयातील महु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. (Dr. Babasaheb Ambedkar Birth Place) त्यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ लष्करी शाळेत शिक्षक होते. (Dr Babasaheb Ambedkar Father Name) त्यांच्या आईचे नाव भीमाबाई रामजी सकपाळ होते. लहानपणीच आई वारल्याने विशेष असे मातृप्रेम त्यांना मिळाले नाही. त्यांचे शिक्षण महाराष्ट्रातील सातारा व दापोली येथे झाले.

बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असताना त्यांचे वडील रामजी सकपाळ यांनी सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कुल मध्ये 'आंबडवेकर' असे आडनाव ७ नोव्हेंबर, १९०० रोजी नोंदवले. अशा रितीने सपकाळ, आंबडवेकर व नंतर  आंबेडकर असे टप्या टप्प्याने बाबासाहेबांचे आडनाव बदलले. सातारा व मुंबई येथे शिक्षण घेताना अपमानास्पद वागणूक मिळाली त्यामुळे भिमरावांना अस्पृश्यतेच्या कलाकंची तीव्र जाणीव होऊ लागली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत 4 वर्षे राहिले. त्यांना उत्तम प्राध्यापकांचे मार्गदर्शनही लाभले. त्यांनी नवा देश पाहिला, नवी संस्कृती पाहिली नवे ज्ञान अनुभवले, माणसा - माणसातील संबंधाची जाण त्यांना आली. भेदभावाची कृत्रिम बंधने नसलेला मुक्त समाज त्यांनी पाहिला. नवे जग पाहून ते भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न करण्याचे ठरविले . शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, याची त्यांना खात्री पटली. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानव वंश शास्त्र,  कायदा इत्यादी विविध शास्त्रांचा अभ्यास केलेला व त्या विषयात पारंगत असलेला शिवाय सामाजिक बांधिलकी मानणारा नेता त्यावेळी दुसरा कोणी नव्हता. त्यांना पर्शियन, संस्कृत, फ्रेंच आणि जर्मन हया परदेशी भाषेचेही त्यांना चांगले ज्ञान होते.

- १९०७ साली ते मॅट्रीक झाले. 

- १९१५ मध्ये एम.ए.झाले.

- १९१६ साली पी. एचडी झाले. 

- १९१८ मध्ये सिडनहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर झाले. 

- १९२२ साली बॅरिस्टर परीक्षा पास झाले.

१९२३ मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स ची पदवी मिळवली. 'रूपयाचा प्रश्न' हा प्रबंध लिहून लंडन विद्यापीठाची ' डीएससी ' ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवली.

बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांच्या शिक्षणास चालना मिळाली. १९२३ मध्ये ते बॅरिस्टर झाल्यानंतर ते मुंबईत आले व वकिली करू लागले. पण अस्पृश्यतेमुळे त्यांची वकिली चालू शकली नाही पण ते निष्णात वकिल होते. त्यांनी दलितोध्दाराचे काम सुरू केले.

त्यांचे आयुष्य तीन गुरूंनी घडले. ते बुध्द, संत कबीर, महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहु महाराज यांना आपले गुरू मानत असत. 6 डिसेंबर, 1956 साली दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. (Dr Babasaheb Ambedkar Death Date).

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य

भारतात प्राचीन काळापासून हिंदू समाजात जातीय व्यवस्थेची प्रथा अस्तित्वात होती. यामुळे भारतीय समाजात विषमतेचे वातावरण होते. या जातीयसंस्थेविरूध्द कृती व विचाराचे बंड पुकारण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. मानवी हक्क मिळवण्यासाठी व दलीत समाजाच्या विकासासाठी झगडणारे ते एक झुंजार नेते होते. प्रसिध्द कायदेपंडित, घटनातज्ञ, राजकारणधुरंधर, दलितांचे उध्दारकर्ते म्हणुन डॉ. आंबेडकरांचा लौकिक आहे. त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार मानले जाते.

Dr Babasaheb Ambedkar information in marathi । Dr Babasaheb Ambedkar photos । Babasaheb Ambedkar birth place । Dr Babasaheb Ambedkar death date । Dr Babasaheb Ambedkar father name । babasaheb Ambedkar quotes in marathi Dr Babasaheb Ambedkar speech in marathi । Dr Babasaheb Ambedkar in marathi । बाबासाहेब आंबेडकर इतिहास । डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती । डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी pdf । डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य । डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध । डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे

डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्मातील उच्च निच्चता,  जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था यांचा अभ्यास करून हिंदू धर्म अस्पृश्यांना कसा हीन लेखतो हे स्पष्ट करून अस्पृश्यविरुद्ध  लढा पुकारला. दलितांना वर्णव्यवस्थेतून मुक्त करून त्यांना  त्यांना समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय बहाल करून त्यांना मोकळ्या वातावरणात आणण्यासाठी कार्य केले. त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. महाडपासून त्यांनी या संघर्षाची सुरुवात केली. 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कुलाबा जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर हजारो लोकांच्या उपस्थित सत्याग्रह केला हा सत्याग्रह पाण्यासाठी नसून सामाजिक समतेसाठी होता.

हिंदु लोक अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरीतला व पानवटे यावर पाणी भरू देत नसत. या अमानवी प्रथम युद्ध आणि हिंदूंची मक्तेदारी मोडण्यासाठी सत्याग्रह होता. या काळात हिंदूंच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. हिंदूंच्या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी नाशिक येथे काळा राम मंदिर येथे सत्याग्रह केला. तसेच, पुण्यातील पर्वती येथेही मंदिर करण्यासाठी सत्याग्रह केला असून त्यांची सामाजिक आर्थिक शैक्षणिक सुधारणा करून त्यांना नागरी हक्क द्यावेत म्हणजे सर्व हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपोआप परिवर्तन होईल अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी होती. (Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi).

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य


शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे, असे डॉ. आंबेडकर यांना वाटत असे. जो समाज अशिक्षित असतो तो शिक्षणाअभावी सर्वस्व गमावलेला असतो. शिक्षणाने माणसात कर्तव्य आणि हक्काची जाणीव निर्माण होते. समाजाच्या सर्व स्तरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे आणि आपल्या शिक्षणापासून वंचित समाजाला शिक्षणाचे महत्व अत्यंत सोप्या भाषेत आणि कळकळीने समजावून सांगतांना बाबासाहेब म्हणत, “ शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

Dr Babasaheb Ambedkar information in marathi । Dr Babasaheb Ambedkar photos । Babasaheb Ambedkar birth place । Dr Babasaheb Ambedkar death date । Dr Babasaheb Ambedkar father name । babasaheb Ambedkar quotes in marathi Dr Babasaheb Ambedkar speech in marathi । Dr Babasaheb Ambedkar in marathi । बाबासाहेब आंबेडकर इतिहास । डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती । डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी pdf । डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य । डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध । डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे

केवळ बाराखड्या शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर मुलांची मने सुसंस्कृत करणारे दर्जेदार शिक्षण शाळांनी दिले पाहिजे. इतका सूक्ष्म विचार बाबासाहेबांनी शिक्षणाबाबत केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार हा सर्वांगिण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. असे त्यांचे मत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्रीशिक्षण

स्त्री स्वातंत्र्याचे कैवारी असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आबेडकर या महामानवाला कळुन चुकले की, कोणत्याही समाजाची उन्नती करावयाची असेल, तर त्या समाजात शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होणे आवश्यक आहे. अर्थात  शिक्षणाचा हा सार्वत्रिक प्रसार केवळ पुरूषांतच होऊन चालणार नाही, तर तो स्त्रियांतही होणे आवश्यक आहे. कोणत्याही समाजातील स्त्रीचा दर्जा हा त्या समाजाच्या सुधारणेचा मापदंड असतो, म्हणुनच दलित समाजपरिवर्तनाचे वेध लागलेल्या बाबसाहेबांनी स्त्री - स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना अनेक सभा - संमेलतातून, परिषदातून, विशेषत: महिला परिसंवादातून, तसेच आपल्या लिखाणातून, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातुन, राज्य घटनेतून स्त्रीपुरूष समानतेचा पुरस्कार करून स्त्री शिक्षणावर प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष भर दिला आणि मुंबई,  औरंगाबाद, पंढरपूर येथे तर शिक्षणसंस्था व वसतिगृहांची स्थापना करून आपले स्त्रीशिक्षण विषयक स्वप्न साध्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कृतीतून दलित समाजाच्या उन्नतीचा आणि स्त्री शिक्षणाचा अन्योन्यसंबंध त्याना अभिप्रेत होता, ही गोष्ट स्पष्ट होते. (Dr Babasaheb Ambedkar in Marathi).

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानात केलेल्या काही महत्वाच्या शैक्षणिक तरतुदी

• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानात केलेल्या शैक्षणिक तरतूदी 281 नुसार राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही.

• राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरीकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही.

• धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याच्या व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल.

• शैक्षणिक संस्थांना सहाय देताना राज्य, एखादी शैक्षणिक संस्थाही, धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे. या कारणावरून तिला प्रतिकुल होईल, अशाप्रकारे भेदभाव करणार नाही.

• राज्य हे आपली आर्थिक समता व विकास यांच्या मर्यादेत कामाचा शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, आजार व विकलांगता यांनी पीडीत अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हलाखीचे जिणे ज्यांच्या वाट्याला आले आहे. अशा अन्य व्यक्तींच्या बाबतीत लोकसहायाचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करील.

• राज्य हे बालकांचे वय सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील. 

• राज्य, जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील, आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण करील.

• जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली पुस्तकांची नावे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन एका उफाळलेल्या महासागरासारखे होते. आपल्या हयातील त्यांनी अनेक ग्रंथ  लेख लिहून ठेवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य खूप विपुल आहे. त्यांच्या साहित्यात ग्रंथ पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, पत्रे, वर्तमानपत्रे, यांचा समावेश होतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बहुतेकसे लिखाण हे इंग्रजी, मराठी आणि इतर भाषेतील आहे. त्यांनी लिहलेल्या लिखाणाची संक्षिप्त यादी खालीलप्रमाणे:

• Administration and Finance of the East India Company (ईस्ट इंडिया कंपनी प्रशासक आणि अर्थनीती)

• Castes in India: Their Machanism, Genesis and Development ( भारतातील जातिसंस्था तिची यंत्रणा उत्पत्ती आणि विकास)

• The National Dividend of India a Historical and Analytical Study (ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती)

• Federation Versus Freedom (संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य)

• The Problem of the Rupee – Its Origin and its Solution(रुपयाचा प्रश्न – उद्गम आणि उपाय)

• Pakistan or The Partition of India (पाकिस्तान अथवा भारताची फाळणी)

• Annihilation  of Castes (जातीचे निर्मूलन)

• Ranade,  Gandhi And Jinnah  (रानडे गांधी आणि जिन्ना)

• Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables (गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती)

• Communal Deadlock and a way to Solve it (जातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग)

• What Congress and Gandhi have done to the Untouchables (काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?

• States and Minorities- What are their rights and how to secure them in the constitution Free India (संस्थाने आणि अल्पसंख्याक)

• Maharashtra as a Linguistic Province (महाराष्ट्र – एक भाषिक प्रांत)

• The rise and fall of Hindu Women (हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती)

• Who were the Shudras? (शुद्र पूर्वी कोण होते?)

• The Riddles in Hinduism (हिंदू धर्मातील कोडे)

• Thoughts on Linguistic States (भाषिक राज्यासंबंधी विचार)

• The Pali Grammar, Dictionary and Bouddha Pooja Patha (पाली व्याकरण, शब्दकोश आणि बौद्ध पुजापाठ)

• Revolution and Counter Revolution (क्रांती आणि प्रतिक्रांती)

• Buddhism and Communism (बौद्धधम्म आणि साम्यवाद)

• The Buddha and His Dhamma (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म).

(Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi)