Funny Marathi Ukhane एखाद्या प्रसंगी विनोदी उखाणे, हसायचे, टाईमपास किंवा कॉमेडी उखाणे नवरा-नवरीकडून, करवली किंवा इतर कोणाकडूनही घेतले जातात. आपल्या जोडीदाराची खोचक थट्टा मस्करी करणे किंवा एखादा सोज्वळ टोमणा मारणे हाच त्यामागील मुख्य हेतू असतो. लग्नात मानपानाच्या प्रसंगी थट्टामस्करी करताना विनोदी उखाण्यांचा उपयोग केला जातो. विनोदी उखाण्यात मनोरंजाचा खजिना साठवलेला असतो. (Funny Ukhane).
उखाणे मराठी कॉमेडी For Female
*** रावांची थोरवी मी सांगत नाही,
कितीही प्यायले तरीही ते कधीही झिंगत नाहीत.
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव,
*** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव.
सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून,
*** रावांचे नाव घेते पाच गडी राखून.
पावाबरोबर खाल्ले अमूल बटर,
*** रावांचे नाव घ्यायला अडलय माझे खेटर.
एक होती चिऊ, एक होती काऊ,
*** रावांचे नाव घेते, डोके नका खाऊ.
इवले इवले हरीण, त्याचे इवले इवले पाय,
*** राव आले नाहीत अजून,
पिऊन पडले की काय?
एक होती चिऊ, एक होती काऊ,
गणपत रावांचा नाव घेते, डोकं नका खाऊ.
चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे,
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे.
बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या,
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या.
लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास.
रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल,
गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.
समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,
गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू.
बदामाचा केला हलवा, त्यात काजू टाकले किसून,
गणपतराव आमचे बिड्या पितात संडासात बसून.
मोबाईलवर एफ.एम ऐकते कानात हेडफोन टाकून,
आणि गणपतरावांना मिस कॉल देते एक रुपया बॅलन्स राखून.
शिडीवर शीडी बत्तीस शिडी,
गणपतराव ओढतात विडी नि मी लावते काडी.
तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
शंकररावांशी करून लग्न करून लावली आयुष्याची वाट.
रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
गणपतराव आहेत सुंदर पण डोक्याला टक्कल.
तळ्यातल्या चिखलात लाल लाल कमळ उमळले,
गणपतराव खड्ड्यात पडले त्याला दुसऱ्याने काढले.
मांडवाच्या दारी पडलं टिपरं,
वाहिनीबाईला झालं पोर झिपरं.
वाकडी तिकडी बाभूळ तिच्यावर बसला होला,
सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला.
विनोदी उखाणे पुरुषांसाठी
अंगणात पेरले पोतेभर गहू,
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ.
कंप्युटरला असते फ्लॉपी डिस्क,
***हिच्याशी लग्न करून मी घेतलीय मोठी रिस्क.
कपावर कप सात कप, त्यावर ठेवली बशी,
माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी.
चांदीच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ?
वाचकमित्रहो, वरीलप्रमाणे दिलेली विनोदी पुरुषांची आणि महिलांसाठीची उखाणे तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे. आपली प्रतिक्रिया देऊन अवश्य कळवा. (उखाणे मराठी कॉमेडी Funny Marathi Ukhane).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• बायकांचे मराठी उखाणे Ukhane Marathi
0 टिप्पण्या