Ukhane Marathi for Female धार्मिक कार्यात उखाणे घेण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. धार्मिक शुभकार्यात किंवा सणासुदीला रचून म्हटलेल्या ठुमकेदार तुकड्यास 'उखाणे' असे म्हणतात. सुदैवाने उखाणा हा प्रकार आजही टिकून आहे. उखण्यामध्ये ज्ञान, मनोरंजन आणि विनोदाची खाण खचाखच भरलेली आहे. विशेषतः स्त्रीजीवनाशी निगडित असलेला उखाणा स्त्रियांच्या मनातील भावना मोकळी करण्याचं प्रभावी माध्यम आहे. (Ukhane Marathi).
झिम्मा-फुगडी, कोंबडी-पिंगा, लग्नातील उखाणे, मंगळागौर उखाणे, संक्रात उखाणे , दिवाळी उखाणे, हळदी कुंकू उखाणे म्हणा किंवा कोणत्याही धार्मिक शुभकार्यात उखाणेची महफिल जमल्याशिवाय त्या कार्याला रंगत येत नाही. नवीन नवरीला उखाणे घेण्यासाठी गृहप्रवेशच्या दिवशी अडवले जाते हा जणू नियमच झाला. नवरीने नाव घेतल्यावर नवरदेवासही उखाण्यामध्ये नाव घेण्यासाठी आग्रह धरला जातो. जोडीदाराला चिडवणे, थट्टा मस्करी करणे, खोचक टोमणे मारणे, कॉमेडी/विनोदी उखाणे, उखाण्यामध्ये सवाल- जवाब करणे किंवा आपल्या जोडीदाराबद्दल आदर व्यक्त करणे हाच प्रांजल हेतू उखाणे घेण्यामागे दडलेला असतो. (मराठी उखाणे नवरीसाठी).
Ukhane Marathi for Female
अंबाबाईच्या देवळात सोन्याचा कळस,
*** चं नाव घ्यायला मला नाही आळस.
गणपतरावांचा आणि माझा संसार होईल सुखकर,
जेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर.
चंदेरी चोळीला सोनेरी बटन,
गणपतरावांना आवडते तंदुरी चिकन.
सर्व देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्म, विष्णू-महेश,
***रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.
पांडुरंग माझे गुरु प्रमोदिनी माझी विठाई,
***बाळाची झाले मी गं आई.
रामाने आणले रामफळ सितेने आणले सीताफळ,
लक्ष्मणने आणले चुडे, ****नाव घेते सर्वांच्या पुढे.
काढणीत काढणी तुरीची,
अवघड पायरी विहिरीची,
भाकरी घेऊन न्याहरीची,
***ला चोळी शिवतो जरीची.
कोऱ्या घागरीत लिंबाचा खार,
***च्या गळ्यात मोत्याचा हार.
वेरूळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,
***च्या साथीने संसाररूपी मंदिर.
चांदीच्या ताटात लाडू भरले काठोकाठ,
***राव बसले जेवायला समया लावल्या तीनशेसाठ.
सागराला आली भरती, नदीला आला पूर,
***रावांच्या प्रेमासाठी आईवडील केले दूर.
मराठी उखाणे नवरी साठी 2022
राजा हरीशचंद्र रोहिदास पुत्र,
***च्या गळ्यात बांधले मंगळसूत्र.
यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो पावा,
***रावांचे नाव घेते तुमचा आशीर्वाद हवा.
महादेवाच्या पिंडीवर वाहते जवस,
***रावांचे नाव घेते संक्रातीचा दिवस.
विदर्भात आहे झाडी दाट, कोकणात पिकतो भात,
***च्या संगतीत दिवस जातो आनंदात.
अलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका.
दासांचा दासबोध अनुभवाचा साठा,
***चे नाव घेते तुमचा मान मोठा.
संसाररुपी सागरात पतिपत्नींची नौका,
***चे नाव घेते सर्वजण ऐका.
शुभवेळी शुभ दिनी आली आमची वरात,
***रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात.
जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते
सगळ्यांचा मान राखून नाव *** घेते.
जशी आकाशात चंद्राची कोर,
***पती मिळायला माझे नशीब थोर.
एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,
अशीच राहू दे माझी आणि ***रावांची प्रेम ज्योती.
भाव तेथे शब्द, शब्द तेथे कविता
***चे नाव घेते तुमच्या आग्रहा करिता.
रुसलेल्या राधेला कान्हा म्हणतो हास,
***रावांना भरवते ****चा घास.
श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य,
***आणि माझ्या संसारात होईल तुम्हा सगळ्यांचे आदरातिथ्य.
सोन्याचे दागिने सोनाराने बनविले,
***रावांचे नाव घेण्यासाठी तुम्हा सर्वांनी अडविले.
आजच्या सोहळ्याचा थाट केलाय खास,
***ला भरविते जिलेबीचा घास.
निळ्या निळ्या आकाशात शोभून दिसतात चंद्र-तारे,
***रावांच्या संगतीने उजळले माझे जीवन सारे.
महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून,
***रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.
बायकांचे मराठी उखाणे
काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून,
***रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.
मंद वाहे वारा, संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो *** ची जोडी.
आंब्यात आंबा हापूस आंबा,
***चे नाव घेते तुम्ही थोडं थांबा.
पुरणपोळी, वरण, साजूक तूप भातात,
***च्या आवडीचे पदार्थ वाढले चांदीच्या ताटात.
गजाननाच्या मंदिरात संगीताची गोडी,
सुखी ठेव गजानना ***ची जोडी.
जाईजुईचा वेल पसरला दाट,
***बरोबर बांधिली जीवनाची गाठ.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
***रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.
साता जन्माच्या जुळल्या गाठी,
***रावांचे नाव घेते चालताना सप्तपदी.
राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा,
***नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा.
सांजवात लावताना येते माहेरची आठवण,
***रावांसाठी झाली सासरी पाठवण.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
***चे नाव घेते पत्नी या नात्याने.
अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात,
भातावर वरण, वरणावर तूप,
तुपासारखे रूप, रूप सारखा जोडा,
***रावांचे नाव घेते वाट माझी सोडा.
जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी,
***रावांची आहे मी अर्धांगिनी.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
***चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
मुंबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका,
***चे नाव घेते *** ची बालिका.
नाशिकची द्राक्षे, गोव्याचे काजू,
***चे नाव घ्यायला मी कशाला लाजू.
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा,
***च नाव आहे लाख रुपये तोळा.
चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप,
***रावां समवेत ओलांडते माप.
पाव शेर रवा, पाव शेर खवा,
***चे नाव घेते, हजार रुपये ठेवा.
दही, साखर, तूप
***राव मला आवडतात खूप.
कामाची सुरवात होते श्रीगणेशापासून,
***रावांचे नाव घ्यायला सुरवात केली आजपासून.
मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ,
*** मुळेच माझ्या जीवनाला अर्थ.
मनी असे ते स्वप्नी दिसे,
ओठी मी हे आणू कसे,
*** माझी नववधू शब्दात हे सांगू कसे.
सुपभर सुपारी निवडू कशी,
गळ्यात माळ वाकू कशी.
पायात पैंजण घालू कशी,
*** बसले मित्रांपाशी,
कपाटाची चावी मागू कशी.
इंग्लिशमध्ये पाण्याला म्हणतात वॉटर,
*** रावांचे नाव घेते***ची सिस्टर.
साडीत साडी परागची साडी,
***रावांना बाबांनी दिली मारुतीची गाडी.
जेथे सुख, शांती, समाधान तेथे लक्ष्मीचा वास,
***रावांना भरविते श्रीखंडाचा घास.
हिरव्या शालूला जरीचे काठ,
***चे नाव घेते सोडा माझी वाट.
लग्नात लागतात हार आणि तुरे,
***च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
कलियुगात घडलाय यांच्या रूपाने चमत्कार,
***रावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार.
आजच्या सोहळ्यात थाट केलाय खास,
***ला भरविते जिलेबीचा घास.
कळी हसेल फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
***च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.
वाचकमित्रहो, तुम्हाला हे मराठमोळे उखाणे आवडले असतील तर नक्कीच प्रतिक्रिया देऊन कळवा. (Ukhane Marathi).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• मराठी उखाणे नवरदेवासाठी Ukhane Marathi Male
0 टिप्पण्या