Happy Birthday Wishes for best Friend Marathi text प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनेक नाती असतात त्या नात्यातील अनेक नाती जीवापलीकडे जपलेली असतात. अशाच एका नात्यातील एक सुंदर नातं म्हणजे मैत्रीचं नातं. आयुष्यात चांगले मित्र मिळण्यासारखं दुसरं भाग्य नाही. कारण चांगले मित्र तुम्हाला कधीच एकटं सोडत नाहीत. तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट काळात ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.
ज्याच्या स्वभावात मैत्री असते तो कोणतंही नातं टिकवू शकतो. अशा या मैत्रीपूर्ण स्वभाव असलेल्या व्यक्तींबरोबर आपण मैत्रीचे नातं जोडतो. अशा या नात्यात जेव्हा मैत्रीसह प्रेम, काळजी व आपुलकीची भावना निर्माण होते तेव्हा ते नातं अधिक घट्ट होतं. (Birthday wishes for friend in marathi).
मैत्रीत कुठलीच बंधनं नसतात. मैत्रीच्या नात्यात जे स्वातंत्र्य असतं ते इतर कुठल्याही नात्यात नसतं. एकमेकांवर असलेला विश्वास, आपलेपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकटकाळी नेहमीच साथसोबत करण्याच्या जिद्दीतून हे नातं अधिक दृढ होत जातं. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर, कुणाच्याही रुपात आपल्याला जीवाभावाचा मित्र/मैत्रिण भेटू शकते. मैत्रीला वय, वेळ, समाज कशाचंही बंधन नसल्यानं लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत कुणासोबतही मैत्रीची नाळ जोडली जाऊ शकते. मग ते आई-वडील असाेत, स्वत:ची मुलं असोत, बायको, बहीण, नवरा असो की कुणी अनोळखी व्यक्ती. कुणासोबतही मैत्रीच्या भावविश्वात आपण रममाण होऊ शकतो.
अशा या जिवलग असेलेल्या मित्राला त्याच्या वाढदिवसाच्या दिवसाची आपण सगळेजणच आतुरतेने वाट पाहत असतो. या विशेष दिवशी त्याला शुभेच्छा देऊन त्याच्या प्रति असलेलं आपलं प्रेम व्यक्त करण्याची, आभार दर्शविण्याची संधी असते. असेच काही खालीलप्रमाणे दिलेले मित्रासाठी निवडक वाढदिवस शुभेच्छा संदेश तुम्हाला नक्कीच आवडतील अशी अशा आहे. (In Marathi Happy Birthday Wishes).
Birthday Wishes for best Friend Marathi
काही मित्र येतात आणि जातात,
मात्र जे मनात घर करून असतात,
ते शेवटपर्यंत साथ देतात,
अशा माझ्या जिवलग मित्राला,
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !
-----
मी आशा करतो की हे येणारे वर्ष
आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक
सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या मित्राच्या जिवनात
कधीही दुःख येऊ नये,
सदैव हसत खेळत सुख
आणि आंनद जीवनात नांदो.
ह्याच माझ्याकडून, या दिनी माझ्या
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
-----
मैत्री संबंध जपत भावासारखी
पाठराखण करणारा माझा सखा,
सोबती, विश्वासू, प्रेमळ,
फक्त सुखात नाही तर
माझ्या प्रत्येक अडचणीचा भागीदार,
अशा माझ्या प्रेमळ, जिवलग मित्राला
व माझ्या सख्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
-----
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत !
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा !
वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो !
प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.
-----
तु माझ्या आयुष्यात एक चांगला मित्र,
आधार आणि मार्गदर्शक आहेस.
माझ्या सर्व स्वप्नांच्या प्राप्तीसाठी
ज्या प्रकारे तु मला साथ दिली
त्याप्रमाणे मी नेहमीच तुझ्या सोबत राहीन.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
प्रत्येकाच्या जीवनात काही खास
मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा
अशा जिवाभावाच्या मित्राला
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !
-----
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तु नक्कीच माझा खास
आणि जिवाभावाचा सोबती असशील.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुझ्या सारखा मित्र माझ्या जीवनात आहे !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते.
कधीकधी धीर देणारा हात, ऐकुन घेणारे कान.
आणि समजुन घेणार्या हृदयाची गरज असते.
असाच नेहमी सुखदुःखात सावली बनून राहणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
-----
आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----
तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !
चांगल्या काळात हात धरणे
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात हात न सोडणे
म्हणजेच मैत्री होय..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..!
-----
नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
-----
झेप अशी घे की,
पहाणाऱ्यांच्या माना दुखाव्यात.
आकाशाला अशी गवसणी घाल की, पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळव की, सागर अचंबित व्हावा.
इतकी प्रगती कर की, काळ ही पाहत राहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने, ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लक्ख प्रकाश, तू चोहीकडे पसरव.
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो
या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Birthday Wishes Marathi Text
वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो !
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
-----
मी आशा करतो कि तुझा दिवस
प्रेम आणि हास्याने भरलेला जावो..
व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..
माझ्या लाडक्या मित्राला
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!
निस्वार्थ प्रेम म्हणजे मैत्री
वेळ बदलेल, दिवस बदलतील,
एक वेळ प्रेम बदलु शकते,
पण एक खरा जिवलग मित्र कधीच बदलत नाही,
माझ्या जिवा-भावाच्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----
आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो.
पण, त्यातले काही वाढदिवस
असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या
मनात घर करून बसलेल्या काही
खास माणसांचे असतात. जसा तुझा वाढदिवस!
माझ्या सर्वात जवळचा जिवलग माझं सर्व काही ...
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
-----
काही मित्र येतात आणि जातात,
मात्र जे मनात घर करून असतात,
ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात,
अश्या माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !
आयुष्यात मित्र येतील आणि जातील,
पण तु नक्कीच माझा खास
आणि जिवाभावाचा सोबती आहेस.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुझ्या सारखा मित्र माझ्या जीवनात आहेत!
प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
-----
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि
जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या
सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत!
माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
-----
प्रत्येकाच्या जिवनात काही खास मित्र असतात
त्या पैकी तू एक आहेस भावा
अशा जिवाभावाच्या मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
रक्ताच्या नात्यापलीकडे
एक मैत्रीचं नातं असतं.
सुंदर जसं वाऱ्यावर
डोलणारं गवताचं पातं असतं.
प्रिय मित्राच्या जन्मदिनी
याच मनातल्या सदिच्छ
लाख मोलाच्या मित्राला
लाख भर शुभेच्छा!.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं..
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा,
निर्णय बरोबर असो वा चुकीचा नेहमी परिस्थितीच्या,
पलीकडे जाऊन सोबत ठामपणे उभा राहणाऱ्या
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको,
तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको,
आनंदाचा झरा सदैव तुझ्या
आयुष्यात वाहत राहो. हीच माझी ईच्छा.
प्रिय मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
-----
मनातील स्वप्न पूर्ण व्हावं
आनंदी तुझं आयुष्य असावं
जेव्हा मागशील तू एक तारा
देवाने तुला सर्व आभाळ द्यावं
प्रिय मित्राला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
-----
तुझ्या स्वप्नातील जग आज सत्यात यावं,
तुझं आयुष्य आनंदाने आणि यशाने भरून जावं,
मित्राला वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा!
तुझं अख्ख आयुष्य आनंदाने, प्रेमाने
आणि यशाने भरलेलं असावं.
हिच ईश्वरचरणी प्रार्थना,
मित्रा तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
-----
आयुष्यात बऱ्याच व्यक्ती येतात
पण आपल्या संकाटाच्या काळात
आपल्याला लढण्याची प्रेरणा देऊन
आपल्या सोबत सदैव चालतात त्या विशेष असतात
आणि माझ्यासाठी तू ती व्यक्ती आहेस.
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा !
-----
आयुष्यात तुला सर्व काही मिळावं
माझ्या वाट्याचं सुखही तुझ्याकडे जावं
तुझं आयुष्य आनंदी क्षणांनी भरावं.
प्रिय मित्राला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..
वाढदिवसाच्या सुखद क्षण तुम्हाला
आनंद देत राहो या दिवसाचा
अनमोल क्षण तुमच्या हृदयात कायम राहो.
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----
नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छांनी बहरून येतात.
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हसणारी आणि हसवणारी
रडणारी आणि रडवणारी
लाडक्या मैत्रिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्रीण ही एक अशी व्यक्ती असते
जी आपल्या भूतकाळाला समजून
भविष्याचा विचार करते
वर्तमानात आपण जसे आहोत
तास विचार करते
अशीच एक मैत्रीण मला मिळाल्याबद्दल
देवाचे खूप खूप आभार!
प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मदतीला सदैव तत्पर असणारी
चांगली कामे करून लोकांच्या मनात घर करणारी
आमच्या जिवलग मैत्रिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जो जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
माझ्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात
त्या रेशीम बंधनांना मैत्रीण म्हणतात.
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
(Happy Birthday wishes in Marathi Text).
0 टिप्पण्या