Thank you for Birthday Wishes in Marathi for girl | Thank You Message For Birthday Wishes in Marathi | Thank You Message In Marathi For Birthday | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | वाढदिवस आभार संदेश फोटो | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो
आभार एक भावना आहे. प्रेम, विनम्रता, आदर, माणुसकी दर्शविणारा भाव म्हणजे आभार. आपल्या वाढदिवसाच्या शुभ दिनी आपल्या प्रियजनांकडून शुभेच्छा मिळाल्यावर चांगले वाटते. याचबरोबर त्यांचे आपल्याप्रति असणारे प्रेम दिसून येतं.
वाढदिवसाचे अगणित शुभेच्छा संदेश मिळाल्यावर सर्वात मोठा प्रश्न असतो तो त्यांच्या शुभेच्छांना प्रतिसाद म्हणून आभार व्यक्त करणे. कारण कधी कधी आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द कमी पडतात. तुमच्या प्रियजनांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्यानंतर धन्यवाद देऊन तुम्ही त्या व्यक्तीप्रति असलेला आदर व्यक्त करीत असता, तुम्ही त्या व्यक्तीचे महत्त्व ओळखता. वाढदिवस आभार कोणत्याही माध्यमाने तुम्ही व्यक्त करू शकता. पत्र, नोट, संदेश, कार्ड, ईमेल किंवा सोशल मीडिया माध्यमांचा वापर करून तुम्ही तुमच्या आभाराची भावना सांगू शकता. (वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश).
वाढदिवस शुभेच्छा आभार संदेश का द्यावेत?
• जर तुम्ही विचार करीत असला की वाढदिवसाच्या धन्यवाद शुभेच्छा का द्याव्यात?
• वाढदिवस धन्यवाद केल्यामुळे त्या व्यक्तीसह आपल्या संबंधाची वाढ होते. ह्या धन्यवादाच्या संदेशात आपण आपले प्रेम, आदर, विश्वास, आणि आणि साथ व्यक्त होत असते.
• धन्यवाद संदेश एक खास व्यक्तीला प्रसन्न करण्याची क्षमता ठेवतो.
• धन्यवाद संदेश वापरून आपल्याला व्यक्तीसह अधिक जवळ ठेवायला मदत होते. विशेषतः, ती व्यक्ती जीवनात आपल्या जीवनात विशेष महत्वाची आहे किंवा आपल्यासह असलेल्या संबंधाची दृढता आणि मनोभावाला वाढवायला मदत करते.
• धन्यवाद संदेश दिल्यामुळे त्यांच्या जीवनात एक अविस्मरणीय आठवण होते आणि आपल्या निकटच्या संबंधांचं मोठं महत्व प्राप्त होते.
या पोस्टमध्ये दिलेले वाढदिवस आभार संदेश तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे. Thanks for birthday wishes in marathi (आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद).
Thank You Message For Birthday Wishes in Marathi
मानू कसे आभार तुमचे?
खरंच आज कळत नाही
तुमच्यासाठी तालामोलाचे
शब्द काही मिळत नाहीत.
मनापासून धन्यवाद..!
सदैव राहू द्या आशीर्वादाची
थाप आमच्या पाठी,
काळजातले दोन शब्द
तुमच्या आभारासाठी !
अखंड राहील शिरावर
आपल्या उपकरांचा भार,
शब्दातून व्यक्त करतो
तुमचे मनःपूर्वक आभार !
शब्दातूनी कसे
आभार व्यक्त करावे तुमचे,
तुमच्या विषयीच्या आदराने
मन भरून आले आमचे.
धन्यवाद..!
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा
माझ्यासाठी लाख मोलाच्या आहेत.
असेच तुमचे प्रेम माझ्यावर सदैव राहुद्या
ही ईश्वर चरणी प्रार्थना!
धन्यवाद!
माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी विविध
माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
सदभावना व्यक्त केली त्या सर्व शुभेच्छांचा
मनापासून स्वीकार करतो...!
धन्यवाद!
आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या
शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस
खूपच आनंददायक बनला आहे.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.
धन्यवाद!
Thank You For Birthday Wishes in Marathi
तुम्हा सर्वांच्या प्रेमळ शुभेच्छा
वाढदिवसाचा केक आणि मिठाई पेक्षाही
अधिक मधुर आणि गोड आहेत.
धन्यवाद!
माझा वाढदिवस खरं तर,
वर्षातून एक दिवस साजरा करता येईल.
पण, आपण सर्वांनी दिलेल्या
अनमोल व अगणित शुभेच्छा.
आयुष्याच्या वेलीवर आणि मनाच्या पानावर
कायमस्वरूपी कोरल्या जातील.
धन्यवाद..!
मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण मला प्रत्यक्ष भेटून,
भ्रमणध्वनीद्वारे, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया,
इत्यादी माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा बद्दल
मी आपला अत्यंत आभारी आहे.
येणाऱ्या काळामध्ये आपल्या शुभेच्छा
आणि शुभ आशिर्वाद माझ्यासाठी
नक्कीच प्रेरणादायी असतील..
धन्यवाद..!
सर्वांचे मनापासून आभार..!
तुमचे प्रेम, तुमच्या शुभेच्छा मला
नेहमीच प्रेरणा आणि बळ देतात.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
मला शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी
आपला मनापासून आभारी आहे.
अशीच साथ आणि आपला आशीर्वाद
माझ्यासोबत सदैव राहो ही सदिच्छा..!
मनःपूर्वक धन्यवाद...!
दर वर्षी वाढदिवस येतो आणि वय वाढवून जातो.
वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी देऊन जातो.
आपण वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा
ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पूरक ठरतात
आणि ही आपली माणसं आपल्यासोबत
आहेत ह्याची जाणीव करून देतात!
आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल पुनः एकदा मनापासून आभार !
मनःपूर्वक आभार आपण सर्वांनी दिलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल मी
आपला मनःपूर्वक आभारी आहे...
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा.
हीच ईश्वरचणी प्रार्थना धन्यवाद.! मनःपूर्वक आभार !
आपण मला वाढदिवसानिमित्त विविध
माध्यमातून फोन द्वारे, सोशल मीडिया द्वारे,
वेळात वेळ काढून ज्या शुभेच्छा दिल्या
त्या बद्दल मी आपला मनापासून आभार मानतो
व असेच प्रेम, आपुलकी, आशीर्वाद
आपल्याकडून मिळत राहो हीच अपेक्षा....
धन्यवाद!
तुमच्या मनस्वी प्रेमाने व निर्मळ मैत्रीने
मी तर खरोखर भारावून गेलो आहे .
तुम्ही मला सोशियल मीडिया द्वारे तसेच कॉलद्वारे
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
बद्दल मी सर्वांचा मनापासून खूप ऋणी आहे.
काहींना चुकून धन्यवाद करण्याचे राहून गेले
असेल तर त्यांनी कृपया राग मानू नये .
ज्या मित्रांनी शुभेच्छा दिल्या
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
तुम्हा सर्वांचे हे प्रेमाचे व मैत्रीचे
ऋण मी कधीच फेडू शकणार नाही
आपले प्रेम सदैव असेच राहो.
Thank You For Birthday Wishes In Marathi
ह्या धावपळीच्या युगात आठवणीने
शुभेच्छा दिल्याबद्दल आपले शतशः आभार …!
आपल्या मैत्रीच्या प्रेमाचा हात ह्या
पुढे हि सदैव पाठीशी राहो हीच प्रेमळ अपेक्षा …!!
माझ्या वाढदिवसा निमित्त
आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी आपला आभारी आहे .
पुढील काळात असेच प्रेम आपल्याकडून
मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…!
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!
शब्दात आभार व्यक्त होणे शक्य नाही
तरीही आपण दिलेल्या प्रेमळ
शुभेच्छाबद्दल आपला मनापासून आभारी आहे.
मनापासून धन्यवाद..!
असेच प्रेम व तुमची साथ
माझ्यासोबत कायमस्वरूपी राहू द्या.!
आपल्या शुभेच्छांचा प्रेमाचा
मी मनापासून स्वीकार करतो.
आपला स्नेह आदर आणि आपले
ऋणानुबंध जपण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन.
आपण आपले प्रेम
या पुढे ही असेच राहुदे,
हीच माझी ईश्वरा कडे मागणी राहील.
निश्चितच आपल्या शुभेच्छा मला या
पुढील आयुष्या साठी प्रेरणादाई राहतील.
धन्यवाद!
कोणी विचारले काय कमावले?
तर मी अभिमानाने सांगेन कि
तुमच्यासारखी जीवा भावाची माणसं कमावली.
आभार!
मानतो आभार मनापासून
साथ शुभेच्छांची अशीच राहू द्या !
या ऋणानुबंधांनी जुळलेल्या मनात
आपुलकीचे भाव कायम असू द्या!
धन्यवाद ..!
आपल्या नात्याला नाव जरी नसलं तरी
ते रक्ताच्या नात्यालाही पुरून उरतं.
आणि मग कितीही घाव होऊ द्यात यातनांचे,
तुमच्यामुळेच दुःख माझं हळूहळू मागे सरतं.
आज तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे मला नेहमी प्रेरणा मिळेल
एवढं निश्चित.
आभार ..!
मोल आजच्या शुभ दिनाचे,
कोणत्या शब्दात मांडावे,
हर्षाने नटलेल्या प्रत्येक
क्षणांना काळजात साठवून ठेवावे.
धन्यवाद !
वाढदिवस हे निव्वळ निमित्त
खरेतर या निमित्ताने अमूल्य क्षण आठवतात
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
आणि सर्वात महत्वाचे जगण्याच्या लढाईला बळ मिळते.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा
मी हाती घेतलेल्या कार्यात मला निश्चितच मनोबल वाढवणाऱ्या आणि
प्रेरणादायी ठरणार आहेत.
आपल्या या सदिच्छांचा कसा काय उचलू भार,
काही कळेनासे झाले कसे काय मानू आभार.
धन्यवाद !
जीवनात जन्मदिवस असतोच स्मरणीय
त्यात आपल्या शुभेच्छा भेटल्या अविस्मरणीय
धन्यवाद !
वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा कशा विसरणार
आपल्या शुभेच्छांच्या जोरावर
अधिक जोमाने कार्य करणार
धन्यवाद !
फक्त धन्यवाद म्हणून मी काढणार नाही पळ
तुमच्या प्रेमळ शुभेच्छाच देतात जगण्याचे बळ
आभार .. !
(वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश Thank You For Birthday Wishes in Marathi).
0 टिप्पण्या