Marathi Ukhane for Male भारतामध्ये विधीप्रसंगी नावाचे उखाणे घेण्याची परंपरा अतिशय प्राचीन आहे. उखाणे, म्हणी, कोडी यांसारखे लोकसाहित्य शेकडो वर्षे पुरेल इतका साठा मराठी वाङमयात उपलब्ध आहे. अगदी वेदकाळापासून उखाण्याच्या संस्कृतीचे पालन केले जाते. लोकसाहित्यामध्ये पूर्वीच्या शिक्षित नसलेल्या लोकांनी निर्माण केलेले आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत केवळ मौखिक परंपरेने चालत आलेले उखाण्याचे भांडार समृद्ध आहे. या उखाण्यांमध्ये निरक्षरांच्या कल्पनाशक्तीचे अप्रतीम स्वरूप दिसून येते. उखाणे हे दोन चरण किंवा त्यापेक्षा अधिक चरणांचे असतात. खाली दिलेली काही पुरुषांची उखाणे तुम्हाला नक्कीच आवडतील. (Marathi Ukhane for Male).
Ukhane Marathi for Male
सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप,
***मिळाली आहे मला अनुरूप.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
***झाली आज माझी गृहमंत्री.
दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला,
सौ. ****सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
वसंतात दरवळतो फुलांचा सुवास,
सौ. सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास.
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती,
माझी आणि सौ. ची अखंड राहो प्रीती.
जीवनरूपी सागरात सुखदुःखाच्या लाटा,
सुखी संसारात सौ. चा अर्धा वाटा.
देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान,
सौ. ने दिला मला पतिराजांचा मान.
बकुळ फुलांचा सडा पडे अंगणी,
सौ*** आहे माझ्या अंगणी.
मराठी उखाणे नवरदेवासाठी
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कूजन,
सौ. सोबत करतो मी लक्षमीपूजन.
बकुळ फुलांचा सदा पडे अंगणी,
सौ. आहे माझी अर्धांगिनी.
दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग,
सुखी आहे संसारात सौ****च्या संग.
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ,
सौ. ने दिला मला प्रेमाची साथ.
सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी,
सौ. चे नाव घेताना मला होते खुशी.
चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला,
सौ. चे नाव घेता पहिला आरंभ केला.
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा,
सौ. ***चा आणि माझा जन्मो जन्माचा जोडा.
इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी,
सौ. ***चे नाव घेण्यास लागते डबल फी.
हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी,
सौ. चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी.
स्टुलावर स्टूल बत्तीस स्टूल,
*** माझी एकदम ब्युटीफुल.
मुंबापुरीची मुंबा देवी आज मला पावली,
श्रीखंडाचा घास देताना***मला चावली.
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• उखाणे मराठी कॉमेडी Funny Marathi Ukhane
0 टिप्पण्या