बायकांचे मराठी उखाणे Ukhane Marathi
कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला,
****शी लग्न करून ***जन्माचा धुपला.
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर,
****चं नाव घेते ****ची लव्हर.
वन टू थ्री, वन टू थ्री,
गणपतरावांचे नाव घेते, मला करा फ्री.
श्रीकृष्णाने भगवतगीतेतून जगाला केला उपदेश
***नी माझ्या जीवनात केला २७ जून ला प्रवेश.
श्रीकृष्णाने लिहिली भगवतगीता
***माझे राम तर मी त्यांची सीता.
भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ
***रावांशिवाय माझे जीवन माझे व्यर्थ
कळी हसेल फुल उमललं, मोहरून येईल सुगंध,
***च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद,
मंगळसूत्राचे दोन डोरले, एक सासर अन दुसरे माहेर,
***रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
हंसराज पक्षी दिसतात हौशी,
***चे नाव घेते सत्यनारायण दिवशी.
सुखद वाटते हिवाळ्यातले ऊन,
***रावांचे नाव घेते***ची सून.
भाजीत भाजी पालक,
***माझी मालकीन अन मी मालक.
बारीक मणी घरभर पसरले,
***साठी माहेर विसरले.
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट,
***रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
पाव शेर रवा, पावशेर खवा,
***चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून मी सप्तपदी चालले,
आणि ***नाथा मी तुझीच जाहले.
पाव शेर रवा, पाव शेर खवा,
***चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ती पेक्षा युक्तीने,
***रावांचं नाव घेते प्रेमा पेक्षा भक्तीने.
श्रावणात पडतात सरीवर सरी,
***रावांचे नाव घेते ***ही बावरी.
चांदीच्या ताटात गाजराचा हलवा,
***रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा.
हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे,
***चे नाव घेते सत्यनारायण पुढे.
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट,
***चे नाव घेते सोडा माझी वाट.
मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा,
***रावांना घास घालते श्रीखंडपुरीचा.
सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न,
***च्या सोबत झाले आताच माझे लग्न.
नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती,
***ची झाले आज मी सौभाग्यवती.
पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
***ची आणि माझी जडली प्रीत.
संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले,
प्रत्यक्षात ***चे आज मी जीवनसाथी झाले.
मंगळसूत्राच्या दोन वाट्या, एक माहेरची एक सासरची खूण,
***आर्धागिनी जाहले, भाग्य कुठले याहून.
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मी सुबक मेंदी,
***चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.
एक तीळ सातजण खाई,
***ना जन्म देणारी धन्य ती आई.
वर्षाकाठचे महिने बारा,
***या नावात सामावलाय आनंद सारा.
मुर्तीकाराने घडवली सुंदर मूर्ती,
***रावांची वाढो सर्वदूर किर्ती.
जाईच्या वेलीला आलाय बहार,
***ना घातला २५ जानेवारीला हार.
फुलासंगे मातीस सुवास लागे,
***नि माझे जन्मोजन्मीचे धागे.
पाणीपुरी खाताना लागतो जोरदार ठसका,
***ला आवडते बिस्कीट ब्रिटानिया मस्का-चस्का.
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• मराठी उखाणे नवरीसाठी Marathi Ukhane for Female
• मराठी उखाणे नवरदेवासाठी Ukhane Marathi Male
• उखाणे मराठी कॉमेडी Funny Marathi Ukhane
1 टिप्पण्या
Grat sir
उत्तर द्याहटवा