जीएसटी म्हणजे काय? GST Information in Marathi

जीएसटी म्हणजे काय? | जीएसटी फायदे तोटे | जीएसटी दर मराठी | जीएसटी फायदे तोटे | जीएसटी नियम मराठी pdf | जीएसटी फुल फॉर्म | GST information in marathi 2018

केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या चर्चेअंती संपूर्ण भारत देशामध्ये अप्रत्यक्ष कराच्या एकसमान पद्धतीसाठी जीएसटी (Goods and Serivice Tax India) प्रणालीची सुरवात करण्यात आली. परंतु, ही जीएसटी प्रणाली लागू करण्यासाठी भारतीय संविधानात बदल करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार, लोकसभेत संविधानात बदल करण्याचे विधेयक मांडण्यात आले. दिनांक ६ मे, २०१५ रोजी लोकसभेने संविधान (एकशे बावीसावी सुधारणा) विधेयक पारीत केले. त्यानुसार, राष्ट्रपतींनी संमती दिल्यानंतर दिनांक ८ सप्टेंबर,२०१६ रोजी संविधान (एकशे एक सुधारणा) कायदा २०१६ अस्तित्वात आला. (GST information in marathi 2018).

जीएसटी कर हा ग्राहकांने वस्तूवर किंवा सेवांवर द्यायचा असतो आणि विक्री किंवा सेवा देणाऱ्यांना जीएसटी रक्कम शासनाकडे भरायची असते. भारत शासनाच्या नियमानुसार जीएसटी कर भरणे बंधनकारक आहे. त्यामुळेच, बहुतेक लहान उद्योगांच्या मनामध्ये जीएसटीबद्दल थोडाफार तिटकारा किंवा भीती असते. परंतु, जीएसटीचे वैयक्तिक तसेच सामाजिक अनेक फायदे असतात. सदर लेखामध्ये आपण जीएसटी बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जसे की, जीएसटी म्हणजे काय?, जीएसटीचे फायदे तोटे कोणते?, जीएसटी दर, जीएसटी नियम, जीएसटी नोंदणी इत्यादी. (gst information in marathi).

जीएसटी म्हणजे काय?


GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर. GST चा फुल फॉर्म होतो GOODS AND SERVICE TAX. जीएसटी हा एक अप्रत्यक्ष म्हणजेच INDIRECT TAX आहे. १ जुलै, २०१७ रोजी भारत देशात जीएसटी लागू झाला. देशातील संपूर्ण राज्ये एक राष्ट्र म्हणून बाजारपेठ होऊन एकसारख्याच कर लागू व्हावा आणि भारताचे एकूण उत्पन्न (GDP) वाढण्यास मदत व्हावी हे जीएसटीचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. (gst full form in marathi).

१ जुलै, २०१७ पूर्वी केंद्र आणि राज्य शासनाकडून कडून वसूल होणारे अप्रत्यक्ष कर जसे की व्हॅट, सेनवॅट इत्यादींसारखे सर्व करांचे एकत्रीकरण करून एकच जीएसटी लागू करण्यात आला. 

जीएसटी फायदे - तोटे कोणते?

जीएसटी चे फायदे Benefits of GST

• राज्य आणि केंद्र सरकारचे बहुतेक कर एकत्र आल्याने कर प्रणाली सुटसुटीत व सोपी होईल.

• उद्योजक आणि व्यापारी वर्गाला एकच कर असल्याने त्यांना हिशेब ठेवणे सोपे होईल.

• जीएसटीमुळे करावर इतर कोणताही कर लागत नसल्याने उत्पादनांच्या किंमती कमी होतात.

• देशभरात वस्तूंची किंमत एकसमान राहते.

• व्यवहारात पारदर्शकता येते.

• देशाचे एकूण उत्पन्न (GDP) वाढण्यास मदत होते.

• जीएसटीमुळे कर चोरीला पायबंद बसून शासनाच्या महसूलमध्ये वाढ होते.

जीएसटी चे तोटे Disadvantages of GST

• जीएसटीमुळे राज्य सरकारला मिळणारे कर उत्पन्न कमी होते.

• बहुतेक व्यापारी आणि उद्योजकांना त्यांचे भांडवल जीएसटी अनुरूप बनवण्यासाठी सध्याचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल.

• जीएसटीसाठी कंपन्यांना एखादा सल्लागार म्हणून कर्मचारी नेमावा लागतो.

• रिटर्न किंवा कर भरायला उशीर झाला तर अतिरिक्त दंड भरावा लागतो.

जीएसटी नियम GST Rules and Regulations

जीएसटी लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या व्यवसाय, उद्योग धंद्यांना लागू होतो. जीएसटी विषयक निर्णय घेणारे मंडळाचे (GST Council) अध्यक्षपद केंद्रीय अर्थमंत्रीकडे असते आणि अशा मंडळात राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा सदस्य म्हणून समावेश असतो. जीएसटी परिषदेने आतापर्यंत ९ जीएसटी नियमांना मान्यता दिली आहे.

१. नोंदणीचे नियम

२. कर भरण्याचे नियम

३. विवरणाचे नियम

४. मूल्यांकन नियम

५. बीजकांचे नियम

६. ITC चे नियम

७. आपसमेळ नियम

८. संक्रमणकालीन नियम

जीएसटी नियम मराठी pdf  (इथे क्लिक करा)

जीएसटी दर मराठी


जीएसटी (टॅक्स) पाच स्तरांमध्ये विभागाला गेला आहे. त्यामध्ये ०%, ५%, १२%, १८% आणि २८% असे विविध प्रकारची उत्पादने आणि सेवांसाठी कर स्तर निश्चित केले आहेत.  तांदूळ, गहू यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंसाठी शून्य दर ठेवला गेला आहे. त्यावर कोणताही कर आकाराला जात नाही.

GST मध्ये समाविष्ट असलेल विविध कर:

केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याद्वारे  वेगवेगळे कर आकारले जातात.

केंद्र शासनाद्वारे आकारले जाणारे:

१) उत्पादन शुल्क (औषधे व प्रसाधन सामग्री)

२) अतिरिक्त उत्पादन शुल्क (विशेष महत्वाचा विक्री माल)

३) अतिरिक्त उत्पादन शुल्क (वस्त्र व वस्त्रनिमित माल)

४) विशेष अतिरिक्त सीमा शुल्क (SAD)

५) सेवा कर

६) अतिरिक्त सीमा शुल्क 

७) वस्तू व सेवा पुरवठा संबंधित केंद्रीय अधिभार व उपकर

राज्य शासनाद्वारे आकारले जाणारे:

१) राज्य शासन मूल्य वधित कर (VAT)

२) केंद्रीय विक्री कर

३) ऐषआरामी वस्तूंवरील कर (लक्झरी टॅक्स)

५ प्रवेश कर (सर्व प्रकारचे)

६) मनोरंजन व करमणूकीच्या साधनांवरील कर (स्थानिक संस्थांनी कर आकारलेला नसल्यास)

७) जाहिरातींवरील कर.

८) खरेदी कर.

९) लॉटरी, पैज, जुगार इत्यादींवरील कर.

१०) वस्तू व सेवा पुरवठासंबंधित राज्य शासनाचे अधिभार व उपकर.

GST मध्ये अंतर्भूत होऊ शकणारे केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक संस्था आकारणी करत असलेले कर, उपकर व अधिभार यांच्याबाबत GST परिषद केंद्र शासन व राज्य शासन यांना शिफारस करता येते.

जीएसटी नोंदणी GST Registration Process Marathi

कोणताही उद्योग, व्यवसायाची वार्षिक आर्थिक उलाढाल रु. ४० लाख, रु. २० लाख, किंवा रु. १० लाख पेक्षा जास्त असेल, तर त्या व्यवसायाचा मालकाने  जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. जर तो व्यक्ती जीएसटी नोंदणीशिवाय व्यवसाय करत असेल तर तो गुन्हा मानला जातो.

जीएसटी कायद्यानुसार, जीएसटी नोंदणी विविध प्रकारची असतात.

• सामान्य करदाता: सामान्य करदाता श्रेणी मध्ये कोणतीही ठेव देण्याची गरज नसते.

• प्रासंगिक करपात्र व्यक्ती: ज्या व्यक्तीला हंगामी व्यवसाय करायचा आहे ते व्यक्ती या श्रेणीमध्ये मोडतात. त्यासाठी त्या व्यक्तीला व्यवसाय सुरु असताना अपेक्षित आगाऊ रक्कम जमा करावी लागते. या श्रेणीचा जीएसटी नोंदणीचा ​​कालावधी हा ३ महिने एवढा असतो.

• रचना करदाता: या श्रेणी अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही.

• अनिवासी करपात्र व्यक्ती: एखादा व्यक्ती भारताबाहेर राहत असेल, परंतु तो भारतात राहणाऱ्या व्यक्तींना वस्तूंचा पुरवठा करीत असल्यास, या प्रकारच्या GST नोंदणीची श्रेणी मध्ये मोडले जातात. यांना जीएसटी नोंदणी सुरु असताना अपेक्षित GST दायित्वाच्या बरोबरीची ठेव भरणे आवश्यक असते. (GST Registration Process).

जीएसटी नोंदणीसाठीचे कागदपत्रे

जीएसटी नोंदणीसाठी, जीएसटी नोंदणी फॉर्मसोबत खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

• आधार कार्ड

• पॅनकार्ड

• इनकॉर्पोरेशन प्रमाणपत्र आणि व्यवसाय नोंदणी पुरावा

• कंपनी डायरेक्टरच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा

• व्यवसायाचा पत्ता पुरावा

• बँक स्टेटमेंट आणि Cancelled चेक 

• डिजिटल Signature

ऑनलाइन जीएसटी नोंदणी प्रक्रिया

ऑनलाइन  जीएसटी नोंदणी खालील पद्धतीने करता येते.

• सर्वप्रथम https://www.gst.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

• 'सेवा' टॅबखाली सापडलेल्या 'आता नोंदणी करा' या पर्यायावर  लिंकवर क्लिक करा.

• त्यानंतर, नवीन नोंदणी हा पर्याय निवडून खालील तपशील भरा.

• 'मी आहे' या ड्रॉप-डाउन मध्ये करदाता हा पर्याय निवडा.

• तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा.

• व्यवसायाचे नाव टाका.

• व्यवसायाचा पॅन क्रमांक टाका.

• त्यानंतर, समोरील बॉक्समध्ये तुमचा ईमेल आयडी व मोबाइल नंबर टाका.

• कॅप्टचा एंटर करून प्रोसीड वर क्लिक करा.

त्यानंतर, बॉक्समध्ये टाकलेल्या ईमेल आयडी व मोबाइल नंबरवर पाठवलेला OTP टाकून तो व्हेरिफाय करा व 'प्रोसीड' वर क्लिक करा.

त्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर रेफेरेंस क्रमांक दाखवला जाईल तो नोट करून ठेवा.

• आता, GST पोर्टलला पुन्हा भेट देऊन सेवा ' मेनू मध्ये  'नोंदणी करा' वर क्लिक करा .

• नोट करून ठेवलेला रेफेरेंस क्रमांक निवडा व टाका. आता कॅप्चा टाकून 'प्रोसीड' बटणावर क्लिक करा.

• आता पुन्हा, तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक OTP मिळेल. तो OTP एंटर करा आणि 'Proceed' वर क्लिक करा.

• आता तुम्हाला अर्जाची स्थिती काय आहे ते दिसेल. उजव्या बाजूला, एक संपादन (edit) चिन्ह असेल, त्यावर क्लिक करा.

•  समोर विचारलेली माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा.

जीएसटीसाठी नोंदणी करण्याची पात्रता काय आहे?

• जीएसटीचा कायदा लागू होण्यापूर्वी ज्या व्यक्तींनी कर सेवा अंतर्गत नोंदणी केली आहे त्या सर्व व्यक्तींना जीएसटीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

• अनिवासी करपात्र व्यक्ती आणि प्रासंगिक करपात्र व्यक्तींना जीएसटीसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे.

• रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत कर भरणाऱ्या सर्व व्यक्तींना जीएसटीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

• सर्व ई-कॉमर्स एग्रीगेटर

• २० लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी जीएसटी नोंदणी करणे अनिवार्य आहे.

GST क्रमांक कसा मिळवायचा?

ऑनलाईन पद्धतीने खालील पायऱ्यांचे अनुसरण करून GST क्रमांक मिळवा.

• सर्वप्रथम https://www.gst.gov.in या अधिकृत GST पोर्टलला भेट द्या.

• सेवा टॅब अंतर्गत 'सेवा' निवडा आणि 'नोंदणी' वर क्लिक करा.

• पोर्टलवर नोंदणी केली नसेल तर  'नवीन नोंदणी' पर्यायावर वर क्लिक करा

• पोर्टलवर लॉगिन  केल्यानंतर ईमेल, मोबाइल नंबर आणि पॅन क्रमांक टाका.

• सर्व तपशील टाकल्यावर सबमिट केल्यानंतर 'पुढे जा' वर क्लिक करा.

• तुम्ही जेव्हा जीएसटी नोंदणीसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला आधार प्रमाणीकरण करण्याचा पर्याय दिसेल.

• 'होय' पर्याय निवडा. आता, तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर प्रमाणीकरण लिंक पाठवली जाईल.

• प्रमाणीकरण लिंकवर क्लिक करा.

• तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि 'व्हॅलिडेट' निवडा.

• त्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर एक ओटीपी मिळेल तो टाका.

तुम्हाला नवीन GST नोंदणी क्रमांक तीन कामकाजाच्या दिवसांत मिळेल.

GST नोंदणी प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे?

GST नोंदणी प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे:

•  सर्वप्रथम https://www.gst.gov.in या जीएसटी पोर्टलला भेट द्या.

• पोर्टलवर यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

• यापुढे, 'सेवा' या पर्यायावर वर क्लिक करा.

• त्यानंतर,  'User Services' हा पर्याय निवडा.

• पुढे, 'प्रमाणपत्रे पहा/डाउनलोड करा' हा पर्याय निवडा.

• त्यानंतर पुढील पानावर 'डाउनलोड' वर क्लिक करा.

जीएसटी नोंदणीची वैशिष्ट्ये

• जीएसटी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले घेतले जात नाही.

• जेथे तुम्ही व्यवसाय करीत आहेत, तेथे प्रत्येक राज्यात जीएसटीसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे.

• पात्रता असूनदेखील जीएसटी अंतर्गत तुम्ही नोंदणी न केल्यास किंवा उशीरा नोंदणी केल्यास, दंड देय रक्कमेच्या १०% दंड आकारला जातो किंवा किमान दंड रु.१०,००० दंड आकाराला जातो.

जीएसटी प्रश्नोउत्तरे:

१. जीएसटी ची अंमलबजावणी प्रथम कोणत्या देशाने केली?

उत्तर - सन १९५४ मध्ये जीएसटी ची अंमलबजावणी प्रथम फ्रान्स देशाने केली.

२. जीएसटी चा फुल फॉर्म काय आहे?

उत्तर -  जीएसटी चा फुल फॉर्म Goods and Services Tax असा होतो.

३. जीएसटी चे दर कोण निश्चित करते?

उत्तर - केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सयुंक्त विद्यमानाने 'जीएसटी परिषद' दर निश्चित करते.

४. जीएसटी नोंदणीसाठीचे शुल्क किती आहे?

उत्तर - जीएसटी नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या