मकर संक्रांत माहिती मराठी | मकर संक्रांति निबंध मराठी । Makar Sankranti Essay in Marathi । Makar Sankranti Nibandh Marathi । Makar Sankranti Marathi Information । मकर संक्रांति 2023 मराठी माहिती । Makar Sankranti 2023 Marathi । मकर संक्रांत 2023
नव्या वर्षाचा सर्वप्रथम सण हा बहुमान मकर संक्रांतीचाच. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे जानेवारी व मराठी पौष महिन्यातील पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांत. पौष महिन्यात फारसे सण नसतात. मकर संक्रांत असा हा एकच सण आहे, जो सर्वाना आनंद देतो. खरं तर, आपले सर्व सण चंद्राच्या भ्रमणावर आधारित असतात, पण मकर संक्रांत हा एकच सण सूर्यावर आधारित आहे. दिवाळी, दसरा ह्या सणांच्या तारखा त्यामुळे बदलतात, पण संक्रांत मात्र ठराविक दिवशीच येते.
ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांत हा सण साजरा करतो. मकरसंक्रांत हा सण सूर्याच्या संक्रमणाशी निगडीत असल्याने इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे दरवर्षी १४ जानेवारीलाच येतो. क्वचितच तो १३ किंवा १५ तारखेला लिपवर्षामळे येऊ शकतो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याची गती उत्तरेकडे वळते आणि दिवस मोठा होत जातो म्हणजेच उत्तरायण सुरु होते.
सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे ह्याला संक्रमण म्हणतात. हया दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते ह्यावरून ह्या दिवसाला मकर संक्रांत हे नाव मिळाले. संक्रातीच्या दिवसाला 'किंक्रांत' असेही संबोधले जाते. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला 'भोगी' म्हणतात.
मकर संक्रात सणाबद्दल पुराणात दोन आख्यायिका सांगितल्या जातात. पहिली आख्यायिका म्हणजे दैवतांनी संकरासूर राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले म्हणून हा सण साजरा करत असावेत असा संदर्भ आहे. तसेच महाभारतात भिष्माचार्यानी आपल्या इच्छामरणाच्या वराचा उपयोग करत बाणांच्या शय्येवर ह्याच दिवशी प्राण त्यागला असा संदर्भ आहे.
भारतात ह्या काळात म्हणजेच जानेवारी महिन्यात थंडी पडलेली असते. मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारत वर्षात साजरा केले जातो. वेगवेगळ्या प्रांतात नाव व साजरा करण्याची पद्धती निरनिराळ्या आहेत. पंजाबमध्ये ह्याला 'लोरी' म्हणतात, उत्तर प्रदेशात किचिन व किचोरी, तामिळनाडूमध्ये पोंगल, मध्य प्रदेश व बुंदेलखंडात सुकरत किंवा सकरत, तर आसाममधे 'माघ बिहू' म्हणतात केरळमधे 'माघारा', आंध्र प्रदेशात 'पेड्डा पांडूग' असे म्हणतात. गुजराथमधे ह्या वेळेला रंगी बेरंगी पतंग उडवायची मजा असते, आणि आकाश सुंदर सुंदर पतंगांनी सजलेले दिसते.
मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र स्नानानंतर देवाला तीळ आणि तांदूळ वहायची प्रथा आहे. सुवासिनी बायका ब्राह्मणाला किवा पाच स्त्रियांना सुगडी देतात. मातीच्या एका छोटया भांड्यात गह, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूस भरून एकमेकीना देतात. रथसप्तमीपर्यंत हा तिळगुळ व हळदीकुंकूवाचा कार्यक्रम चालतो. नवविवाहित मुली ह्या सणाला तेल, जिरे, मीठ, कापूस ह्यांचे दान करतात. ह्या दिवशी तिळाच्या वड्या, लाडू, तीळ घालून गुळपोळी ह्यांचे फार महत्व आहे. संध्याकाळी एकमेकांना तिळगुळ व हलवा देऊन 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असे म्हणतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी पतंग उडवूनही हा सण उत्साहात साजरा होतो.
आजच्या काळात ह्या सर्व प्रथेचा अर्थ आपण लावायचा म्हटला तर पूर्वजांनी रुढिपरंपरा ह्यांच्यामागे केलेला खोलवर विचार लक्षात येतो. थंडीच्या दिवसात तीळ, गूळ हयांसारखे उष्ण पदार्थ आपल्या शरीरात उष्णता टिकवून ठेवून उर्जा निर्माण करतात. हळदीकंकवाच्या निमित्ताने एकत्र येऊन बायका एकमेकींच्या सुखदुःखात सहभागी होतात. नित्योपयोगी वस्तू लूटून आपला आनंद एकमेकांत पसरवतात. ह्या दिवशी बायका, मुले काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात. ह्या मागे हिवाळ्याच्या कडकडीत थंडीत काळा रंग उष्णता शोषून नि टिकवून आपल्या शरीराला उबदार ठेवतो हेच कारण असावे.
संक्रांतीला देवता मानलेले आहे. याच देवीने संकरासुराचा वध केला. संक्रांति देवी दरवर्षी निरनिराळ्या वाहनावरून येते. ह्या दिवशी संक्रांति देवीची पूजा करतात. सूर्याच्या गतीचे प्रतीक, म्हणून हिला शक्ती देवता मानतात . पाटावर लाल वस्त्र घालून, त्यावर तांदुळाचे कमल काढून, त्यावर सूर्या नारायणाची मूर्ती स्थापून तिची पूजा करतात ह्या काळात उत्तरायण असते . उत्तरायणात आलेले मरण चांगले समजतात, कारण यमलोकात जायची शक्यता कमी असते. म्हणूनच पितामह भीष्माचार्य ह्यांना, इच्छामरण असल्यामुळे उत्तरायण सुरु झाल्यावरच त्यांनी प्राण सोडला.
पुराणातल्या गोष्टीप्रमाणे सूर्य ह्या दिवशी मकर राशीत जातो मकई राशीचा स्वामी शनी हा सूर्यपुत्र आहे, म्हणजेच १ महिन्यासाठी पिता आपल्या पुत्राच्या घरी जातो. पिता-पुत्र ह्यांच्यातील प्रेमाच्या संबंधाच्या दृष्टीने ह्या दिवसाला महत्व आहे. संक्रांतीच्या दिवशी दर ९२ वर्षांनी कुंभमेळा भरवला जातो आपल्या असंख्य शापित पूर्वजांना पाताळातून मुक्त करण्यासाठी, भगीरथाने ह्याच दिवशी गंगेला स्वर्गातून खाली आणले अशीही एक आख्यायिका सांगितली जाते.
संक्रांत सांगते सारे रोग, द्वेष, मत्सर संपवा. एकमेकांशी गोड बोला मनामनाचे स्रेहमिलन घडवा आपले अंतःकरण तिळासारखे स्रेहपूर्ण. स्निग्ध व वाणी गुळासारखी गोड ठेवावी परस्परांमध्ये प्रेम, सर्वाविषयी जिव्हाळा, आपुलकी वाटावी व जुनी भांडणे विसरून जावीत अशा भावनेने तिळगुळ द्यावा व घ्यावा. संक्रांत म्हणजे स्रेहवर्धनाचा गोड संदेश घेऊन जीवनांत गोडवा वाढवणारा असा हा पवित्र सण आहे.
आपल्या सर्वांचे यशाचे पतंग उंचच उंच उडत राहो हि सदिच्छा व मकर संक्रांतीच्या सर्वाना लाख लाख शुभेच्छा !
0 टिप्पण्या