Lion and Mouse Story in Marathi फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलामध्ये जंगलाचा राजा सिंह राहत होता. सिंहाच्या गुहेच्या शेजारी एका पिटुकला उंदीर बिळात राहत असे.

lion and mouse story in marathi | सिंह आणि उंदराची गोष्ट | kids stories with moral | child moral story in marathi | मराठी बोधकथा तात्पर्य

एके दिवशी, उंदीर नेहमीप्रमाणे त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी बिळातून बाहेर पडला. जंगलात थंड वारा सुटला होता. झाडावरून बसून पक्षी गाणी गात होते. चहूकडे सुंदर फुलं फुलली होती.

"आजचा दिवस किती छान आहे!, मला माझ्या मित्रांना भेटलंच पाहिजे ! " उंदीर स्वतःशीच बोलत चालत होता.

त्याच्या बिळाच्या जवळ असलेल्या गुहेच्या वाटेवर तो महाशक्तिमान सिंह कोवळ्या उन्हात गाढ झोपला होता. उंदीर मात्र आपल्या मित्रांबद्दल विचार करण्यात मग्न झाला होता. त्याचं वाटेकडे लक्षच नव्हतं.  अचानकपणे उंदीराचा त्या झोपलेल्या बलाढ्य सिहांच्या शेपटीवर पाय पडला. सिंह दचकून जागा झाला. त्यांने मोठी गर्जना केली.


"कोणी माझी झोपमोड केली? उंदीराकडे पाहून सिंह म्हणाला, 

मूर्ख उंदरा तू? 

माझी झोपमोड करण्याचं तुझं धाडस झालंच कसं? थांब तुला आता खाऊनच टाकतो म्हणजे चांगला धडा शिकशील तू."

सिंहाने आपल्या शेपटीकडे पाहिलं आणि जोरात झटका दिला. उंदीर हवेत उंच उडाला, आणि तो जमिनीवर पडायला लागताच सिंहाने त्याला आपल्या पंजात पकडलं.

"क्षमा करा सिंहमहाराज" पिटूकल्या उंदीराने त्याला विनवलं.

कृपया, मला खाऊ नका, मला तुम्हाला जागं करायची अजिबात इच्छा नव्हती. चुकून आपल्या शेपटीवर माझा पाय पडला. जर तुम्ही मला सोडून दिलंत, तर मीही तुम्हाला  अडचणीच्या वेळीस मदत करीन, कृपया मला सोडून द्या."

उंदीराचं बोलणं एकूण सिंह गुरगुरला आणि म्हणाला,

''एवढासा पिटुकला उंदीर तू! माझ्यासारख्या बलाढ्य जंगलाच्या राजाला तू काय मदत करणार? पण जाऊ दे. देतो तुला सोडून. तसंही तुला खाऊन माझं पोट काही भरणार नाही." असं म्हणून सिंहाने उंदीराला आपल्या पंजातून मुक्त करून सोडून दिले. उंदीर खूप खुश झाला. त्याने सिंहाला मनोमन मदत करायचे ठरवले.

त्याच जंगलात एक शिकारी येत असे. सिंहाला पकडून प्राणी संग्राहलयात विकून खूप पैसे मिळवण्याचा विचार त्याच्या मनात होता. सिंहाला पकडण्यासाठी तो दररोज जाळं पसरून ठेवीत असे.

खूप दिवस उलटून गेले. अखेर एके दिवशी तो बलाढ्य सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला ! 

जाळ्यातून बाहेर पडण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला.

त्याने त्याचे मोठे पंजे झाडले.

लांब शेपटीने त्याचे मोठे पंजे झाडले.

लांब शपेटीने जोरजोरात फटके मारले.

पण त्याला जाळ्यातून बाहेर काही येता आलं नाही. त्यामुळे तो मोठ्याने गर्जना करून आकांत करू लागला.

गुहेशेजारी असेलेला उंदीर सिंहाची गर्जना ऐकून बिळातून बाहेर आला. 

त्याने बघतलं, सिंह जाळ्यात पूर्ण गुरफटून गेलाय.

तो सिंहाजवळ गेला आणि म्हणाला,  "काळजी करू नका सिंहमहाराज, मी तुम्हाला सोडवतो."


बिचाऱ्या सिंहाने त्याच्याकडे बघितलं. 

'फार उपकार होतील तुझे, पण तू तर खूप छोटा आहेस, मला कसं काय सोडवशील?" 

"थोडंसं थांबा आणि बघा. भलेही मी छोटा आहे, परंतु माझे दात खूप धारदार  आहेत. माझ्या दातांनी मी हे जाळे सहज कुरतडले जाऊ शकते.'

असं म्हणून, उंदीर त्याच्या धारदार दातांनी जाळं कुरतडायला लागला. एक एक दोऱ्या तुटायला लागल्या. जाळ्याला एक मोठं भोक पडलं. 

सिंह बाहेर आला. त्याला आनंद झाला. तो उंदीराला म्हणाला, 

"तुझं बरोबर होतं, तू तू अगदी छोटा आहेस. माझ्यासारखा ताकदवान नाहीस. पण तू खूप हुशार आहेस. तू शिकाऱ्याच्या तावडीतून मला सोडवलंस. उंदरा, तुझ्या मदतीबद्दल मी खूप आभारी आहे !'' असं म्हणून सिंहाने त्याला आपल्या शेपटीत पकडून अलगद पाठीवर बसवले.

जेव्हा शिकारी परत आला, तेव्हा जाळं रिकामं होतं. 

सिंह आणि उंदीर दूर गेले होते. ते आता खूपच चांगले मित्र बनले होते.

सिंह आणि उंदराच्या गोष्टीचा सारांश:

तर ही गोष्ट होती सिंह आणि उंदीर यांची गोष्ट. या गोष्टींमध्ये आपण पाहिलं की, एक लहानसा उंदीर असून देखील तो जंगलाचा राजाला संकटकाळी कशाप्रकारे मदत करतो. सिंहाला वाटले की, हा पिटुकला उंदीर माझी काय मदत करणार? तरीही सिंह उंदीराला सोडून देतो. यातून सिंहांचा दयाळूपणाचा स्वभाव दिसून येते. पुढे उंदराने मात्र सिंहाला दिलेला शब्द पाळून, संकंटकाळी सिंहाला मदत केली आणि त्याचा जीव वाचवला. यातून उंदीराचा खरेपणा सिद्ध होतो.

सिंह आणि उंदराची गोष्ट तात्पर्य:

तात्पर्य १:

कधीही कोणालाही क्षुद्र किंवा लहान समजून त्याचा उपहास (दुर्लक्ष) करू नये. वेळ पडल्यास कोणीही संकटकाळी मदतीला येऊ शकते.

तात्पर्य २ :

प्रेम आणि दयाळूपणा कधीही वाया जात नाही. तुम्ही दयाळूपणाने वागून काहीही साध्य करू शकता, जे तुम्ही सक्तीने करू शकत नाही. (Moral of Lion and Mouse Story).

प्रिय बालमिमित्रहो, आशा आहे की तुम्हाला सिंह आणि उंदीराची ही मराठी बोधकथा नक्कीच आवडली असेल.  गोष्ट आवडली असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्र - मैत्रिणींसोबत शेअर करा.

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

ससा आणि कासवाची गोष्ट Tortoise and Rabbit Story in Marathi

• बुड बुड घागरी मराठी गोष्ट  Bud Bud Ghagri Story in Marathi

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक गोष्ट Chal Re Bhoplya Tunuk Tunuk