Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Story in Marathi Written एका घनदाट जंगल होते. गर्द झाडी, आंबा, फणस आणि अनेक प्रकारच्या झाडा- झुडपांनी ते जंगल पूर्णपणे आच्छादले गेले होते. इतके की अगदी दिवसाही सूर्याची किरणे जंगलाच्या आतमध्ये पोहचणे शक्य होत नसे. त्यामुळे पशु-पक्षी आणि हिंस्त्र प्राण्यांचा वावर जंगलात मोठ्या प्रमाणात वाढला होता. (चल रे भोपळ्या टुणुक टुणुक म्हातारीची गोष्ट).

chal re bhoplya tunuk tunuk | marathi story chal re bhoplya | चल रे भोपळ्या टुणुक टुणुक गोष्ट | kids stories with moral | child moral story in marathi

जंगलाच्या थोड्याच अंतरावर माणसांची वस्ती होती. जंगलातील वाघ, लांडग्यांमुळे त्या वस्तीतील माणसं जीव मुठीत घेऊन जगत असत.  त्याच वस्तीत एक म्हातारी राहत होती. तिच्या मुलीचं लग्न झाल्यापासून ती एकटीच राहत होती. तीला आपल्या मुलीची खूप आठवण यायची.

म्हाताऱ्या अजीबाईने, एक दिवस आपल्या लेकीकडे जाऊन तिला भेटायाचं ठरविले. पण अडचण ही होती की तीच्या लेकीचं घर होतं जंगलांच्या पलीकडे. लेकीला भेटण्यासाठी तिला जंगलाच्या वाटेने जावं लागत असे.

पण म्हातारी धीट होती. तिने आपल्या लेकीला भेटायचा निश्चय केला  आणि न घाबरता ती भयानक जंगलाच्या दिशेने लेकीला भेटायला निघाली.

झप झप पावलं टाकत म्हातारी चालत होती. वाटेत तिला भेटला एक लांडगा.

तो म्हणाला, “ऐ! म्हातारे, भूक लागली मला, मी खातो आता तुला." 

म्हातारी मनातून खूप घाबरली पण तिने तसे दाखवले नाही. ती म्हणाली, “माझ्यात खायला आहेच काय? नुसती हाडे! लेकीकडे जाईन. चार दिवस राहीन. तूप रोटी खाईन. जाडजूड होऊन येईन. मग तू मला खा.”


लांडगा म्हणाला, तू बोलत तर खरं आहेस, पण लवकर ये हं. मी वाट पाहीन.” 

म्हातारी म्हणाली, "अगदी खरं!" लांडग्यांने तीला जाऊ दिलं.

म्हातारी पुढे निघाली. मग तिला भेटला एक वाघ. 

तो म्हणाला. “म्हातारे, खातो आता तुला. '' म्हातारी म्हणाली, “वाघोबा, माझ्यात खायला आहेच काय?

नुसती हाडे! लेकीकडे जाईन. चार दिवस राहीन. तूप-रोटी खाईन. जाडजूड होऊन येईन. मग मला खा.” 

वाघ म्हणाला, “बरं, बरं. पण लवकर परत ये हो!" 

म्हातारी म्हणाली, "अगदी खरं!" वाघाने तीला जाऊ दिलं.

म्हातारी लेकीकडे गेली. थोडे दिवस राहिली. तूप रोटी खाऊन जाडजूड झाली. मग लेकीला म्हणाली, 

“मुली, आता मी घरी जाते ग." लेक म्हणाली, “आई, आणखी चार दिवस राहा ना.

" म्हातारी म्हणाली, “नको ग बाई. 

जंगलात लांडगा माझी वाट बघतोय. 

वाघ माझी वाट बघतोय. मुलीला आईची काळजी समजली. ती म्हणाली, 

“आई, हा घे मोठ्ठा भोपळा. त्यात बसून जा. म्हणजे तुला कोणी बघणार नाही." आणि सुखरूप घरी पोहचशील म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली, “चल रे भोपळ्या, टुणुक टुणुक.'' 

भोपळा पळत पळत निघाला. जंगलात भेटला वाघ. तो म्हणाला, “भोपळ्या, भोपळ्या, म्हातारीला पाहिलेस का रे?” भोपळ्यातून म्हातारी म्हणाली, “म्हातारीबितारी मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्या, टुणुक टुणुक.'' भोपळा जोरात पळत सुटला.

वाघाला संशय आला. तोही भोपळ्याच्या मागे पळत सुटला. वाटेत भेटला लांडगा. त्याने भोपळ्याला अडवले. म्हातारीला बाहेर काढले. मग म्हणाला, “म्हातारे, मला फसवतेस काय? आता मी तुला खाणार.” 

एवढ्यात वाघही तिथे आला. तो म्हणाला, मीच खाणार म्हातारीला. लांडगा म्हणाला, “मी खाणार. '' वाघ म्हणाला, मी खाणार. दोघांचे भांडण जुंपले. ते पाहून म्हातारी गुपचूप भोपळ्यात बसली आणि म्हणाली, " भोपळ्या, टुणटुणुक. वाघ आणि लांडगा भांडत बसले आणि म्हातारीचा जीव वाचला. (Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Story Marathi).

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक गोष्ट सारांश:

वाघ आणि लांडग्यापुढे आपला काय आता टिकाऊ लागणार नाही हे म्हातारीला कळून चुकले होते. संकटात असताना देखील आजीबाईला भन्नाट युक्ती सुचली. युक्ती फोल ठरूनदेखील वाघ आणि लांडग्याची जेव्हा लढाई सुरु झाली तेव्हा म्हातारीने धूम ठोकली आणि स्वतःचे प्राण वाचवले. 

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक तात्पर्य:

तात्पर्य १: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.

तात्पर्य २: शत्रू बलाढ्य असले तरीही हुशारीने स्वतःचा जीव संकटकाळी वाचवता येऊ शकतो. (Moral of the Story - Chal Re Bhoplya Tunuk Tunuk).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

ससा आणि कासवाची गोष्ट Tortoise and Rabbit Story in Marathi

• बुड बुड घागरी मराठी गोष्ट  Bud Bud Ghagri Story in Marathi

• सिंह आणि उंदराची गोष्ट Lion and Mouse Story in Marathi