माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करायला गेले. जाताना ते म्हणाले, ''मनीमावशी, तू खिरीची राखण कर. आम्ही नदीवर अंघोळ करून येतो, मग सर्वांनी मिळून खीर खाऊ."
मांजर राखण करायला थांबली. खिरीचा छान वास सुटला होता. मनीमाऊला भूकही लागली होती. तिला वाटले, 'आपण थोडी खीर खाल्ली, तर कोणाला काय कळणार आहे ?'
म्हणून मनीमाऊने थोडी खीर खाल्ली. तिला खीर फार आवडली. मग मनीमाऊला राहवेना. तिने आणखी थोडी खीर खाल्ली. असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली. मग पातेवाल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग घेऊन बसली.
काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले. पाहतात तर काय, पातेले रिकामे.
त्यांनी विचारले, ''मनीमावशी, खीर कोणी खाल्ली ?''
मनीमाऊ म्हणाली, ''मी नाही बाई खीर खाल्ली. मी तर झोपले होते.''
पण माकडाला संशय आला. त्याने एक घागर आणली. ते म्हणाले, ही घागर आपण नदीत उपडी ठेवू. आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे, 'मी खीर खाल्ली, तर बुडबुड घागरी.' ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल.''
अगोदर माकड घागरीवर बसले. ते म्हणाले,
“मी खीर खाल्ली, तर बुडबुड घागरी.'' पण घागर बुडाली नाही.
मग उंदीर घागरीवर बसला. तो म्हणाला, “मी खीर खाल्ली, तर बुडबुड घागरी.'' पण घागर काही बुडाली नाही.
मग मनीमाऊ भीत भीत घागरीवर बसली. तिचे पाय लटलटू लागले. घागर हलू लागली. ती म्हणाली,
“मी खीर खाल्ली, तर बुडबुड घागरी.'' आणि हळूहळू घागर बुडू लागली. मनीमाऊ गटांगळ्या खाऊ लागली. घाबरून ती ओरडू लागली, '“मला वाचवा ! वाचवा! मी परत खोटे बोलणार नाही. मित्रांना फसवणार नाही.''
प्रिय बालमित्रांनो, तर अशा प्रकारे मनीमाऊची खिरीची चोरी पकडली गेली. अशी झाली मनीमाऊची फजिती !
बुड बुड घागरी मराठी गोष्ट सारांश:
माकड, उंदीर आणि मांजर यांच्या गट्टीमध्ये मांजरीला आपल्या हावरटपणाचा मोह आवरता आला नाही. माकड आणि उंदीर अंघोळ करायला गेले असता, थोडीशी खीर चाखून पाहता-पाहता संपूर्ण खीर फस्त करून टाकली. त्यावरून 'मी खीर खाल्ली नाही' हा मांजरीचा खोटारडापणा माकडाने जास्त वेळ टिकू दिला नाही.
बुड बुड घागरी गोष्ट तात्पर्य:
तात्पर्य १:
नेहमीच खरे बोलावे.
तात्पर्य १:
खोटेपणाची शिक्षा नेहमी मिळते.
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• चल रे भोपळ्या टुणुक टुणुक गोष्ट Chal Re Bhoplya Tunuk Tunuk
• सिंह आणि उंदराची गोष्ट Lion and Mouse Story in Marathi
• ससा आणि कासवाची गोष्ट Tortoise and Rabbit Story in Marathi
0 टिप्पण्या