Nadichi Atmakatha Nibandh in Marathi नद्या म्हणजे आपल्या देशाच्या प्राण आहेत. नद्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनाला जीवन दिले आहे. नद्या आपल्याला हे शिकवतात की जीवन म्हणजे साहस आहे. जीवनामध्ये सतत पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे पुढे जात राहावे. नद्यांच्या प्रवाहातील सामर्थवान असलेल्या लाटांच्या मदतीने आपण अधिक सामर्थ्य विकसित करायला पाहिजे. आज नदीची आत्मकथा या निबंधात, भारतातील विविध नद्यांच्या दृष्टीकोनातून तिच्या आत्मकथेची वर्णन केले आहे. (आत्मकथा निबंध मराठी).
मी नदी बोलते आत्मकथा मराठी निबंध (सोपा)
सर्वांना माझा नमस्कार! मी एक नदी बोलत आहे. माझं नाव इरावती आहे. मला सरिता, तटिनी, तरंगिणी या नावाने देखील ओळखले जाते. माझा जन्म हा एका मोठया पर्वताच्या टोकावर झाला. माझे बालपण डोंगरांच्या कऱ्या-कपारीमधुन हसत आणि खेळत गेले. लहापणी मी खूपच खोडकर होते. एका ठिकाणी थांबणे मला कधीच जमत नव्हते. हळू हळू निसर्गामधील वृक्षे, वेली-झाडे यांच्या सहवासात राहून मी मोठी झाले. अनके वर्ष पुढे सरत गेली. कालांतराने माझ्या किनाऱ्यावर अनके गावे खेडे आणि शहरे वसली गेली. सर्वांना पाणी देऊन मला फार समाधानी वाटत असे. मला आनंद वाटतो की माझ्यामुळे सर्व माणसे, पशु-पक्षी यांची तहान भागते. माझे पाणी अडवून- जिरवून लोकं शेती देखील करतात, बागबगीचे फुलवतात आणि आपली उपजीविका भागवत असतात. डोंगर-कपाऱ्याच्या संथ अशा प्रवाहातून जाताना सगळ्या प्राणिजन्य-वनस्पतिजन्यांची तहान भागवते. माझ्या सोबतच निरंतर धावत्या माझ्या सोबती नद्या माझ्या प्रमाणेच कधीही थांबत नाहीत. माझा प्रवाह हा नागमोडी वळणाचा असतो अनेक गावातून-शहरातून वाहत जाऊन शेवटी मी समुद्रात विलीन होते.
पावसाळ्याच्या ऋतूमध्ये जेव्हा पाऊस पडतो मी तुडुंब भरून वाहते राहते. कधी कधी अतिवृष्टीमुळे महापूर येतो. त्यामुळे, माझ्या किनारी वसलेली गावे-शहरे यांचे फार नुकसान होते. काहीवेळेस तर जीवितहानी देखील होते. अतिवृष्टीमुळे होणारी जीवितहानी माझी इच्छा असूनही मला ती थांबवता येऊ शकत नाही, याचे मला खूप दुःख होते. जर पावसाळ्यापूर्वी अतिवृष्टीसाठी लढण्याची तयारी माणसाने जर करून ठेवली तर यातून नक्कीच मार्ग निघू शकतो असे मला वाटते. माणसू-पशु -पक्षी आणि वनस्पतींची निस्वार्थपणे सेवा करणे, त्यांना स्वच्छ पाणी पुरवणे हेच माझे जीवन आहे. यामध्ये मी समाधानी आहे.
सतत प्रवाहासह वाहत जाणे आणि मनुष्य, पशु-पक्षी, झाडे-फुले यांना पाणी देणे हाच माझा जीवनाचा सार आहे. यामुळे मला 'माता' म्हणून देखील संबोधले जाते.
मला एक गोष्ट सांगतांना दुःख वाटते की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञाच्या काळात लोकं माझ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे, माझ्यात सोडलेला कचरा, सांडपाणी, केमिकल यामुळे मी दूषित होत असते. या जलप्रदूषणामुळे पाण्यात राहणाऱ्या जलचर प्राण्यांनां स्वतःचा जीव गमवावा लागतो. पण सुदैवाने काही चांगली लोकं माझं पाणी स्वच्छ, निर्मळ राहावं म्हणून सतत प्रयत्न करीत असतात. स्वच्छता मोहिमांसारख्या अनेक उपाययोजना राबवित असतात. त्यामुळे भविष्यात लोकांना माझं शुद्ध असणं किती गरजेचे याची जाणीव होईल आणि मी दूषित होण्यापासून वाचेन याची मला खात्री आहे.
माझं आत्मवृत्त ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनःपूर्वक आभार! तुम्ही मला नेहमी शुद्ध ठेवण्यासाठी आपापल्या परीने तुमचं योगदान नक्कीच द्याल असा विश्वास आहे.
मी गोदावरी नदी बोलते निबंध
तुम्हाला कदाचित माहीतच असेल की, महाराष्ट्राच्या प्राचीन आणि पवित्र नद्यांपैकी एक आहे 'गोदावरी नदी'. भारत देशाच्या पंधराव्या जलप्रवाही गोदावरी नदीची महत्वपूर्ण भूमिका मानली जाते. गोदावरी नदी विशेषत: महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सर्वात महत्वाच्या नद्यांपैकी एक नदी आहे. चला तर मग वाचकमित्रहो, गोदावरी नदीची आत्मकथा गोदावरी नदीकडूनच जाणून घेऊयात.
नमस्कार मित्रांनो, मी गोदावरी नदी बोलत आहे. माझी आत्मकथा तुम्हाला सांगताना आनंद होत आहे. मी एक भारत देशातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी म्हणून ओळखली जाते. गंगा नदी नंतर मलाही पवित्र नदी म्हणून गणले जाते. मला गौतमी गोदावरी आणि दक्षिण गंगा या नावाने देखील ओळखले जाते. माझा उगम महाराष्ट्र राज्यातील नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर झाला. हे ठिकाण अरबी समुद्रापासून ८० किलोमीटर आहे. त्र्यंबकेश्वराजवळ कुशावर्त, ब्रह्मगिरी आणि गंगाद्वार ही पवित्र स्थाने देखील आहेत. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वरापासूनच जवळ असलेले नाशिक हे एक औद्योगिक शहर आहे.
माझ्या इतिहासाबद्दल सांगायचे झाले तर, पुराणकाळात देखील माझा उल्लेख आढळतो. प्रभू श्रीराम वनवास काळामध्ये असताना त्यांनी माझ्या तटावर आश्रम बांधला असा उल्लेख रामायणात केलेला आहे. अगदी पाषाण युगापासून माझ्या खोऱ्यात मानवी वस्ती होती आणि हडप्पा संस्कृतीचा उगम देखील माझ्याच खोऱ्यात झाला होता. गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून, शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून गौतम ऋषींनी पापाचे प्रायश्चित केले अशी माझी अख्यायिका सांगितली जाते.
माझी लांबी सुमारे १४६५ किलोमीटर एवढी आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्यामधील लांबी ६६८ किलोमीटर आहे. माझे महाराष्ट्रातील खोरे १५३००० चौरस किलोमीटर आहे. हे क्षेत्र भारत देशाच्या १०% तर महाराष्ट्र राज्याच्या ४९% टक्के आहे. मी अग्नेय दिशेला वाहत वाहत आंध्रप्रदेश राज्यामधील राजमहेंन्द्रीजवलील बंगालच्या उपसागरास मिळते. म्हणूनच, मला महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशातील जीवन वाहिनी मानली जाते.
महाराष्ट्रातील नाशिक शहरामधील कुंभमेळात नदी तटात केलेल्या स्नानाचे खूप महत्व आहे. माझ्या खोऱ्यात राहणारी लोकं बहुसंख्येने मराठी व तेलुगू भाषिक आहेत.
आंध्रप्रदेशात दर १२ वर्षांनी पुष्करम मेळा माझ्या (गोदावरी) तीरावर भरतो, कुंभमेळ्याप्रमाणेच या मेळ्याचे स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे.
माझ्या उपनद्यांबद्दल सांगायचे झाले तर, मी अनेक उपनद्या आहेत. त्यापैकी उत्तरेकडून येणाऱ्या उपनद्या म्हणजे प्राणहिता, इंद्रावती, शिवना, कादवा, खांब इत्यादि आहेत. तर, दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्यापैकी मांजरा, प्रवरा, सिंदफणा, दारणा, बिंदुसरा इत्यादी आहेत.
माझे पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक होत असते असते. नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. वाहणारे पाणी व्यवस्थित वापरले जावे, पुरांचा प्रश्न मिटावा व ज्या ठिकाणी मी पोहचत नाही त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी माझ्या खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केली गेली आहे.
दुष्काळी काळात पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर होतात. नदीकाठांवर असलेली अनेक गावे, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरांकरिता लागणाऱ्या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी माणसांकडून प्रयत्न केले जात आहेत.
प्रचंड पावसामुळे अतिवृष्टी, पुरांची नैसर्गिक संकटे आणि दुष्काळ येतात. वाढत्या सिंचन क्षमतांमुळे पूर्वीपेक्षा पूर धोकापातळी कमी झाली असली तरी वृक्षतोडीनंतर नदीपात्रात वाढणारा गाळ आणि पात्रालगतच्या वाढत्या मनुष्यवस्तीमुळे आर्थिक हानी व मनुष्यहानी देखील होते.
माझ्या किनाऱ्यालगतच्या नगर वस्तीतून येणाऱ्या सांडपाण्यापासून सर्वाधिक ८५% प्रदूषण होत असते. सांडपाणी सोडल्यामुळे पिण्याचे पाणी न घेता नदी पात्रातील विंधन विहिरींद्वारे अथवा धरणांतून घेतले जाते, त्यामुळे पाणीनियोजन बिघडते. उरलेले १५% प्रदूषण औद्योगिक फॅक्टरी आणि त्यांच्या केमिकलमुळे होत असते. अनेक सामाजिक आणि शासकीय यंत्रणा माझं पाणी शुद्ध व्हावे म्हणून अनेक अभियान राबवित असतात. कालांतराने मी पूर्ण शुद्ध होईन याची खात्री आहे. माझी आत्मकथा ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!
मी गंगा नदी बोलते मराठी निबंध
नमस्कार मित्रांनो, मी आहे गंगा नदी. तुम्ही बऱ्याचदा माझ्याबद्दल ऐकले किंवा वाचले नक्कीच असेल. मला अधिक जाणून घेण्यासाठी मी माझी आत्मकथा तुम्हाला सांगत आहे.
माझा जन्म हिमालय पर्वतावरील गंगोत्री या ठकाणी झाला. मी भारतातील मोठ्या नद्यांपैकी एक आहे. दक्षिण आशियातील भारत आणि बांगलादेश या देशातून वाहणारी मी एक महत्त्वाची नदी आहे. माझी गंगेची लांबी २,५२५ कि.मी. एवढी आहे. माझ्या अनके उपनद्या आहेत. त्यापैकी उत्तरेकडून येणाऱ्या प्रमुख उपनद्या म्हणजे यमुना, राम गंगा, कर्नाली, ताप्ती, गंडक, कोसी आणि काकशी आणि दक्षिणेच्या पठारामधून येणाऱ्या प्रमुख नद्या म्हणजे चंबळ, सोन, बेतवा, केन, दक्षिणी तोस इत्यादी. यमुना ही माझी सर्वात महत्त्वाची उपनदी आहे.
हिंदू धर्मानुसार मी भारतातील सर्वात पवित्र नदी म्हणून ओळखली जाते. वेद-पुराणामध्ये अनेक वेळा माझा उल्लेख आढळतो. ब्रह्मापुत्र नदी नंतर मी भारतातील मोठी नदी आहे. हिंदू धर्मीय लोकं मला गंगामाता असंही म्हणतात. त्यांच्यासाठी मी खूप महत्वाची आहे असं ते मानतात. धार्मिक लोकं माझ्या पात्रात स्नान करणे पवित्र मानतात. माझ्या पाण्याचा वापर शेती आणि वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
माझ्या किनारपट्टीत माशांच्या १४० प्रजाती, ३५ सरपटणारे प्राण्यांच्या ३५ आणि नीलगाय, सांबर, ससा, मुंगूस, चिंकारा (ब्लॅक बक) अशा सस्तन वन्यजीवांच्या ४२ प्रजाती आहेत. डॉल्फिन मासाच्या दोन जाती माझ्या पाण्यात वास्तव करतात. त्यांना गंगेतिल डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. याशिवाय माझ्यामध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत. माझ्या किनाऱ्यावर स्थायिक असेलेल्या लोकवस्ती आणि फॅक्टरीमुळे मला जलप्रदूषणाचा सामना देखील करावा लागतो. माझ्यातील प्राणवायूची पातळी झपाट्याने खालावत आहो त्यामुळे जलचर धोक्यात आले आहेत. नदीतील पाण्यातील वाढते प्रदूषण त्याचे मुख्य कारण आहे. मात्र, माणसांचा एक वर्ग आहे तो मला स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी सक्रिय असतो. माझ्यातील कचरा, गाळ काढला जातो. तो वर्ग जनमानसात मी स्वच्छ राहावी म्हणून जनजागृती मोहीम देखील करीत असतो. गेल्या दहा वर्षांत माझे पाणी स्वच्छ झाले आहे. भविष्यात मी पूर्णपणे स्वच्छ आणि निर्मळ याची मला खात्री आहे. माझे पाणी स्वच्छ रहाण्यासाठी तुमचेही सहकार्य मिळावे ही सदिच्छा.
माझी आत्मकथा ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार! (Nadichi Atmakatha in Marathi Nibandh).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
0 टिप्पण्या