My Favourite Saint Essay in Marathi महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, चक्रधर स्वामी, संत गोरोबा, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि समर्थ रामदास या संतांच्या मांदियाळीने बहुमोल असे साहित्य निर्माण करून जनसामान्यापर्यंत अध्यात्माचे विचार नेले आणि सामान्य जनतेला अध्यात्माची गोडी लावण्याचे एक महान ऐतिहासिक कार्य केले आहे. सर्व संतांची शिकवण सारखीच असते. परंतु मला आवडलेले संत म्हणजे, संत तुकाराम. (Sant Tukaram Information in Marathi).

संत तुकाराम महाराज निबंध मराठी  । संत तुकाराम माहिती  । माझा आवडता संत निबंध मराठी । माझा आवडता संत तुकाराम निबंध मराठी । संत तुकाराम माहिती मराठी । संत तुकाराम माहिती मराठी अभंग । संत तुकाराम महाराज जीवन चरित्र । my favourite saint essay in marathi । maza avadta sant essay in marathi | Sant Tukaram Information in marathi

या संतांच्या मालिकेत संत तुकारामांचे स्थान बहुमोल आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माचा पाया रचला त्याचा झगमगता कळस म्हणजे संत तुकाराम महाराज होय.

संत तुकारामांचा जन्म इ.स १६०८ मध्ये पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला. संत तुकारामांच्या वडिलांचे नाव बोल्होबा अंबिले होते. तर आईचे नाव कनकाई होते. संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबाअंबिले होते. त्यांना सावजी हा मोठा भाऊ तर कान्होबा हा धाकटा भाऊ होता. असे सांगितले जाते की, तुकाराम महाराजांचे दोन विवाह झाले. पहिल्या विवाहाच्या वेळी ते तेरा वर्षाचे होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रखुमाबाई होते. या रखुमाबाईला दम्याचा आजार असल्यामुळे पुणे येथील श्रीमंत सावकार आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई ऊर्फ आवली हिच्यासोबत तुकारामांचा दुसरा विवाह झाला.


तुकाराम महाराज सतरा वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. पुढे इ.स. १६२८ मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. अन्न पाण्याअभावी माणसं, पशुपक्षी, गुरेढोरे भूकेने मृत्यू पावली. त्यातच त्यांची पहिली पत्नी रखुमाबाई यांचाही मृत्यू झाला. मोठ्या मुलाचाही मृत्यू झाला. यामुळे तुकारामांच्या मनावर मोठा आघात झाला. दारिद्र व अपमान यामुळे तुकारामाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. अशा परिस्थतीत त्यांनी आपले मन परमार्थाकडे वळविले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांना गुरु मानत. संत बहिणाबाई ही तुकोबांची शिष्या होती.

तुकाराम महाराजांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे ठरतात. समाजामध्ये असलेले भेदभाव, स्त्री - पुरूष समानता, मनाची अवस्था, पर्यावर, मूल्यशिक्षण , योगशिक्षण, संपत्ती बद्दलचे विवेचन, श्रध्दा, अंधश्रध्दा याबाबतीत महाराजांचे विचार प्रभावी ठरतात. त्यामुळे महाराजांच्या अभंगातून व्यक्त होणारा वैज्ञानिक दृष्टिकोन अभ्यासण्यासाठी संशोधकाने हे संशोधन हाती घेतले आहे. (संत तुकाराम महाराज निबंध मराठी).

संत तुकारामांचे सामाजिक विचार

जग पाहता हे लटिके सकळ । मज कोठे मायाजाळ दावी देवा ।।

संत तुकाराम महाराज म्हणतात, जग हे मिथ्या आहे. समाजाचा त्याग करून जीवनातील परमतत्त्वाचा साक्षात्कार होणे शक्यच नाही. समाजाच्या विविध रूपांवरच तुकारामाची अभंग रचना उभी आहे. तुकारामांनी माणसाच्या वैयक्तिक चारित्र्याच्या शुद्धतेबरोबरच त्याचे सामाजिक चारित्र्यही शुद्ध असावे असा आग्रह धरला. देवदेवतांची अर्थशुन्य पुजा, भल भलत्या उपासना पद्धती, अंधश्रद्धा, देवदेवतांच्या नावाने चालणारे ढोंग आणि अन्याय, जातीव्यवस्थेमुळे वाढणारी विषमता, अशा अनेक सामाजिक दोषांवर त्यांनी प्रहार केला. माणसातील सात्विकता, सुजाणता, चांगुलपणा जागा केला. समाजमन कणखर राहावे, निर्मळ भक्तीचा आधार त्याला मिळावा आणि बहुजन समाजाला आध्यात्माचा मार्ग खुला व्हावा यासाठी तुकारामांनी आयुष्यभर प्रयत्न केले. समाजातील नैतिक उन्नती व्हावी यासाठी तळमळीने कार्य केले. सर्वसामान्य माणूस त्यांच्या अभंगांनी प्रभावित झाला. संत तुकारामांच्या साहित्याने प्रभावित होऊन भारताचे शिल्पकार महादेव गोविंद रानडे यांनी तुकारामांचे स्तवन केले आहे. ह.भ.प. ल. रा. पांगारकर यांची तुकाराम भक्ती प्रसिद्ध आहे. (My Favourite Saint Essay in Marathi).

पंढरपूरचा विठोबा जसा महाराष्ट्रीय समाजाच्या हृदयामध्ये आदरपूर्वक प्रस्थापित झाला आहे. त्याचप्रमाणे त्याचा परमभक्त संत तुकाराम यांनाही महाराष्ट्राच्या मनामध्ये अलौकिक स्वरूपाचे स्थान मिळाले आहे.

संत तुकाराम माहिती मराठी अभंग


संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. वारकरी संप्रदायातील समुदाय त्यांना जगतगुरु या नावाने ओळखतात. ते परखड कवी होते. पाखंडी, अन्यायी, पापी लोकांवर संत तुकारामांनी आपल्या आपल्या अभंगवाणीतून कठोर प्रहार केले आहेत. नम्रता आणि करुणा याचे दर्शन त्यांच्या अभंगातून होते. संत तुकारामांनी सामान्यांच्या बोलीभाषेत अभंग रचना केली. त्यांनी औपचारिक शिक्षण घेतेले नसले तरीही जीवनानुभाव आणि धार्मिक, सामाजिक प्रथा-परंपरा संबंधित सखोल चिंतन करून ज्ञान प्राप्ती केली. तुकाराम महाराजांनी जवळपास ४१४१ अभंग रचना केलेली आहे. या अभंगरचना आजही मोठमोठ्या विद्वानांना भुरळ पडतात.

महाराष्ट्रातील लाखो लोकांमध्ये संत तुकाराम अत्यंत लोकप्रिय आहेत. या सर्वानाच तुकारामाच्या अभंगांतील काही म्हणी वा काही ओळी तरी तोंडपाठ असतातच. अनेकांना बरेच अभंग पाठ असतात. मराठी लोकांचा महाराष्ट्रातील सर्व सतकवींमध्ये संत तुकारामावरच सर्वात जास्त लळा आहे. साहित्याच्या भारतीय व परदेशी अभ्यासकांनी तुकारामाचा मराठी भाषिक लोकांवर विलक्षण प्रभाव असल्याचे नमूद केलेले आहे. अगदी आजही आषाढी कार्तिकीच्या दिंडयांमधून अगणित ग्रामीण जनता तुकारामाचे अभंग तल्लीन होऊन गात आहेत.

संत तुकारामांनी शिक्षणाच्या उपयुक्ततेच्या संदर्भात अनेक अभंगाचे लिखाण केलेले आहे. आजच्या काळात शिक्षण, प्रबोधन आणि प्रचारासाठी तुकारामांच्या साहित्याचा उपयोग होईल. संत तुकारामांच्या साहित्यातून सकारात्मक मनोवृत्ती तयार होते. आजच्या सामाजिक परिस्थितीत संत तुकारामांचे विचार लागू पडतात. संत तुकारामांचा अभंगातून अनेक जीवन मूल्यांची रुजवणूक होते. (Maza Avadta Sant Essay).

संत तुकाराम महाराज निबंध मराठी

संत तुकारामांची ओळख करून घेताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपला काळ हा विज्ञानाचा आणि राजकारणाचा काळ आहे. आजच्या काळात भौतिक सुखांना जास्त महत्व दिले जाते. याशिवाय सामाजिक कार्यापासून साहित्याची नाळ तुटली आहे. अशा वेळसी संत तुकारामांचे अभंग म्हणजे आपल्यासाठी संजीवनीच आहे.

वयाची चाळीशी उलटल्यानंतर संत तुकारामांना जग सोडावे असे वाटू लागले. वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांचे निर्याण झाले. ९ मार्च, १६५० हा त्यांचा निर्याणदिन म्हणून मनाला जातो. तुकाराम महाराज विमानात बसून सदेह वैकुंठास गेले असे चरित्रग्रंथात आणि कीर्तनात सांगितले जाते. त्यांचा देहच ब्रह्मरूप बनला, त्यामुळे ते सदेह वैकुंठात गेले असे दुसऱ्या शब्दात म्हणू शकतो. देहू येथे तुकारामांची समाधी आहे.

आपण तुकारामांच्या गाथेमधील आजही मराठी भाषेतील अनेक म्हणी, वाक्यप्रचार आणि शब्दप्रयोग बोलत असतो. आजही संत तुकारामांचे अभंग समाजाला नवी दिशा देत आहेत. आज एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञान, औदयोगिक क्षेत्रात खूप प्रगती केली असली तरीही समाजात वावरताना आपणास अनके सामाजिक, कौटुंबिक समस्या निर्माण होत असतात.  त्यातून तुकोबांच्या अभंगातून नक्कीच मार्ग सापडेल. आपल्या देशात संत तुकारामांसारखे महान संत जन्मास आले हे आपले अहोभाग्यच! अशा या महान संताला माझे शतशः नमन! (Maza Avadta Sant Essay in Marathi).

संत तुकाराम महाराज प्रश्नोउत्तरे -

१) संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय?

उत्तर - संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबाअंबिले होते.

२) संत तुकाराम महाराजांचा जन्म कोठे झाला?

उत्तर - पुणे जिल्ह्यातील देहू या गावी संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला.

३) संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?

उत्तर - पुणे जिल्ह्यातील देहू हे संत तुकारामांचे गाव आहे. 

४) संत तुकाराम महाराजांची समाधी कोठे आहे?

उत्तर - पुण्यातील देहू या गावी संत तुकारामांची समाधी आहे.

५) संत तुकारामांची शिष्या कोण?

उत्तर - संत बहिणाबाई ही संत तुकारामांची शिष्या होती.

(Sant Tukaram Information in Marathi).


या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

• संत ज्ञानेश्वर यांची माहिती

 संत एकनाथ महाराजांची माहिती