माझी आई निबंध मराठी 10 ओळी । माझी आई निबंध मराठी 20 ओळी  । माझी आई निबंध मराठी 50 ओळी । माझी आई निबंध मराठी 300 शब्द । मला भावलेली आदर्श आई निबंध । माझी आई माहिती । माझी आई भाषण । मराठी निबंध दाखवा । निबंध मराठी माझी आई ।आई माझी मायेचा सागर | Mazi Aai Essay in Marathi | Majhi Aai Essay in Marathi for 5th std | Majhi Aai Essay in Marathi for 6th std | Majhi Aai Essay in Marathi for 7th std | my mother essay in marathi

मला भावलेली आदर्श आई निबंध

Majhi Aai Nibandh Marathi 'आई' हा शब्द जगातील अतिशय प्रेमळ आणि सुंदर शब्द आहे. आई हा शब्द जरी साधा, सोपा वाटला तरी संपूर्ण जगाला सामावून घेण्याची ताकद या शब्दात आहे. आपण आईशिवाय जीवनाची अपेक्षाच करू शकत नाही, म्हणून आपण आईचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. खरंतर शब्दांत, माझ्या आईची थोरवी सांगण्यासाठी मला शब्द देखील अपुरे पडतील. आईंचे महत्व सांगण्याएवढा मी नक्कीच मोठा नाही. तरीही माझ्या जीवनातील सर्वात महत्वाच स्थान असणारी 'माझी आई' तिच्याबद्दल मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. (My Mother Essay in Marathi).

माझी आई निबंध मराठी 10 ओळी । माझी आई निबंध मराठी 20 ओळी  । माझी आई निबंध मराठी 50 ओळी । माझी आई निबंध मराठी 300 शब्द । मला भावलेली आदर्श आई निबंध । माझी आई माहिती । माझी आई भाषण । मराठी निबंध दाखवा । निबंध मराठी माझी आई ।आई माझी मायेचा सागर | Mazi Aai Essay in Marathi | Majhi Aai Essay in Marathi for 5th std | Majhi Aai Essay in Marathi for 6th std | Majhi Aai Essay in Marathi for 7th std

माझी आई निबंध मराठी 10 ओळी


माझ्या आईचं नाव अंजली आहे. ती एक गृहणी आहे. याशिवाय ती उच्च शिक्षित आणि हुशार आहे. ती खूप मेहनती आणि कुटूंबातील सगळ्यांची काळजी घेत असते. ती एक प्रेमळ आणि दयाळू स्त्री आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चांगल्या वाईट काळात आई आपल्या सोबत असते. आई-मुलाचे नाते अनमोल असते. ते कधीही तुटू शकणार नाही. आई ही प्रेमाची, समर्पणाची, सौजन्याची आणि संवेदनशीलतेची प्रतिमा आहे. आई ही आपल्या जीवनातील पहिली गुरु आणि शिक्षक असते. आईंच्या मार्गदर्शनावर जीवन जगणे हे सदैव आपल्यासाठी एक सुखद अनुभव असतो. आई हा असंख्य माणसांच्या जीवनात असलेल्या मार्गदर्शक आणि उत्तम शिक्षक आहे. (My Mother Essay 10 lines)

माझी आई निबंध मराठी 20 ओळी

आई हा संसारातील सर्वात महत्वाचा व्यक्ती आहे. मुलांना जन्म देण्याची प्रथम कृती असते. मुलांना जन्म देणं हे तिच्यासाठी जगातली सर्वात मोठा उत्साह आणि उत्सुकता असते. आई तिच्या संपूर्ण जीवनात तिच्या मुलांना आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असते. तिने दिलेल्या संस्कारामुळे आपण घडत असतो. माझी आई सुद्धा मला घडविण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेत असते. ती सकाळी लवकर सगळ्यांच्या अगोदर उठते. देवपूजा करते. स्वयंपाक करते व माझा अभ्यासही घेते. माझ्यासाठी छान छान पदार्थ देखील बनवते. घरातील प्रत्येक व्यक्तीला काय हवं नको याकडे तिचे बारीक लक्ष असते. मी कधी आजारी पडलो तर ती रात्रभर जागते आणि माझी काळजी घेत असते. माझी आई मला नवनवीन गोष्टी शिकवीत असते. काय चांगले व काय वाईट याबद्दलही सांगत असते. माझ्याकडून काही चूक झाली किवा मी चुकीचे वागले तर रागावतेसुद्धा पण नंतर प्रेमाने जवळही घेते. तिचा मला खूप आधार वाटतो. माझी आई मला खूप खूप आवडते. आपल्याला जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्या देवाप्रमाणे आपले आयुष्य घडवते. आई म्हणजे आपल्या मुलांवर निरंतर माया लावणारी, सतत त्यांची काळजी घेणारी, निस्वार्थ मनाची देवाच्या रूपात अवतरलेली मूर्ती. (My Mother Essay 20 lines).

माझी आई निबंध मराठी 50 ओळी (माझी आई निबंध मराठी ३०० शब्द)


आपली आई आपल्यासाठी खूप झटत असते, खूप काही गोष्टी करते तरीही आपण तिच्याकडे दुर्लक्ष करून स्तुती करायला कमी पडतो. पण खरचं तिने केलेल्या कामाचे किँवा कधीतरी तिने बनविलेल्या पदार्थाचे आपण कौतूक केले तर तिलाही किती छान वाटेल याचा आपण विचार केला पाहिजे. पहिला शब्द जो मी उच्चारला, पहिला घास जिने मला भरविला, हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले आणि मी आजारी असताना जिने माझ्या अंथरुणापाशी रात्रंदिवस काढले, ती फक्त माझी आई. 

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा 

आई म्हणजे साठा सुखाचा

आई म्हणजे मैत्रीण गोड

आई म्हणजे मायेची ओढ

असं म्हटलं जातं की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. आई नोकरी करत नाही किंवा पैसे कमवत नाही पण घर सांभाळण्याची मोठी जबाबदारी ती विनामूल्य पार पाडत असते. देवाने मला इतकी सुंदर आई दिली, त्यामुळे मी देवाची सदैव ऋणी आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते. या जगात आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आईमुळेच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो.

जीवनामध्ये आईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आई असल्यामुळे घराला घर पण येत असते. आईच्या अवतीभवती सारे विश्व सामावलेले असते. तिच्या अस्तित्वाच्या खुणा घरभर असतात. जेव्हा ती असते तेव्हा जाणवत नाही आणि नसली तरीही नाही म्हणवत नाही. मुले मोठी झाली की आपापल्या मार्गाने निघून जातात. (My Mother Essay in Marathi).

आई एक नाव असतं 

घरातल्या घरात 

गजबजलेलं गाव असतं !

सर्वात असते तेव्हा जाणवत नाही

आता नसली कुठंच

तरीही नाही म्हणवत नाही !

आई प्रत्येकाच्या मनात घर करून असते. आई सर्व घराला जोडून ठेवणारा धागा असते. जेव्हा गाय हंबरून आपल्या वासराला चाटते, तेव्हा आपले वात्सल्य दाखवते. त्या गाईच्या वात्सल्यामध्ये आपल्या आईचे वात्सल्य दिसून येते. (My Mother Essay 50 lines).

आईविषयी जितके बोलावं तितके कमीच आहे. माझी आई आमच्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ आहे. आपण कितीही मोठे झालो असलो तरीही आईसाठी आपण लहानच असतो. आई म्हणजे वासराची गाय, लंगड्याचा पाय आणि दुधावरची साय अशा अनेक उपाधींनी आईचे सुंदर वर्णन केले जाते. 

आई माझा गुरु, आई कल्पतरू

सौख्याचा सागरु, आई माझी

मांगल्याचे सार, अमृताची धार

प्रितीचे माहेर, आई माझी, आई माझी.

वाचकमित्रहो, आजच्या इंटरनेटच्या जगात आई सोबत आपला जास्त सवांद होत नाही. आपण सोशल मीडियामध्ये इतके गुंतून गेलो आहोत की आईसोबत बोलायला आपल्याकडे बोलायला वेळ नाही. मदर्स डे ला नुसता आईसोबत पोस्ट केलेल्या फोटोवरून आईविषयी प्रेम सिद्ध होत नाही. तर वेळोवेळी आईला केलेली मदत, आपल्या आईला आपण दिलेला वेळ आणि तिच्यासोबत बोललेले चार ते शब्द  हेच मदर्स डे चे आईसाठी खरे गिफ्ट असेल. शेवटी एवढंच म्हणेन, 

आई साठी काय काय लिहू

आई साठी कसे लिहू

आईसाठी पुरतील एवढे 

शब्द नाहीत कोठे

आई वरती लिहण्याइतपत

नाही माझे व्यक्तिमत्व मोठे.

(My Mother Essay in Marathi).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात