एमपीएससी म्हणजे काय? | एमपीएससी परीक्षा माहिती MPSC Exam Information in Marathi

एमपीएससी म्हणजे काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ही भारतीय राज्य घटनेने अनुच्छेद ३१५ अन्वये अर्जदाराच्या आरक्षणांच्या नियमांनुसार भारतीय राज्यासाठी गट 'अ आणि गट 'ब सिव्हिल सेवक निवडण्यासाठी तयार केलेली एक संस्था आहे. (MPSC - Maharashtra Public Service Commission).

एमपीएससी परीक्षा माहिती | एमपीएससी म्हणजे काय | एमपीएससी परीक्षा वेळापत्रक 2024 | एमपीएससी परीक्षा प्रश्नपत्रिका | एमपीएससी अभ्यासक्रम| एमपीएससी यूपीएससी परीक्षा बद्दल माहिती | Upsc म्हणजे काय | mpsc exam information in marathi एमपीएससी परीक्षा माहिती | mpsc syllabus in marathi | mpsc information in marathi | mpsc marathi question paper | mpsc exam age limit | mpsc exam eligibility criteria | mpsc exam educational qualification | mpsc full form in marathi

एमपीएस ही संस्था विविध शासकीय पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करतात. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाचे कार्य सुरळीतपणे चालत असते. याचबरोबर उमेदवार निवड करण्याचे नियम, बढती, नोकरी बदली आणि शिस्तभंगाची कारवाई  इत्यादीसारखें  निर्णय एमपीएस संस्था घेते. MPSC संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. (MPSC Exam Information in Marathi).

एमपीएससी अंतर्गत येणाऱ्या परिक्षा


केंद्र शासनस्तरावर नागरी सेवा परीक्षा व राज्य शासन स्तरावर राज्य सेवा परीक्षा यात काही प्रमाणात समानता आहे. उदा. या दोन्हीही सेवा परीक्षामुळे अधिकारी स्तरासाठी निवड होते. गट - अ आणि गट - ब या दोन्ही स्तरावर अधिकारी पदांच्यानिवडी एमपीएससी अंतर्गत होते. या दोन्ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा या तीन टप्प्यात होते. MPSC अंतर्गत येणाऱ्या काही परिक्षा खालीलप्रमाणे आहेत.

एमपीएससी मार्फत राज्यात खालील प्रशासकीय पदाच्या परीक्षा घेतल्या जातात - MPSC MPSC Exam Information

1. उपजिल्हाधिकारी (Deputy Collecto)

2. पोलीस उप-अधीक्षक (Depury Superintendent of Police)

3. तहसीलदार

4. नायब तहसीलदार

5. विक्री कर सहायक आयुक्त (Assistant Commissioner of Sales Tax)

6. सहायक संचालक, वित्त व लेख विभाग (Asistant Director, Finance and Accounts

Department)

7. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Assistant Regional Transport oficer)

8. गट विकास अधिकारी (Block Development Oficer : BDO)

9. पोलीस उप-निरीक्षक (Police Sub-lnspector)

10. मुख्याधिकारी, नगर पालिका/नगर परिषद (Chief ofier)

11. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy Chief Executive oicer)

12. उपनिबंधक, सहकारी संस्था (Depury Regisuar Co-operative Sociery)

यांसारखी पदे एमपीएससी अंतर्गत भरण्यात येतात. यांसारख्या पदांसाठी, राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना  मुलाखतीसाठी बोलावले जाते. या पदांकरिता दरवर्षी अर्ज मागविले जातात. उमेदवारांना अर्ज करायचा असल्यास Online भरण्यासाठी  mpsc.gov.in ही वेब साईटद्वारे करता येऊ शकतो. या वेबसाईटवर सर्व प्रकारच्या प्रशासकीय पदासंबंधी माहिती मिळते.

याव्यतिरिक्त गट - ब वर्गातील PSI/STI/ASST पदाकरिता विशेषतः पूर्व व मुख्य या स्वरुपात परीक्षा घेतल्या जातात. या पदांकरिता अर्जदार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा लागतो. याशिवाय महाराष्ट्र राज्य आयोगाद्वारे संबंधित शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्यांकरिता राज्य स्तरावर परीक्षा या घेतल्या जातात. जसे की,

1. महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षा

2. वन सेवा परीक्षा

3. कृषी सेवा परीक्षा

4. दिवाणी न्यायाधीश परीक्षा

5. महिला व बालविकास परीक्षा

MPSC वेतन व भते MPSC Salary and Allowances:

विविध पदांकरिता वेगवेगळे वेतन देण्यात येते. हे वेतन वेळोवेळी बदलत जाते. (साधारण वेतन 15,600-39,100 + 5,400 महागाई भत्ता आणि इतर भत्ते).

MPSC परीक्षेसाठीची पात्रता MPSC Exam Eliglbility Criteria:

1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

वयोमर्यादा: उमेदवाराचे किमान वय १९ व जास्तीत जास्त ३८ वर्ष असावे. परंतु, शासनाद्वारे वेळो-वेळी वयोमर्यादेमध्ये सवलती लागू केल्या जातात. MPSC exam age limit.

• खुला प्रवर्ग/ अमागास (Open General Category) उमेदवारांकरिता वयोमर्यादाः ३८ वर्ष

• इ.मा.व. (O.B.C.) उमेदवारांकरिता वयोमर्यादाः ४३ वर्ष

• अनुसूचित जातीजमाती (SC/ST) उमेदवारांकरिता वयोमर्यादा : ४३ वर्ष

• दिव्यांग उमेदवार (Pesons with Disability) : ४५ वर्ष

• प्राविण्य प्राप्त खेळाडू (Qualified Players): ४३ वर्षे

• माजी सैनिक (Ex-Servicemen): ४८ वर्षे

MPSC परीक्षेसाठी शैक्षणीक पात्रता MPSC Exam Educational Qualification:

• उमेदवाराने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थीदेखील ही परीक्षा देऊ शकतात.

• मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

• काही विशेष पदांकरिता जसे की, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक संचालक, वित व लेख विभाग इत्यादी उमेदवारांना विशिष्ट विषयांचे ज्ञान किंवा कौशल्य असणे आवश्यक आहे.

• तसेच, पोलीस उप-अधीक्षक (DySP), पोलीस उप-निरीक्षक (PSI) आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Assistant RTO) इत्यादी पदांकरिता शारीरिक अटींची गरजेची असते. (MPSC exam educational qualification).

एमपीएससी आरक्षण MPSC Reservation:

शासनाच्या परिपत्रकांनुसार एमपीएससी परीक्षेमध्ये आरक्षणाचा लाभ मिळतो.

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम - MPSC Exam Syllabus

• PSI/ STI/ ASST या पदांकरिता सामान्य ज्ञान हा एक पेपर असतो. याशिवाय, प्रश्न पत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी (Objective) असते.

• परीक्षेत एकूण १५० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला २ गुण दिले जातात. संपूर्ण पेपर एकूण ३०० गुणांचा असतो.

• परीक्षेकरिता निर्धारित वेळ ९० मिनिटे इतकी असते.

• परीक्षेत विचारलेल्या १५० प्रश्नांपैकी २० प्रश्न अंकगणितावर आधारित असतात व उर्वरित प्रश्न हे सामन्य ज्ञानवर विचारले जातात.

• परीक्षा ही नकारात्मक स्वरुपाची असते म्हणून, चुकीच्या उत्तरला गुण कमी होतात. अभ्यासक्रम कला शाखेसंबंधी महत्वपूर्ण घटक खालीलप्रमाणे आहेत.

• भारताचा  आणि महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास

• जगाचा आणि भारताचा भूगोल, महाराष्ट्राची भौगोलिक माहिती

• नागरिकशास्त्र, राज्यघटना, राज्यव्यवस्था इत्यादी विषय

• महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक यांची माहिती.

• भारताच्या पंचवर्षीय योजनासंबंधी माहिती

• भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्परती शास्त्र व आरोग्य शास्त्र

• बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, काम काळ वेग, शेकडेवारी, नफा तोटा, इत्यादी.

• राष्ट्रीय तसचं, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

या प्रकारे आपणास पूर्व परीक्षेची तयारी करावी लागते.

मुख्य परीक्षेकरिता आवश्यक असणारा अभ्यासक्रम - MPSC Syllabus: MPSC Mains Exam Pattern

मुख्य परीक्षा २०० गुणांची बहूपर्यायी स्वरूपाची असते. ही परीक्षा ही दोन टप्यात घेतली जाते आणि प्रत्येक पेपर हा २०० गुणांचा असतो. (MPSC Syllabus in Marathi).

पेपर क्र. 1:  इंग्रजी व मराठी

पेपर हा एकूण 200 गुणांचा असून त्यास सुमारे 2 तासांचा कालावधी देण्यात येतो. चुकीच्या उत्तरास गुण कमी केले जातात. शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी आणि अर्थ अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

पेपर क्र. 2: सामान्य ज्ञान व बुद्धिमापन

परीक्षा ही 200 गुणांची असून सुमारे 200 प्रश्न विचारले जातात. त्याकरिता सुमारे २ तासाचा कालावधी देण्यात येतो.

कला शाखे संबंधित प्रश्न:- आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल व ग्राम प्रशासन

भारतीय अर्थव्यवस्था:- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, लोकसंख्या, बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय निती तसचं, बँक व्यवस्था.

पंचवार्षिक योजना

शासकीय अर्थव्यवस्था:- वार्षिक अर्थसंकल्प व लेखा परीक्षण इत्यादी.

विज्ञान व कृषिविषयक घटक

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी बुद्धिमापन चाचणी अशा स्वरुपात मुख्य परीक्षा घेतली जाते. शारीरिक पात्रतेसंबंधी महिला व पुरुष उमेदवारांना आवश्यक असणारी पात्रता पुरुष

• उंची किमान १६५ सेमी असावी.

• छाती न फुगविता ७९ सेमी व किमान ५ सेमी वाढवण्याची क्षमता असते.

चाचणी स्वरूप एकूण २०० गुण.

एमपीएससी परीक्षा माहिती | एमपीएससी म्हणजे काय | एमपीएससी परीक्षा वेळापत्रक 2024 | एमपीएससी परीक्षा प्रश्नपत्रिका | एमपीएससी अभ्यासक्रम| एमपीएससी यूपीएससी परीक्षा बद्दल माहिती | Upsc म्हणजे काय | mpsc exam information in marathi एमपीएससी परीक्षा माहिती | mpsc syllabus in marathi | mpsc information in marathi | mpsc marathi question paper | mpsc exam age limit | mpsc exam eligibility criteria | mpsc exam educational qualification | mpsc full form in marathi

महिला शारीरिक चाचणी 

• उंची किमान १५७ सेमी 

चाचणीचे स्वरूप एकूण २०० गुण 

एमपीएससी परीक्षा माहिती | एमपीएससी म्हणजे काय | एमपीएससी परीक्षा वेळापत्रक 2024 | एमपीएससी परीक्षा प्रश्नपत्रिका | एमपीएससी अभ्यासक्रम| एमपीएससी यूपीएससी परीक्षा बद्दल माहिती | Upsc म्हणजे काय | mpsc exam information in marathi एमपीएससी परीक्षा माहिती | mpsc syllabus in marathi | mpsc information in marathi | mpsc marathi question paper | mpsc exam age limit | mpsc exam eligibility criteria | mpsc exam educational qualification | mpsc full form in marathi

एमपीएससी मुलाखत MPSC Interview:

• मुलाखत : मुख्य परीक्षेमध्ये आयोगाने ठरवून दिलेल्या कमीत कमी गुण (cut off ) किंवा त्या पेक्षा जास्त गुण मिळवलेले उमेदवार हे मुलाखतीसाठी पात्र ठरतात.

• मुलाखत (राज्य सेवा परीक्षा : 100 गुण आणि दुख्यम सेवा परीक्षा : 40 गुण : PSI (पोलीस उप-निरीक्षक) घेतल्या जाते. यामध्ये मुख्यत्वे उमेदवाराचे व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

• एखाद्या विषयाला आपण कसे सामोरे जाऊ, निर्णय घेण्याची क्षमता, तसेच एखाद्या विषयावरील आपली मते काय? असे प्रश्न येथे प्रामुख्याने विचारण्यात येतात.

आपण जास्तीत जास्त किती वेळा ही परीक्षा देऊ शकतो : Number of Atempts:

नुकत्याच शासनाने दिलेल्या शासन निर्णयानुसार,

• खुल्या प्रवर्गातील उमेदवार जास्तीत जास्त ६ वेळा

• इमाव प्रवर्गातील उमेदवार ९ वेळा तर

• अनुसुचीत जाती. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार ही परीक्षा किती पण वेळा देऊ शकतात.

अभ्याक्रमातील घटक Conmponents in syllabus:

परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा ठराविक नसून विविध विषयांवर आधारित आहे. त्या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात.

1. मराठी: यामध्ये खालील महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.

• मराठी व्याकरण

• साहित्य

• लेखक व पुस्तके

• म्हणी व वाकप्रचार

• संत साहित्य

• लेखक व त्यांची टोपण नावे इ.

2. English: यामध्ये खालील महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.

• English Grammar

• Comprehension

• Sentence Formation

• Vocabulary

• Phrases

• Writing skill

इ. बाबीबद्दल प्रश्न विचारल्या जातात.

3. भूगोल: भूगोल विषयामध्ये भारताचा आणि महाराष्ट्र राज्याच्या भूगोलाबद्दल प्रश्न विचारले जातात. उदाहरण-

• प्राकृतिक भूगोल

• भौगोलिक स्थान

• क्षेत्रफळ, अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्थार

• नद्या व टेकड्या

• शेती व पिके

• व्यापार

• साधन सामुगी, खनिजे, योजना इ.

4. इतिहास: इतिहासमध्ये प्रामुख्याने,

• प्राचीन, मध्ययुगीन, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रोतर भारत

• कला व संस्कृती

• प्रांतीय नृत्य प्रकार, बोलीभाषा, सण-उत्सव

• राजे व त्यांची राज्ये इ.

5. विज्ञान: यामध्ये प्रामुख्याने

• जीवशास्त्र

• वनस्पतीशास्त्र

• जीवाणू - विषाणू व त्यांमुळे होणारे आजार

• रसायनशास्त्र

• भौतिकशास्त्र इ.

7. सामान्य ज्ञान: सामान्य ज्ञान या विषयामध्ये जागतिक, भारतातील, महाराष्ट्रातील सर्वात मोठे-लहान, लांब-आखूड देशातील उच्च पदस्थ व्यक्ती नवीन शासकीय नेमणुका, अर्थव्यवस्था, इ. विषयांवर प्रश्न विचारले जातात.

राज्यशास्त्र: यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.

• भारताची राज्यधटना

• आजी- माजी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री

• प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांची कार्ये व नेमणूक.

• पंचायतराज व्यवस्था इ.

8. गणित: यामध्ये,

• लसावी मसावी

• समीकरणे

• नफा तोटा

• सरळ व्याज चक्रवाढ व्याज

• सरासरी

• काळ, काम, वेग

• भागीदारी

• पूर्णांक-अपूर्णांक

• टक्केवारी इ.

9. तर्कशास्त्र: यामध्ये काही प्रश्न तार्किक बुद्धीच्या आधारे सोडवावी लागतात. यामध्ये प्रामुख्याने,

• आकृत्या पूर्ण करा

• त्रिकोणी संख्या

• वेगळा शब्द ओळखा

• संख्यामाला पूर्ण करा

• बैठक व्यवस्था

इत्यादि विषयांचा समावेश होतो.

10. चालू घडामोडी: जगात, भारतात व महाराष्ट्रातील चालू घडामोडी, नवीन योजना येतात, अर्थव्यवस्था इत्यादि विषयांवरील प्रश्न विचारले जातात.

एमपीएससी अर्ज कसा करायचा How to Aply MPSC:


• अधिकृतसंकेत स्थळाला (Oficial website:https://mpsconline.gov.in/candidate) ला भेट द्या.

• सर्वप्रथम नवीन नोंदणी या पर्यायावर वर 'Click' करा व नोंदणी करून घ्या.

• विचारलेला तपशील/ माहिती भरा.

• तुम्हाला एक username व password मिळेल.

• आता तुमची Profile Create करा.

• तुमचा फोटो व सही Upload करा.

• अर्ज भरा.

• 'My Account' वर click करा.

• परीक्षा फी भरा.

अशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज करता येऊ शकतो.

MPSC परीक्षा शुल्क: MPSC Exam Application Fee:

• राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी - खुला प्रवर्ग/अमागास ५२४/- रू. इतर ३२४/- रू.

• राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खुला प्रवर्ग/अमागास ५२४/- रू. इतर ३२४/- रू.

• दुय्यम सेवा परीक्षाकरिता खुला प्रवर्ग/ अमागास ३७४ रू. इतर २७४ रू.

MPSC ची तयारी कशी करावी How to Prepare for MPSC Exam:

मित्रांनो, अभ्यास करण्याचे वेगळे असे शास्त्र नाही. सुरवातीला नियमित 2-3 तास अभ्यास करावा. हळू- हळू वेळ वाढवा. कारण परीक्षा पास होण्यासाठी साधारणपणे १२-१५ तास दररोज अभ्यास करणे गरजेचे असते.

जरी परीक्षेची पात्रता पदवी उत्तीर्ण असली तरीही पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच जर हळू-हळू अभ्यास करायला सुरुवात केली तर शेवटच्या वर्षांपर्यंत बराचसा अभ्यास पूर्ण होऊ शकतो.

सुरुवातीला अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या. मागील वर्षीचे पेपर काढा, त्यानुसार अभ्यासाला लागा. वेळोवेळी योग्य मार्गदर्शन घ्या. स्वतःच्या नोंदी तयार करा. आपल्या मित्रांसोबत चर्चा करा.

पुस्तके कोणती वापरावी Books for MPSC:

MPSC साठीची ठराविक अशी पुस्तके नाहीत. अभ्यासासाठी आपल्याला एकापेक्षा जास्त पुस्तके वापरावी लागतील. एका विषयाची 2-3 पुस्तके वाचावी. त्यामधून तुम्हाला समजेल अशा सोप्या शब्दांमध्ये स्वतःच्या नोट्स बनवा.

पुस्तके विश्वासाह असावीत. याव्यतिरिक्त तुम्ही Internet च्या माध्यमातून खूप माहिती एकत्रित करू शकता. युट्युबवर अशा विषयांवर अनेक Videos उपलब्ध आहेत. त्यातून देखील आपण आपल्या Notes काढू शकतो.

MPSC परीक्षेसाठी काही महत्वाची पुस्तके : Some Important Books for MPSC:

• भारताचा भूगोल : श्री. सवदी सर

• K. सागर चा ठोकळा

• मराठी व्याकरण : बाळासाहेब शिंदे

• लक्षवेध : चालू घडामोडींसाठी

• भारताचा स्वतंत्र लढा : बिपीन चंद्र

• Indian Polity : एम. लक्ष्मिकांत

ही काही महत्वाची पुस्तके आहेत. याशिवाय सुद्धा बरीच पुस्तके आपल्याला मिळतील. त्यामधून व्यवस्थित Notes तयार करा.

Some Important Tips काही महत्वाच्या Tips:

• सुरुवातीला शासनाची 5 वी ते 12 वी पर्यतची पुस्तके वाचून घ्या.

• अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा.

• नियमितपणे वर्तमान पत्रे वाचण्याची सवय लावा.

• English वर्तमानपत्र वाचा. त्यामध्ये जे शब्द कठीण असतील त्यांचे अर्थ शोधा.

• Group Study ने सुद्धा खूप फायदा होऊ शकतो.

• जे काही वाचले असेल त्यातून स्वतःच्या भाषेत नोट्स बनवा.

• आपल्या मित्रांना प्रश्न विचारा. त्यांनी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उतरे शोधा.

MPSC बद्दल विचारल्या जाणारे नेहमीचे प्रश्न (FAQS):

१. MPSC मधील सर्वोच्च पद कोणते?

उत्तरः MPSC द्वारे भरले जाणारे उप-जिल्हाधिकारी आणि पोलीस उप-अधीक्षक ही दोन सर्वोच्च पदे आहेत.

२. MPSC साठी किती वर्ष अभ्यास करावा लागेल?

उत्तरः हे तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे. जवळपास २-३ वर्ष सतत अभ्यास करून सहज परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता.

३. नोकरीचे ठिकाण कोणते मिळते?

उत्तरः ही परीक्षा महाराष्ट्र शासन आयोजित असल्यामुळे आपल्याला संपूर्ण राज्यात कुठेही नियुक्त केल्या जाऊ शकते.

४. जास्तीत जास्त किती पगार मिळू शकतो?

उत्तरः शासनाने वेळो-वेळी घेतलेल्या निर्णयानुसार पगार हा नेहमी बदलत राहतो. या बद्दलअधिक माहिती करिता MPSC च्या संकेतस्थळावर (website) वर पाहू शकतो.

५. एमपीएससी अर्ज कसा भरायचा?

उत्तरः MPSC साठीचा अर्ज online पद्धतीने भरला जातो.  (https://mpsconline.gov.in/candidate) या लिंक वर जाऊन आपली profile बनवा. यामध्ये आपली संपूर्ण माहिती भसून ठेवा. नंतर जेव्हा भर्ती निघेल तेव्हा अर्ज करा.

६. माझे शिक्षण English माध्यमातून झालेले आहे. मी अर्ज करू शकतो का?

उत्तरः हो. पेपर हा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत असतो. त्यामुळे आपण अर्ज करू शकता.

7. मी MPSC परीक्षेची तयारी शिकवणी (Coaching Class) न लावता करू शकतो का?

उत्तरः होय, परीक्षा उत्तीर्ण होण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी हवी. योग्य पुस्तके वाचन व योग्य असे मार्गदर्शन घेऊन आपण स्वअभ्यास करून, शिकवणी न लावता सुद्धा परीक्षा उत्तीर्ण होता येते.

हे देखील वाचा-

एनडीए म्हणजे काय? NDA Information in Marathi

संगणक म्हणजे काय? Computer Information in Marathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या