एनडीए म्हणजे काय? NDA Information in Marathi

NDA Information in Marathi देशातील अधिका-धिक तरुणांना लष्करात अधिकारी होण्यासाठी त्यांच्यासाठी एक व्यासपीठ हवं होतं. ते व्यासपीठ म्हणजेच NDA (The National Democratic Alliance)  होय. देशसेवा करून, आपले शौर्य दाखवून भारताच्या संरक्षण आणि सन्मानासाठी काहीतरी करून दाखण्याची जिद्द असण्याऱ्या तरुणांसाठी NDA म्हणजे एक राजमार्ग आहे.

एनडीए म्हणजे काय | NDA age limit for girl | nda information in marathi | nda full form in marathi | nda exam information in marathi | nda admission process in marathi | what is nda in marathi | how to join nda after 10th in marathi | how to join nda in marathi

भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांसाठी सक्षम अधिकारी घडवण्याच्या उद्देशाने पुण्यातील खडकवासला येथे NDA अर्थातच राष्ट्रीय संरक्षण प्रोबोधनीची स्थापना सन १९५४ साली करण्यात आली. वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी NDA साठी 400 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यामध्ये 381 मुलं आणि 19 मुलींचा समावेश असतो. निवड करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रवेश परीक्षा घेतली जाते. यासाठी वेळोवेळी जाहिराती प्रसिद्ध होत असतात. या जाहिरातींमध्ये वयोमर्यादा, परिक्षेचा अभ्यासक्रम, अर्ज करण्याची पद्धत, परिक्षाकेंद्र आणि शारिरीक तंदुरुस्तीचे निकष या सगळ्या गोष्टींची माहिती दिली जाते. (NDA information in marathi).

एनडीए (NDA) म्हणजे काय?

एनडीए (NDA) म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रोबोधनी होय. NDA चा फुल फॉर्म होतो National Defence Acadamy. भूदल, वायुदल व नौदल या दलांसाठी प्रशिक्षण दिले जाते. परीक्षेचे विद्यार्थी म्हणजे, भारतीय सशस्त्र सेना, भारतीय वायुसेना, भारतीय नौसेना (Indian Airforce,Indian Army, Indian Navy) मध्ये जाऊ इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी एनडीए (NDA) ची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा केंद्रीय सेवा आयोग म्हणजे UPSC (Union Public Service Commision) द्वारे घेतली जाते. केंद्रीय सेवा आयोगाद्वारे ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. त्यासाठी एप्रिल व सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान साधारणपणे अर्ज भरून घेतले जातात. परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर ही दोन परीक्षेकेंद्रे असतात. (What is NDA in Marathi).

एनडीए (NDA) परीक्षेसाठी पात्रता:


एनडीए परीक्षेसाठी विद्यार्थी भारतीय, नेपाळ, भूटान नागरित्व धारक असावा व त्याचे  वय १६.५ ते १९.५ वर्ष असावं. (NDA age limit for girl).

भारतीय वंशांचे लोकं जे इतर देशातून स्थलांतरित झालेले, परंतु 1962 पूर्वी भारतात भारतात स्थायिक झाले आहेत. ते देखील NDA परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. (NDA Exam Eligibility)

NDA साठी शैक्षणिक पात्रता:

NDA परीक्षा देण्यासाठी 10+2 म्हणजेच 12 वी उत्तीर्ण किंवा शिकत असावा. NDA च्या Army शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवार आर्टस्, कॉमर्स, सायन्स या शाखेतील असावा. आणि हवाई व नौदल शाखेसाठी उमेदवार Physics, Chemistry, Math (PCM) असे विषय असणे आवश्यक असते.

NDA परीक्षा शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता:

उमेदवार शारीरिक, मानसिक चांगला असावा तसेच उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा आजार नसावा. उंची कमीतकमी १५७.५ सें.मी. व वजन उंचीच्या प्रमाणात असावे. (National Defence Academy Marathi Information).

NDA एनडीए परीक्षा आणि अभ्यासक्रम:

NDA च्या निवडीसाठी प्रथम लेखी परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुलाखत घेतली जाते. लेखी परीक्षेमध्ये एक Objective प्रक्रिया असते आणि त्यानंतर Interview प्रकिया होते.

Objective परीक्षा UPSC द्वारे घेतली जाते. ज्यामध्ये, दोन पेपर असतात. पहिला पेपर गणित असतो, जो 300 मार्कांचा असतो. आणि दुसरा म्हणजे General  Knowledge चा 600 मार्कांचा असतो. यामध्ये 200 गुणांचा इंग्रजीचा तर 400 मार्कांचा Physics, Chemistry, General Science, History, Geography, Current Affairs इत्यादी विषयांवर प्रश्न विचारले जातात. (NDA exam syllabus in marathi).

General Knowledge च्या पेपरमध्ये 150 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात. यामध्ये निगेटिव्ह मार्क सुद्धा असतात. गणिताच्या पेपरमध्ये 120 प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला अडीच गुण असतात आणि या पेपरचा अभ्यासक्रम बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. परीक्षा झाल्यानंतर सामान्यपणे 3 महिन्यानंतर निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यांना Services Selection Board (SSB) मार्फत मुलाखतीसाठी बोलावले जाते.

एस.एस.बी मुलाखत SSB Interview:


UPSC द्वारे घेतलेल्या लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एस.एस.बी (Services Selection Board)  मध्ये मुलाखत देणे आवश्यक असते. ही मुलाखत 5 दिवस चालते. मुलाखत दोन टप्प्यात घेतली जाते.

पहिला टप्पा - या टप्प्यात स्क्रिनिंग टेस्ट घेतली जाते. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी असते जसे की, दाखविलेल्या चित्रावरून गोष्ट लिहणे. त्या चित्रावर समूहचर्चा करणे यांचा समावेश असतो. जे उमेदवार पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण होतात. त्यांनाच दुसऱ्या टप्प्यात प्रवेश मिळतो.

दुसरा टप्पा - या टप्प्यात उमेदवाराच्या मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क व वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असतो. मानसशास्त्रीय चाचण्यामध्ये दिलेल्या चित्रावरून गोष्ट लिहणे. दिलेल्या शब्दांवरून वाक्य तयार करणे. विविध परिस्थितीमधून मार्ग शोधणे, गटचर्चा इत्यादी स्वरूपाच्या लेखी चाचण्यांचा समावेश असतो. तसेच जमिनीवरचे विविध अडथळे पार करणे इत्यादी चाचण्या घेतल्या जातात.

हवाई दलात वैमानिक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पायलट ऍप्टिट्यूड बॅटरी चार्ज ज्याला (PABT - Pilot Aptitude Battery Test) म्हणतात. ही आणखी एक चाचणी होत असते.

मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पाचव्या दिवशी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार मुलाखत उत्तीर्ण झाले असतील. त्यांची काही दिवस वैद्यकीय चाचणी घेतली जाते. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना एनडीए आर्मी, नौदल, हवाई दल या शाखांमध्ये आपल्या आवडीनुसार आणि गुणवत्ता यादी च्या स्थानानुसार प्रवेश दिला जातो. (NDA Admission Process in Marathi).

एनडीए प्रशिक्षण NDA Training:

एनडीए प्रशिक्षण कालावधी हा BSC तील बी चार वर्षाचा असतो. येथे विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यास क्रमाबरोबर खडतर शारीरिक प्रशिक्षण पूर्ण करतात. एनडीएमधील तीन वर्षाचा कालावधी हा सहा टर्म मध्ये विभागलेला असतो. तर BE आठ टर्म मध्ये असतो. येथील प्रशिक्षणात 70 टक्के भर अभ्यासावर तर 30 टक्के भर हा शारीरिक प्रशिक्षणावर असतो.

एनडीए - NDA वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

1. एनडीए मध्ये जाण्यासाठी Arts, Commerce किंवा Science यापैकी कम्पलसरी काय घ्यावं लागतं?

एनडीएमध्ये जाण्यासाठी 12 वी Scinece Stream  घेणे फायद्याचे असते. परंतु सक्तीचे नाही. Arts, Commerce चे विद्यार्थीही एनडीएमध्ये प्रवेश मिळवू शकतात. यासाठी 11वी आणि 12वी ला गणित विषय असणे आवश्यक असते.

2. एनडीएसाठी नेमकं Apply कधी करावं?

एनडीए मध्ये प्रवेशासाठी जास्तीत जास्त संधी मिळवायच्या असतील तर एनडीएची पहिली संधी वयात बसत असेल तर 11 वी संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यात घ्यावी. म्हणजे 12 वी च्या सप्टेंबर महिन्यात शेवटची संधी मिळू शकते.

3. एनडीए परीक्षेचा अर्ज कधी आणि कुठे भरायचा?

ऑनलाईन पद्धतीने https://upsc.gov.in/ या वेबसाईटवर विद्यार्थांना अर्ज भरता येईल.

4. कोणते विद्यार्थी NDA परीक्षेसाठी अर्ज करू शकतात?

NDA परीक्षा महिला व पुरुष असे दोन्ही उमेदवार देऊ शकतात.

हे देखील वाचा-

एमपीएससी म्हणजे काय? | एमपीएससी परीक्षा माहिती MPSC Exam Information in Marathi

संगणक म्हणजे काय? Computer Information in Marathi

• जीएसटी म्हणजे काय?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या