संगणक म्हणजे काय?
Computer Information in Marathi सध्या आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत. मानवाचे जीवन संगणकाने संपूर्णपणे व्यापले आहे.. संगणकाने आज प्रत्येक व्यक्तीचे जीवन पूर्णपणे व्यापले आहे. माहिती आणि संप्रेषण (Communication) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जागतिक अंतर कमी झाले आहे. ज्यामध्ये जगभरातील लोक इतर कुणाशीही सहज साधू शकतात. जणूकाही ते जवळच राहतात.
संगणकाचे वैशिष्ट्ये:
असंख्य मनुष्याची कामे वेगाने आणि एकट्याने करणे. कमी जागेत ज्ञानाचा प्रचंड साठा करणे. मागता क्षणीच ज्ञान देणे. अचूक काम करण्यास भाग पाडणे. इत्यादी काही संगणकाचे वैशिष्ट्ये सांगता येऊ शकतात. (Features of Computer).
गती (Speed)
मोठी आणि कठीण कामे संगणक क्षणात करू शकतो. जे काम करण्यासाठी मनुष्याला खूप तास किंवा कित्येक दिवस लागतात. तेच काम संगणक काही क्षणात किंवा मिनटात करू शकतो. संगणकाचा वेग हा मायक्रोसेकंद, नेनोसेकंद आणि अगदी पिकोसकेदांमध्येही मोजला जातो.
अचुकता (Accuracy)
संगणक हा 100% अचूक असतो आणि तो अंकगणितीय गणना आणि तर्कसंगत क्रिया ही तेवढ्याच अचूकतेने करू शकतो, संगणक चुका करू शकतो, मात्र ती चुक मानवाची असते. मानवाने संगणकामध्ये चुकीची सेटिंग्स केल्यामुळे संगणकाकडून चुका होतात.
दीर्घक्षमता (Longevity)
जर तुम्ही सातत्याने 3 तास काम केल्यास, तुम्हाला लक्ष केंद्रित नसल्यासारखे, थकल्यासारखे, झाल्यासारखे वाटते मात्र संगणक हा या सर्वांपासून मुक्त असतो आणि तुम्हाला परिणाम त्यातच वेगाने आणि त्याच अचूकतेने मिळतील.
संगणकाचे उपयोग Benefits of Computer:
संगणकाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम दिसून येतो. अनेक दैनंदिन कामामध्ये त्याचा वापर केला जातो. उदा. स्थानिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रे संगणकाच्या सहाय्याने ऑनलाइन वाचणे. आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी, सहकाऱ्यांशी ते कोणत्याही प्रदेशात असले तरी ईमेल, मेसेंजर, कॉन्फरन्स कॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपर्क करता येऊ शकतो.
संगणक अनेक कामे करू शकतो. संगणक डेटा प्रोसेसिंग, हवामान अंदाज, तिकिटांचे आरक्षणासाठी इत्यादी सारख्या अनेक कामासाठी संगणकाचा वापर केला जातो. (Benefits of Computer in Marathi).
आपल्या जीवनात संगणक खूप महत्वाचा आहे. अनेक कामांसाठी आपण त्याचा उपयोग करतो.
• आपल्या दुकानातील वस्तूंची करण्यासाठी दुकानदार संगणकाचा वापर करतात. बिले बनवण्यासाठी ही ते त्याचा वापर करतात.
• ऑनलाईन बँकेचा आर्थिक व्यवहार करण्यासाठी किंवा खात्यातील पैसे तापसण्यासाठी बँकेत संगणक वापरतात.
• रोग्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी रुग्णालयामध्ये संगणक वापरतात.
• विमानतळावर विमानांचे व्यवस्थापन करण्यासाठी संगणक वापरतात. तो विमान प्रवासी व तिकिटे यांच्या नोंदी ठेवतो.
• तिकिटे काढण्यासाठी आणि आरक्षणासाठी रेल्वे कार्यालयात संगणक वापरतात.
• गेम्स खेळण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी, चित्रे काढण्यासाठी आणि ऑफिस मधील काम करण्यासाठी संगणक वापरला जातो.
संगणकांचा इतिहास History of Computer:
सध्या आपण वापरत असलेला मॉडर्न संगणक मागील अनेक दशकांचे संशोधनाचा परिणाम आहे. आपोआप डाटा प्रक्रियेचा इतिहास (ऑटोमेटिक डाटा प्रोसेसिंग) हा चार्ल्स बॅबेजच्या 1830 मध्ये कैंब्रिज, इंग्लंड मधील आपोआप मशिनी गणनयंत्र (ऑटोमेटिक मेकॅनिकल कॅलक्युलेटर) तयार करण्याच्या प्रयत्नापासून सुरू होतो. (History of Computer in Marathi).
डलास येथे जुलै 1977 मध्ये झालेल्या, राष्ट्रीय संगणक परिषदेमध्ये डल्लास कॉमोड़ोर लिमिटेड ने एका ढाच्यावर संपूर्णपणे असेंबल केलेला मायक्रोकॉम्प्यटर, ज्याला पर्सनल इलेक्ट्रॉंनिक ट्रॉन्स्झेंक्ट किंवा पेट या नावाने ओळखतात, जाहीर करून संगणकीय जगताला सुरूवात केली. त्यानंतर 197 च्या शेवटी, रेड़िऔ शाक कॉरपोरेशनने TRSB0 संगणक जाहिर केला.
1981 मध्ये, इंटरनॅशलन बिझीनेस मशिन्सने (आयबीएम IBM) ने आयबीएम पर्सनल कॉम्प्यूटर्स म्हणुन जाहीर करून मायक्रोकॉम्प्यटर्सच्या क्षेत्रामध्ये आपली पहिली उपस्थिती दाखविली. आयबीएम पीसीच्या आगमनाने, संगणकांनी मोठया संघटना मधून बाहेर पाऊल टाकले आणि घरांमध्ये प्रवेश केला. तथापि, 8-बीट चा मायक्रोप्रोसेसर न स्विकारता, आयबीएमने Intel 8088 - एक 16-बीट मायक्रोप्रोसेसर ज्याने आयबीएम पीसीला एका रात्रीत यशस्वी बनविले.
संगणकाच्या भागांची नावे Computer Parts Name:
संगणक हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्या सहाय्याने बनते. संगणकाची हार्डवेअर संगणकाच्या विविध दृश्य भागांशी निगडित असते. यामध्ये कीबोर्ड, माऊस, मॉनिटर इत्यादींचा समावेश होतो.
संगणकात साधारणतः तीन भाग असतात. इनपुट डिव्हाईसेस, आउटपुट डिव्हाईसेस आणि सिपीयू (CPU- Central Processing Unit). याशिवाय माहिती साठवण्यासाठी उपकरणे (Divices) आणि स्मृती (Memory) यांचाही समावेश होतो. (Computer Parts Name in Marathi).
इनपुट आणि आऊटपुट (Input and Output)
आपण संगणकात जे काही भरतो त्याला (Input) असे म्हणतात. उदा. संगणकात टाईप केलेले शब्द व अंक. नंतर संगणक त्यावर काही काम करतो. त्याला (Output) असे म्हणतात. उदा. संगणकाने दिलेली उत्तरे, नोंदी, टीपा, बिले यांना आऊटपुट म्हणतात.
इनपुट आणि आऊटपुट डिव्हाइसेस
डिव्हाइस (Device) म्हणजे विशिष्ट प्रकारचे काम करणारे मशीन. संगणकाला इनपुट आणि आऊटपुट डिव्हाइसेस आहेत.
संगणकाची इनपुट साधने (Input Devices)
• की बोर्ड (Keyboard)
की बोर्ड हे एक सर्वात महत्वाचे इनपुट डिव्हाइस आहे. स्क्रिनवर शब्द आणि अंक टाइप करण्यासाठी याचा उपयोग होतो.
• माऊस (Mouse)
माऊससुद्धा इनपुट साधन आहे. तो नेहमी माऊस पॅडवर ठेवतात. चित्रे काढण्यासाठी याचा उपयोग होतो.
• स्कॅनर (Scanner)
स्कॅनर हे झेरॉक्स मशीनसारखे असते. संगणकात चित्रे कॉपी (Copy) किंवा स्कॅन (Scan) करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग होतो.
• मायक्रोफोन (Microphone)
संगणकात आवाजाची नोंद करण्यासाठी मायक्रोफोनचा उपयोग होतो.
• वेब कॅमेरा (The Web Camera)
वेब कॅमेरा आपल्या नेहमीच्या कॅमेऱ्याप्रमाणेच त्याच्या समोर जे काही असेल त्याचे फोटो काढतो. परंतु ते तो फिल्मच्या रुपात साठवून (Save) ठेवत नाही. तो ते संगणकात साठवतो.
• जॉयस्टिक (Joystick)
संगणक आणि व्हिडिओ गेम्स खेळण्यासाठी जॉयस्टीकचा उपयोग होतो.
संगणकाची आऊटपुट साधने (Output Devices)
ज्या साधनांचा उपयोग संगणक (कॉम्पुटर) स्क्रीनवर उत्तरे किंवा माहिती (Data) मिळविण्यासाठी होतो. त्याला आऊटपुट साधने म्हणतात. ती खालीलप्रमाणे आहेत.
• मॉनिटर (Monitor)
मॉनिटर हे सर्वसामान्य आऊटपुट साधन आहे. तुम्ही आऊटपुट डेटा (Data) मॉनिटरवर वाचू शकतात.
• स्पीकर्स (Speakers)
जेव्हा आपण संगणकावर गाणी किंवा मूव्ही लावतो तेव्हा त्याचा आवाज स्पीकर्समधून येतो.
• प्रिंटर (Printer)
प्रिंटर हे दुसरे आऊटपुट साधन (Output Divice) आहे. स्क्रीनवर दाखवलेले काम कागदावर छापण्यासाठी प्रिंटरचा उपयोग होतो.
संगणकाची इतर साधने (Other Devices)
• पेन ड्राईव्ह (Pen Drive)
पेन ड्राईव्हच्या मदतीने आपण डेटा (Data) एका संगणकातून दुसऱ्या संगणकात हलवू शकतो. शब्द अंक आणि चित्रे साठविण्यासाठी याचा उपयोग होतो.
• हार्ड डिस्क ड्राईव्ह ( Hard Disk Drive)
हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हणजे संगणकातील अशी जागा जेथे आपण केलेले काम साठवितो. हार्ड डिस्क ड्राईव्ह फार मोठ्या प्रमाणात डेटा साठवू शकतो.
• मॉडेम (Modem)
तुमचा संगणक इंटरनेटशी (Internet) जोडण्यासाठी मॉडेमचा वापर करतात. इलेक्ट्रॉनिक मेल (E-mail) पाठविण्यासाठी किंवा विविध संकेतस्थळांना (Website) भेट देण्यासाठी याचा वापर होतो.
संगणक प्रश्नोउत्तरे
सन १८२२ साली लंडनमधील चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाचा शोध लावला.
पहिल्या संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला. परंतु तो १९९१ पर्यंत बांधला गेला नव्हता. त्यानंतर ॲलन ट्युरिंगने संगणकशास्त्राचा शोध लावला.
चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचे जनक असे म्हटले जाते.
सीपीयूला (CPU) संगणकाचा मेंदू म्हणतात.
हे देखील वाचा-
• एनडीए म्हणजे काय? NDA Information in Marathi
0 टिप्पण्या