Sasa ani Kasav Story in Marathi written एका जंगलामध्ये ससा आणि कासव असे दोन मित्र राहत होते. ते दोघे नेहमीच एकत्र असायचे. एकत्र खेळायचे, दररोज एकत्र फिरायला जायाचे. ससा चालायचा तुरुतुरु आणि कासव चालायचे हळूहळू.
कासवाच्या हळूहळू चालण्याच्या स्वभावामुळे ससा नेहमी त्याची खिल्ली उडववून हसत असे. कासवाला मनातून खुप राग यायचा, पण सशाला तो कधी बोलून दाखवायचा नाही.
एके दिवशी, नेहमीप्रमाणे ससा आणि कासव गेले जंगलात फिरायला. ससा कासवाला चिडवून म्हणाला, "कासवा तू किती रे हळूहळू चालतोस."
कासव म्हणाले, "लावतोस का माझ्यासोबत धावण्याची शर्यत?"
ससा हसून म्हणाला, "हो हो ! पण शर्यत तर मीच जिंकणार बघ."
कासव म्हणाले, "ठीक आहे. ते दूर डोंगरावर वडाचे झाड आहे ना, तिथपर्यंत धावायचे. जो अगोदर पोहचले तो शर्यत जिंकेल."
ससा म्हणाला, “कबूल"
शर्यतीचा दिवस निश्चित झाला. दुसऱ्या दिवशी जंगलातील सगळे प्राणी शर्यत पाहण्यासाठी जमा झाले.
शर्यत सुरू झाली. ससा जोरात धावू लागला. कासव मात्र हळूहळू चालत होते. बघता बघता ससा खूप पुढे गेला. पुढे त्याला हिरवगार कोवळं गवत, मुळा-गाजरचा मळा दिसला. धावून धावून त्याला आता भूकही लागली होती. त्याने मागे वळून पाहिले तर कासव खूपच मागे होते.
सशाने मनात म्हटले, “कासव तर खूप मागे आहे. इथं थांबून थोडा वेळ आराम करावा." असं म्हणून त्याने कोवळ्या हिरव्या गवत, गाजर आणि मुळ्यावर ताव मारला. पोटभर खाल्यावर जवळच्या झाडाच्या थंडगार सावलीत विश्रांती घेत असताना, कधी झोप लागली हे त्याला स्वतःला देखील कळले नाही.
इकडे कासव कुठेही थांबले नाही. ते हळूहळू चालत सशाजवळ आले. ससा झोपलेला पाहून, कासव हसले. पण न थांबता पुढे चालतच राहिले. लवकरच ते वडाच्या झाडाजवळ पोहचले.
थोड्या वेळाने सशाला जाग आली. तो धूम पळत सुटला. पण काहीही उपयोग झाला नाही. कासव तर वडाच्या झाडापाशी आधीच पोचले होते.
कासवाने शर्यत जिंकली आणि सशाची फजिती झाली. सर्व प्राण्यांनी कासवाची प्रशंसा केली. सश्याच्या गर्विष्ठ स्वभावामुळे, मात्र सश्याकडे पाहून सर्व हसत होते.
1 टिप्पण्या
informative info ,Thanks a lot !! Sir/Mam
उत्तर द्याहटवाe pik pahani 2023 start date 1 july 2023
ई पिक पाहणी 2023 ची सुरुवात तारीख 1 जुलै | e pik pahani 2023 start date 1july