Akbar and Birbal Short Story in Marathi बिरबलाच्या चातुर्यामुळे दरबारातील इतर मंत्री आणि सदस्य बिरबलाचा द्वेष करीत असत. बिरबलाची फजिती करून त्याचे दरबारातील महत्त्व कमी करण्यासाठी दरबारातील अनेक सदस्य आपापल्याला परीने प्रयत्न करील असत. बादशाहकडून कधीकधीत आपली देखील वाह! वाह! व्हावी म्हणून ते कधी बादशहाच्या बेगमाची मदत घेत तर कथी शहज्यादांना भरीस घालीत. (कथा,अकबर आणि बिरबल गोष्टी).
एके दिवशी बिरबलाचा द्वेष करणाऱ्या काही लोकांनी शह शहज्याद्याला भरीस घातले आणि त्याला एक विचित्र मागणी करायला सागितलं.
“मला एक औषध तातडीने घ्यायचे आहे. त्यासाठी बैलाचे दूध लागणार आहे." दरबारात अचानक आलेल्या शहाजाद्याने बादशाहकडे मागणी केली.
दरबारात बिरबल देखील हजर होता.
“मग बिरबल मला कधी आणून देशील?" शहाजाद्याने लगेच बैलाचे दूध आणण्याची कामगिरी बिरवलवर सोपविली.
"खाविंद, तुम्हाला औषध घेण्यासाठी बैलाचे दूध नक्कीच आणून देईल, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल," बिरबलाने बादशाहला सांगितले.
आता बिरबलला बैलाचे दूध आणणे काही शक्य होणार नाही. त्यामुळे बिरबलची चांगली फजिती हाणार म्हणून दरबारातील बहूतक सर्व जण खूप खुशीत होते.
इकडे बिरबलने मात्र योग्य प्रकारे तयारी कली होती. आपल्या बायकोला मध्यरात्री धुणं धुण्यासाठी नदीवर यायला सांगितले. अशा वेळी कोणी काही प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायच हेही तिला सांगून ठेवले.
बिरबलाने सांगितल्याप्रमाणे बिरबलाची बायको आपल्या दासीला घेऊन कापडाचे गाठोडे घेऊन मध्यरात्री नदीवर गेली आणि जोरजोरात खडकावर कपडे आपटून धुवायला लागली.
इकडे बिरबलने गप्पा मारीत मारीत बादशहा आणि शहजाद्याला सोबत घेतले आणि नदीच्या दिशने फिरायला निघाला. अपरात्री कपडे धुण्याचा आवाज ऐकल्यावर बादशहाला आश्चर्य वाटले. हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी ता बिरबलाला घऊन तिथे गेला.
“बाई, तू एवढ्या अपरात्री का कपडे धूत आहस?" बादशहाने विचारले.
“या माझ्या मालकीण आहेत आणि मी त्यांची दासी आहे." बिरबलच्या बायकोची दासी बादशहाला उत्तर देत होती, "माझ्या मालकिणीचा नवरा बाळंत झाला असून त्याला मुलगा झाला आहे. नवऱ्याचे आणि त्याच्या बाळाचे करायला मालकिणीला दिवस पुरत नाही. शिवाय उगीच लोकांत चर्चा नका म्हणून माझी मालकीण रात्रीच्या वळी कपडे घेऊन नदीवर आली आहे.”
“बाईचा नवरा?” शहाजादा मध्येच बोलू लागला, “पुरुषाला कसे काय मूल होईल?”
“न व्हायला काय झाले?" बिरबलची दासी उत्तर देत होती, “या बादशहाच्या नगरीत काय होईल याचा नेम नाही. इथं बैल दूध द्यायला लागले आहेत आणि नवरे बाळंत व्हायला लागलेत."
दासीने दिलेले उत्तर ऐकताच बादशहा आणि शहजादा दोघेही वरमले. आपण बैलाच्या दुधाची मागणी केल्यामुळेच बिरबलने हा प्रसंग घडवून आणला हे न कळण्याइतके दोघेही खुळे नव्हते. त्यामुळे पुढे कधीही त्यांनी बिरबलकडे बैलाची दुधाची मागणी केली नाही. (अकबर बिरबल कथा).
बिरबलाचे चातुर्य:
बैलाचे दूध मागितल्यावर बिरबलाने पुरुषाला मूल झाल्याची युक्ती केली. एक अशक्य गोष्ट समजून देण्यासाठी त्याने दुसऱ्या अशक्य गोष्टीचा आधार घेतला. (Akbar and Birbal Short Story in Marathi).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• विद्वान कोण? Akbar and Birbal Story in Marathi
• लहान रेषा Akbar and Birbal Story in Marathi
0 टिप्पण्या