Akbar and Birbal Story in Marathi अकबर बादशहाच्या दरबारात दररोज देश विदेशातील विद्वान हजेरी लावत असत. आपली बुद्धिमत्ता बादशहाला दाखवून त्या बदल्यात बक्षिसे आणि प्रसिद्धी मिळविणे केवळ हाच त्यांचा उद्देश होता. (अकबर बिरबल कथा).

अकबर बिरबल मराठी गोष्टी Akbar and Birbal Story in Marathi | अकबर बिरबल कथा | छान छान गोष्टी | akbar birbal ghost marathi

एके दिवशी असाच बादशहाचा दरबार भरला असता एक विद्वान तिथे आला. बादशहाला मुजरा करून त्यानं आपली ओळख करून दिली.

मंत्रीकडून त्याचा योग्य प्रकारे सन्मान झाल्यावर त्याला दरबारात येण्याचे कारण विचारले.

विद्वान व्यक्ती म्हणाला, “महाराज, मी आपल्या राज्यातील विद्वानांची कीर्ती ऐकून इथं आलो आहे. मी आपल्या दरबारातील विद्वानांना दोन प्रश्न विचारणार आहे. जो कोणी या दोन प्रश्नांची उत्तरे बरोबर देईल तर मी त्याला माझ्या हातातील सोन्याचं कडे भेट म्हणून देईल आणि कुणीही उत्तर नाही देऊ शकले तर माझी आपल्या दरबारात 'विद्वान' म्हणून नेमणूक करावी.'

त्या विद्वानाची अशा प्रकारची भाषा ऐकताच बादशहाला मनोमनी असू आले. त्या विद्वानालाही एक संधी मिळायला हवी या विचाराने बादशहा म्हणाला, "आम्हाला मान्य आहे. विचारा तुमचे प्रश्न."



राजाच्या परवानगीने त्या विद्वानाला आनंद झाला. त्याचा चेहरा खुलला. बादशाहला पुन्हा मुजरा करून त्याने त्याचे सान्याच कडं सर्व दरबाराला दाखवीत तो म्हणाला,

'माझा पहिला प्रश्‍न असा आहे.

'मी प्रत्येक ठिकाणी आहे तरी माझ राहण्याच नमकं ठिकाण नाही. जिथ कुणालाही प्रवेश मिळत नाही, अशा सर्व ठिकाणी मी फिरु शकतो. आकाश, सागर, धरती सर्वत्र माझा संचार आहे, मला काणी पाहू शकत नाही, मला पकडू शकत नाही तरी माझ्यावाचून सवं जगाच अडते असा मी कोण आहे?

प्रश्न तसा अवघड होता. सर्व दरबार एकमेकांकडे पाहायला लागले. दरबारात पसरलेली शांतता पाहन तो विद्वान हातातील कडे दाखवू लागला. आपल्या प्रश्नाचं उत्तर देणारा काणीच नाही अस पाहून तो आनंदाने उड्या मारीत असतानाच बिरबल उठला आणि म्हणाला, 'महाराज, या प्रश्नाचे उत्तर वारा आहे.'

बादशहाने त्या विद्वानाकडे पाहिले. त्यान हे उत्तर बरोबर असल्याचे सांगितले. आता दुसरा प्रश्न विचारण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तो दरबाबला उद्देशाने म्हणाला, “पहिल्या प्रश्नाहून माझा दुसरा प्रश्न खूप अवघड आहे. तो प्रश्न असा आहे,"

'मी प्रत्येकात असतो. माझ्याशिवाय कुणी जिवंत राहू शकत नाही. मी अमर्यादित आहे. तरीसुद्धा मी एका ठिकाणी अडकून पडलो आहे. मला माझ्या मित्राने मदत केल्याशिवाय मी बाहर पडू शकत नाही, असा मी कोण आहे?'

हा प्रश्‍न ऐकताच दरबारात पुन्हा शांतता पसरली. त्या विद्वानाने दरबारावर नजर फिरवली. मोठी शांतता पाहून, आपल्या प्रश्नाचं उत्तर काणीही देऊ शकणार नाही, याबद्दल त्याची आता खात्री पटायला लागली होती. हातातली कडे दाखवून तो बिरबलाकडे मिश्किलपणे हसुन पाहू लागला. तोच बिरबल उठून म्हणाला, 'महाराज, या प्रश्नाच उत्तर आहे मन”.

हे उत्तर बरोबरच होते. बादशहाने त्या विद्वानाकडे पुन्हा पाहिले. त्याने हे उत्तर बरोबर असल्याचे सांगितले. विद्वान देखील खूप आनंदी झाला आणि बादशहाला पुन्हा एकदा मुजरा करुन म्हणाला, 'महाराज, मला माझ्या दोन्ही प्रश्‍नाची अचूक उत्तर मिळाली आहेत. खरोखरच तुमच्या दरबारात विद्वान आहेत.' असं म्हणून त्याने आपल्या हातातील कडे काढून बिरवलाला दिले आणि दरबाराचा निरोप घेतला. (
अकबर बिरबल मराठी गोष्टी).

बिरबलाचे चातुर्य:

स्वतःला सर्वश्रेष्ठ विद्वान समजणाऱ्या व्यक्तीने दरबारात विचारलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे खरं तर त्याच्या प्रश्नातच दडलेली होती. बिरबलाने आपल्या सामान्य ज्ञानाच्या आधारे त्या प्रश्नांची उत्तरे जास्त विचार न करता सहज दिली. कारण वारा आणि मन यांच्या चंचलतेबाबत बहुतेक जणांना माहिती असते. (Akbar and Birbal Story in Marathi).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

लहान रेषा Akbar and Birbal Story in Marathi

समुद्राचे लग्न Birbal Story in Marathi

बिरबलची खिचडी Akbar Birbal Khichdi Story in Marathi

जादूची काठी Akbar Birbal Story Marathi