
असेच एकदा यमुना नदीच्याच्या पात्रातून चालत असताना बिरबलाची गंमत करण्याचा विचार बादशहाच्या मनात आला. बादशहाने आपल्या हातातील काठीने नदी पात्रातील ओल्या वाळूवर एक रेषा काढली. नंतर बिरबलाला म्हणाला, “बिरबल, आता या रेषेला अजिबात धक्का न लावता ही रेषा लहान करून दाखवं.'
आज आपण खरोखरच बिरबलाला अडचणीत आणणारी समस्या निर्माण केली म्हणून बादशहा खुश झाला. बिरबलाला हे उत्तर काही केल्या येणार नाही म्हणून बादशहा बिरबलाकडे पाहून हसत होता.
बिरबल मात्र शांत होता. त्याने थोडा वेळ विचार केला आणि बादशहाच्या हातातील काठी घेतली. त्याच काठीच्या साहाय्याने बिरबलाने बादशहाने काढलेल्या रेषच्या शेजारी दुसरी एक रेषा काढली. ही रेषा बादशहाने काढलेल्या रेषवरून मोठी असल्यामुळे धक्का न लावता बादशहाने काढलेली रेषा लहान झाली.
बिरबलाने वापरलेली ही युक्ती पाहून बादशहाला आपला पराभव मान्य करावा लागला. बिरबलाला हरविणे इतके सोपं नाही, याची बादशहाला खात्री पटली. (अकबर बिरबल मराठी गोष्टी).
बिरबलाचे चातुर्य:
कोणतीही वस्तू ही दुसऱ्या वस्तूपेक्षा कमी-जास्त किंवा लहान मोठी असते. याच तत्वाचा वापर करून बिरबलाने बादशहाने काढलेल्या रेषेला धक्का न लावता लहान केली. (Akbar and Birbal Story in Marathi).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• समुद्राचे लग्न Birbal Story in Marathi
• बिरबलची खिचडी Akbar Birbal Khichdi Story in Marathi
0 टिप्पण्या