Akbar and Birbal Story Marathi in Marathi बिरबलाच्या हुशारी आणि चातुर्यामुळे बादशहा नेहमीच खुश असायचा. त्याचा बिरबलावर खूप जीव देखील होता. बिरबल बादशहाचा सर्वात आवडता होता तरीही बादशहा तो बादशहाच. कधी कधी काही कारण नसताना तो कुणावरही रागावत असे. बादशहाच्या अशा रागापासून बिरबलची देखील सुटका होत नव्हती. एकदा बादशहा बिरबलावर रागावला आणि बिरबल दरबार सोडून रागाने बादशहाच्या नगरीतून निघून गेला. (अकबर बिरबल कथा).
बिरबल गेल्यावर पहिले काही दिवस बादशहाला काही वाटले नाही, पण नंतर मात्र बादशहाला करमेना. बिरबल नसल्यामुळे दरबारातील चातुर्य आणि हुशारी नाहीशी झाली होती. दरबारातील विनोदाचे वातावरण संपले होतं. दरबाराला पूर्वीची स्थिती प्राप्त करून देण्यासाठी बिरबलला परत बोलावण्याशिवाय बादशहाकडे पर्याय नव्हता. पण बिरबलला बोलावणार कसे? कारण बिरबल गायब झाल्यापासून वेषांतर करून राहत होता. त्याचा शोध घेणं खूपच अवघड होतं. बिरबलाचा शोध घेण्यासाठी काही तरी युक्ती करायला हवी, याबाबत बादशहाला खात्री पटली. युक्तीशिवाय बिरबल परत येणार नाही हे बादशहाला माहीत होतं.
थोडा वेळ विचार केल्यानंतर बादशाहने एक योजना मनाशी आखली. आपल्या सर्व मांडलिक राजांना त्याने एक खलिता पाठविला,
“आम्ही समुद्राचे लग्न काढले आहे. आपल्या दशातील नद्यांना लग्नासाठी पाठवा.'
नद्यांना लग्नासाठी कसे पाठवायचे? या प्रश्नाचे उत्तर फक्त बिरबलच दऊ शकतो. त्यामूळे ज्या राजाकडून उत्तर येईल त्या राजाकडे बिरबल आहे, हे नक्की. आपले खलिते गेल्यापासून कुणाकडून काही उत्तर येते का म्हणून बादशहा वाट पाहत होता.
बरेच दिवस निघून गेले. समुद्राच्या लग्नाची ठरलेली वेळ जवळ येत होती तरी एकही नदी लग्नासाठी आली नव्हती. आता काय करायचं या विचाराने बादशहा चिंतित झाला. बिरवलचा शोध घेण्याचा आपला हा प्रयत्न वाया जाणार की काय याची बादशहाला काळजी वाटू लागली.
बादशहा असा निराश झाला असतानाच, एके दिवशी दरबारात निरोपाचा खलिता आला. बादशहाने तो खलिता वाचला. त्यात लिहिले हाते,
“आपण ठेवलेल्या समुद्राच्या लग्नासाठी आमच्या देशातील नद्या निघाल्या आहेत. वेशीवर त्यांच्या स्वागतासाठी आपल्या शहरातील विहिरींना पाठवा. विहिरी आल्या नाही तर नद्या वशीवरून परत जातील.'
खलिता वाचल्या बरोबर बादशहा खुश झाला. अशी युक्ती फक्त बिरबलच करू शकतो याची खात्री असलेल्या बादशहाने लगेच त्या त्या राजाकडे आपला दूत पाठविला आणि बिरबलाला सन्मानाने आपल्या दरबारात परत आणलं. (अकबर बिरबल मराठी गोष्टी).
बिरबलाचे चातुर्य:
नद्या आपला मार्ग सोडून जाऊ शकत नाहीत. पण त्यांना बोलावले असता न पाठविणे म्हणजे बादशहाच्या आज्ञेचा अनादर करणे. त्यामुळे बिरबलाने इथे विहिरीला स्वागताला बोलावले आहे. बिरबलाच्या तीक्ष्ण बुद्धीला माहित होते की ज्याप्रमाणे, नद्या आपला मार्ग बदलू शकत नाहीत. तशाच विहिरीही आपली जागा सोडू शकत नाहीत. (Akbar and Birbal Story in Marathi).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• बिरबलची खिचडी Akbar Birbal Khichdi Story in Marathi
• जादूची काठी Akbar Birbal Story Marathi
0 टिप्पण्या