Akbar and Birbal Story in Marathi एकदा एक मोठा सावकार एके दिवशी बादशहाच्या दरबारात आला. आदल्या रात्री त्याच्या घरी चोरी झाली होती. तो फार दुःखी होता. आपल्या दुःखाचे कारण बादशहाला सागताना म्हणाला, ''महाराज, काल रात्री माझ्या घरी चोरी झाली. माझी शंभर मोहराची थेली चोरीला गेली. चोर कोणी बाहेरचा नसून आमच्या घरातीलच आहे. माझ्या घरात चार नोकर आहेत. त्याच्यापैकी एकाने चोरी केली असावी, अशी माझी खात्री आहे. कृपा करून, त्यातील नेमका चोर शोधून काढा आणि माझ्या मोहरा मला परत मिळवून द्या.'' (अकबर आणि बिरबल गोष्टी).
दरबारात न्याय मागण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असा बादशहाचा दंडक होता. बादशहाने हे प्रकरण बिरबलाकडे सापविले.
नेमका चोर कोण आहे हे काढण्यासाठी बिरबलाने एक युक्ती केली. बिरबलाने सावकाराच्या घरातील चारही नोकरांना दरबारात बोलावले. इकडे एका सवकाराकडुन आपल्या घरून चार सारख्याच उंचीच्या काठया मागविल्या. सावकाराच्या घरातील प्रत्यक नोकराला एकेक काठी देताना विरबल म्हणाला,
'ही जादूची काठी आहे. ही काठी घेऊन तुम्ही आता आपापल्या घरी जा. उद्या सकाळीच या काठीसह दरबारात या. ज्याने चारी कली असेल त्याची काठी तीन बोटांनी उंच हाईल.'' सर्व नोकर आपापली काठी घेऊन घरी गेले.
बाकीचे तीन नोकर जादूच्या काठीचा विचार करीत नव्हते, कारण चोरी त्यांनी केली नव्हती. पण चवथा चोर ज्याने खरोखरच चोरी केली हाती त्या नोकराला मात्र त्या रात्री झोप येत नव्हती. उद्या आपली काठी खरोखरच तीन बोट वाढली तर आपली चोरी उघडकीस यईल याची त्याला भीती वाटत होती. बराच विचार केल्यावर त्याला एक कल्पना सुचली. आपण चोरी केल्यामुळे आपली काठी तीन बोटे वाढणार आहे, त्यामुळे आपण आपली काठी तीन बोट कापली तर? म्हणजे आपली काठी वाढल्याचं कुणाच्या लक्षात येणार नाही. त्यान लगेच कुऱ्हाड घतली आणि आपली काठी तीन बोट तोडून टाकली. आता. आपण चोरी केल्याचं कुणालाही कळणार नाही अस समजून तो शांतपणे झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी बिरबलाने बोलावल्याप्रमाणे सावकाराच्या घरातील चारही नोकर आपापल्या काट्या घेऊन दरबारात हजर झाले. बिरबलने सर्वांच्या काट्यावरून नजर फिरवली तेव्हा एका नोकराची काठी लांबीला कमी असल्याचे त्याला जाणवले. तोच चोर आहे, हे ओळखणे बिरबलासाठी अवघड नव्हतं. बिरबलाने लगेच त्याला सावकारच्या चोरीबद्दल विचारलं. पकडले गेल्यामुळे त्याने चोरीची कबुली दिली. अशा प्रकारे बादशहाने त्या सावकाराला चोरीला गेलेल्या मोहरा मिळवून दिल्या. (Akbar and Birbal Story in Marathi).
बिरबलाचे चातुर्य:
चोराच्या मनात नेहमी आपण पकडले जाऊ ही भीती असतेच आणि आपण कधीही पकडले जाऊ नये म्हणून तो नेहमी खबरदारी घेत असतो. नेमक्या याच मानसिकतेचा उपयोग करून बिरबलाने चोराला पकडले. (अकबर बिरबल बोधकथा).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• शेरास सव्वाशेर Akbar Birbal Chi Goshta
• बैलाचे दूध Akbar and Birbal Short Story in Marathi
0 टिप्पण्या