Akbar Birbal Short Story in Marathi बादशहाच्या दरबारात कधी कोण येईल आणि काय करील याबत काहीच सागता येत नसे. एकदा असाच एक थापाड्या माणूस बादशहाच्या दरबारात आला. मुळातच तो थापाड्या असल्यामुळे खोट्या गोष्टी रंगवून सांगण्यात आणि त्या खऱ्याच आहेत असे भासविण्याची त्याच्याकडे चांगली कसब होती. त्यामुळे तो खोट बोलतोय हे माहीत असूनही लोक त्याच्या गप्पा एकत असत. कारण त्या मनोरजंक असायच्या. तो गप्पोदास आपल्या थापातून बादशहाची चांगलीच करमणुक केली होती. त्यामुळे बादशहाने त्याला चागले बक्षीस दिलं. (अकबर बिरबल कथा).
आता त्याला चांगली संधीच मिळाली. काही दिवसाच्या अंतराने तो दरबारात यायला लागला. दरबारात आला की गप्पा मारून बादशाहचे मनोरंजन करायचा आणि खुश झालेल्या बादशहाकडून चांगली बिदागी मिळवायचा. कहर म्हणजे तो आपल्या फालतू थापाड्या गप्पासाठी बादशहाचा आणि दरबाराचा कितीही वेळ घ्यायचा. ही गोष्ट बिरबलाला आवडली नाही. या गप्पोदासला चांगला धडा शिकवायचा असा त्यान मनामन निर्णय कला.
बिरबलाच्या अपेक्षप्रमाणे दरबारात अतिशय महत्त्वाचे काम सुरू असताना गप्पोदास आला आणि बादशहाला थापा ऐकवायला लागला. बोलता बोलता तो गप्पीदास बादशहाला म्हणाला,
'महाराज, काल संध्याकाळी जंगलातील पाणवठ्यावर मी एक अनोखा प्रकार पाहिला. एक बकरी वाघाचा कान धरून त्याला फरफटत नेत होती. बिचारा वाघ बकरीला खूपच घाबरला होता....'
गप्पीदासाची ही थाप ऐकताना बादशहा त्यात चांगलाच रंगला होता. ही संधी साधून बिरबल महाराजांना म्हणाला, “जहापनाह, हा प्रकार तर काहीच नाही. मी काल याहून अधिक आश्चर्यकारक प्रकार पाहिला.'
“कोणता तो?' बादशहाने विचारले.
एक शेतकरी आपली म्हैस घेऊन पाणी पाजण्यासाठी पाणवट्यावर गेला होता.' बिरबल सांगू लागला, “त्या पाण्यात एक मगर होती. मगर भुकेली असल्यामुळे तिने शेतकऱ्याचा पाय धरला. शेतकरीही हूशार हाता. मगरीच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यान आपल्या सोबत आलेल्या म्हशीची शेपूट पक्की धरली आणि म्हशीला हाकारले.
त्या शेतकऱ्याला म्हैस पुढे ओढायला लागली तर पाण्यातीली मगर मागे ओढायला लागली. या चढाओढीत शेतकऱ्याच्या शरीराचे दोन भाग झाले. मागचा भाग मगरीसोबत गेला तर पुढचा भाग म्हशीसोबत. योगायोगाने त्यावेळी तिथून एक वैद्यबुवा जात हाते. त्यानी हा प्रसंग पाहिला. लगेच एका बकरीला मारुन त्यांनी बकरीचा अर्धा भाग त्या शेतकऱ्याला जोडला...”
बिरबल अशी गोष्ट सांगण्यात रंगला होता तेव्हा सारा दरबारीही लक्षपूर्वक ऐकत होता.
गप्पीदास मात्र केव्हाच दरबारातून गायब झाला होता. बिरबलाच्या थापापुढे आपला निभाव लागणार नाही, इतके तो नक्कीच कळून चुकला होता. (Akbar Birbal Short Story in Marathi).
बिरबलाचे चातुर्य:
खोटे रंगवून सांगणे ही एक कला असली तरी त्याचा उपयोग मर्यादित आणि वेळ साधून केवळ गरजेपुरती करावा लागतो. हे पटवून देण्यासाठी बिरबल स्वतःच थाप मारायला सुरवात करतो. त्याने केलेल्या या युक्तीमुळे शेवटी थापाड्याला दरबारातून पळ काढावा लागला. (Akbar and Birbal Story in Marathi).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• बैलाचे दूध Akbar and Birbal Short Story in Marathi
• विद्वान कोण? Akbar and Birbal Story in Marathi
0 टिप्पण्या