Akbar Birbal Khichdi Story in Marathi बादशहा कधी कधी खरोखर विचित्रपणे वागायचा. एके दिवशी बादशहा काही कारणामुळे सध्यांकाळच्या वेळी तळ्याच्या काठी गेला होता. थंडीचे दिवस असल्यामुळे तळ्यातील पाणी खूपच थंड झालं होत. अशा गार पाण्यात कुणीही रात्रभर थांबू शकणार नाही. याची बादशहाला खात्री पटली. त्यामुळे या पाण्यात रात्रभर कुणी राहिलं तर त्याला खूप मोठं बक्षीस द्यायला हवं अस बादशहाला वाटलं. (अकबर बिरबल बोधकथा).

अकबर बिरबल मराठी गोष्टी Akbar and Birbal Story in Marathi | अकबर बिरबल कथा | छान छान गोष्टी | akbar birbal ghost marathi | अकबर बिरबल बोधकथा

दुसऱ्याच दिवशी बादशहाने आपल्या राज्यात अशी दवंडी पेटवली की जो कोणी व्यक्ती एक रात्रभर तळ्यातील पाण्यात राहील त्याला बादशहाकडून बक्षीस देण्यात येईल. बादशहाने कितीही     माठं बक्षीस ठेवलं तरी केवळ  बक्षिसाच्या आशेने कुणी आपला जीव धोक्यात घालणार नाही असं बादशहाला वाटले.

बादशहाच्या नगरीत एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत होता. अतिशय वाईट आर्थिक परिस्थितीने तो स्वतःच्या जीवालाच कंटाळला होता. असाही आपल्या जगण्याला काही अर्थ नाही तेव्हा तळ्यातील पाण्यात रात्रभर  थांबण्याचा निर्णय त्याने घेतला. 'मेलो तर ठीक आणि जगलो तर आपली काळजी मिटेल' असं त्याला वाटलं. 

बिचारा गरीब ब्राह्मण रात्रभर तळ्याच्या गार पाण्यात कसाबसा रात्रभर कुडकुडत थांबला. दुसर्‍या दिवशी सकाळीच तो बादशहाच्या दरबारात गेला आणि बक्षिसाची रक्‍कम मागू लागला.

“तुला कुठून तरी उष्णता मिळत असली पाहिजे त्याशिवाय तु त्या पाण्यात रात्रभर थांबू शकला नसतास,'' असं म्हणून बादशहांन त्या गरीब ब्राह्मणाला बक्षीस देण्यास नकार दिला. “रात्रभर माझ्या माहलातील दिव्याकडे पाहत होतास, त्याची उष्णता तुला मिळाली म्हणनच तू इतक्या गार पाण्यात थांबू शकलास,"' असं म्हणून बादशहाने त्या  ब्राह्मणाला बक्षीस न देत दरबारातून हाकलून लावलं.

अशा अन्याय झालेल्या लोकांचा बिरबलवर विश्वास होता. तो ब्राह्मण बिरबलकडे गेला आणि त्याने आपली व्यथा सांगितली. बिरबलने त्याला बक्षीस मिळवून देण्याचे आश्वासन देऊन घरी पाठवलं.


या घटनेला दोन-तीन दिवस झाल्यानंतरची गोष्ट.

बादशहाला दरबारात काही तरी महत्वाचे काम होते,  त्यासाठी तो बिरबलची वाट पाहत होता. दरबारात नेहमी  वेळेवर येणारा बिरबल त्यादिवशी महत्त्वाचे काम असूनही आला नव्हता. बिरबलची बराच वेळ वाट पाहिल्यानंतर बादशहाने आपल्या एका सेवकाला बिरबलला बोलावण्यासाठी पाठविले. थोड्या वेळान सेवक परत आला, पण बिरबल काही आला नाही. बादशहाने सेवकाकडे चौकशी केली तेव्हा सेवक म्हणाला. ''जहापनां, बिरबल म्हणाला, की माझा खिचडी शिजतेय. खिचडी  शिजली की दरबारात येतो."

बराच वेळ गेला तरी बिरबल काही दरबारात आला नाही. बिरबलाला तातडीने बोलावण्यासाठी बादशाहने आपल्या दुसऱ्या एका सेवकाला पाठवले. हा सेवकही थोड्या वेळाने  रिकामा परत आला. बिरबल न येण्याचे कारण बादशाहने विचारले असता, सेवक म्हणाला. ''महाराज, बिरबलची खिचडी अजून शिजली नव्हती,  तो म्हणाला की खिचडी  शिजली की मी खातो आणि दरबारात येतो.''

आता मात्र बादशाहा गोंधळला. बिरबल अशी कोणती खिचडी शिजवत आहे? असा बादशहाला प्रश्न पडला. बिरबलची खिचडी पाहण्यासाठी आपण स्वत: जाण्याचं बादशहाने ठरविले. बादशहाने दरबारातील काही निवडक सेवक घेतले आणि तो बिरबलाच्या घरी गेला.

पाहतो तर काय? बिरबलने तीन उंच बांबू घेऊन त्याची  तिपाई बनवली होती. वरची तिन्ही टोकं एकत्र बांधून बिरबलने त्याला एक मडकं लटकवले होतं. त्या मडक्यात तांदूळ, डाळ आणि पाणी घातलं होत. या मडक्याच्या एकदम तळाशी जमिनीवर बिरबलाने खिचडी शिजवण्यासाठी जाळ केला होता. एक एक लाकडाची काटकी हातात घेऊन बिरबल जाळ लावत होता. हे दृश्य पाहताच बादशहा हसायला लागला. बादशहा बिरबलला  म्हणाला, “बिरबल, अशा प्रकारे कधी तुझी खिचडी शिजेल  का? तुझा जाळ कुठं, तुझं मडकं कुठं? अशान खिचडी  कधीच शिजणार नाही.'

"का नाही शिजणार?' बादशहाने चालवलेल्या मस्करीकडे  अजिबात लक्ष न देता बिरबल गंभीरपणे म्हणाला. ''महाराज, तळ्यात राहणाऱ्या माणसाला जर तुमच्या महालातील दिव्याची उष्णता मिळु शकते तर या बाबूंवरच्या  मडक्याला खाली पेटवलेल्या लाकडाची उष्णता का लागणार नाही? त्या उष्णतेने का बरं खिचडी शिजणार नाही?''

बादशाहला आपली चुक उमगली. आपली चूक लक्षात आणून देण्यासाठीच बिरबलने हा खिचडी शिजविण्याचा  उपाय केल्याचे बादशहाच्या लक्षात आले. काहीही न बोलता तो दरबारी परत गेला आणि रात्रभर तळ्यात पाण्यात उभं राहणाऱ्या ब्रह्मणाला बोलावलं आणि त्याला ठरल्याप्रमाणे बक्षीस दिले. (Akbar Birbal Khichdi Story in Marathi).

बिरबलाचे चातुर्य:

आगीमुळे माणसाला उष्णता मिळते हे खरे. पण अग्नीमुळे उष्णता किती अंतरावर मिळू शकते हे ठरलेले आहे. हे पटवून देण्यासाठी बिरबलाने ही युक्ती केली. (Akbar and Birbal Story in Marathi).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

 जादूची काठी Akbar Birbal Story Marathi

 शेरास सव्वाशेर Akbar Birbal Chi Goshta

 बैलाचे दूध Akbar and Birbal Short Story in Marathi

विद्वान कोण? Akbar and Birbal Story in Marathi