Sant Bahinabai Information in Marathi स्त्री संत मालिकेतील प्रसिद्ध संत मुक्ताबाई, जनाबाई, वेणाबाई, अक्काबाई, मीराबाई आणि कान्होपात्रा यांसोबतच संत बहिणाबाईंचे स्थान मोलाचे आहे. संत तुकाराम महाराजांच्या समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायामधील स्त्री संत कवी आणि तुकारामांच्या शिष्या म्हणून त्या ओळखल्या जातात. जातीपातींची सर्व बंधने तोडून बहिणाबाईंनी वारकरी समुदायाची ध्वजा फडकवली.
संत बहिणाबाईंचा जन्म वैजापूर तालुक्यातील देवगांव यथे शके १५५१ व इ.स १६२८ मध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव आऊजी कुलकर्णी व आईचे नाव जानकी असे होते. बहिणाबाईंच्या वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी रत्नाकर पाठक नामक तीस वर्षाच्या मुलासोबत तिचा विवाह लावण्यात आला. घरची गरीबी, शिक्षणाचा अभाव तरीही समाधानी वृत्ती असलेली बहिणाबाईला पांडुरंगाची ओढ मनात होती. संत बहिणाबाई लहानपणापासूनच कथा, कीर्तने, भजने यात रमून जायची. बहिणाबाईंना ईश्वर भक्तीची आणि परमार्थाची प्रचंड ओढ होती. (संत बहिणाबाई माहिती मराठी).
संत बहिणाबाई आणि संत तुकाराम महाराज
बहिणाबाईंना तुकोबायांना सद्गुरू करून त्यांचे अनुग्रह आणि आशीर्वाद घ्यायचा होता. यामुळे रात्रंदिवस तुकोबांचे अभंग म्हणत असत. तुकोबारायांनी स्वप्नात येऊन तिला साक्षत दर्शन दिले. असे म्हटले जाते की बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या बारा जन्मांचे स्मरण होते. तेरावा जन्म स्त्रीचा म्हणजे बहिणाबाईंचा होता. त्यांना आपल्या बारा जन्माचे अभंग आपल्या मुलाला सांगितले. अभंग, श्लोक, आरत्या अशा एकूण ७३२ काव्य त्यांनी रचल्या होत्या.
गुरु बोधामुळे संत बहिणाबाईंचे सारे जीवन बदलून गेले. त्यांनी आपले गुरू संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगात वर्णन केली आहे. त्याकाळातील समाजव्यवस्था आणि पुरुषप्रधान संस्कृती यामुळे बहिणाबाईंना खूप त्रास सहन करावा लागला होता.
संत तुकारामांचा दृष्टांत झाल्यामुळे बहिणाबाईंचे आध्यत्मिक जीवन उजळून निघाले. तुकोबांच्या अध्यत्मिक सामर्थ्याचा प्रत्यय त्यांना वेळोवेळी आला होता.
संत बहिणाबाई अभंग
बहिणाबाईंच्या कविता आणि अभंग भक्तीभावाचा उत्स्फूर्त अविष्कार आहे. त्यांच्या अभंगातून तुकारामांच्या चरित्राचे अस्सल दर्शन घडते. बहिणाबाईंनी आपल्या अभंगातून ब्राह्मण कोण? हा विषय मांडून ब्राह्मणांच्या सनातनी वृत्तीवर स्वतः ब्राह्मण असून त्या काळात सडेतोड टीका केली. त्यांचे अभंग सतराव्या शतकातील, पण ते प्रसिद्ध झाले विसाव्या शतकात. त्यांची काव्यशैली साधी सरळ आणि हृदयस्पर्शी आहे. (संत बहिणाबाई अभंग).
संत बहिणाबाईंच्या पूर्वी वारकरी संप्रदायात संत मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई कान्होपात्रा संत मालिकेतील कवयित्रीपेक्षा बहिणाबाईंची कविता परखड होती. (Sant Bahinabai Abhang in Marathi).
संत तुकारामांचा अध्यात्मिक उंची पाहता बहिणाबाईंनी त्यांना गुरू मानणे स्वाभाविक होते. बहिणाबाई स्वतः अध्यात्मिक क्षेत्रात संपन्न झाल्या होत्या. काव्यक्षेत्रात त्यांचे योगदान खूप मौलिक होते. याची साक्ष त्यांचा खालील अभंग देतो.
ज्ञानदेव रचिला पाया | उभारले देवालया ||
नामा तयाचा किंकर | तेणे रचिले आवार ||
जनार्दनी एकनाथ | खांब दिला भागवत ||
तुका झालासे कळस | भजन करा सावकाश ||
बहणे म्हणे फडकती ध्वजा | निरूपण केले ओजा ||
संत बहिणाबाई निबंध
प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकाच वेळी साधून मुक्तपणे जगणाऱ्या योगिनी म्हणजे संत बहिणाबाई होय. त्या वारकरी सांप्रदायातील प्रसिद्ध स्त्री संत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. बहिणाबाईंनी संत तुकारामांना आपले गुरू मानले होते. त्यांना संत तुकारामांचा प्रत्यक्ष लाभला असा उल्लेख त्यांनी रचलेल्या अभंगातून दिसून येतो.
संत बहिणाबाईंचा जन्म इ.स १६२८ साली वेळगंगा नदीच्या काठी वसलेल्या देवगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जानकी व वडिलांचे नाव आऊजी होते. त्यांच्या माहेरचे नाव कुलकर्णी होते. बहिणाबाईंच्या माता-पित्यानी तिचा विवाह वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याच्या गावापासून पाच कोसावर असणाऱ्या ३० वर्षाच्या रत्नाकर पाठक नावाच्या बीजवरांशी केला. त्यांना आधीची दोन मुले होती. (संत बहिणाबाई मराठी निबंध).
देवभक्तीची लहानपासूनच ओढ असलेल्या बहिणाबाईंनी भजने, कीर्तने ऐकण्याची फार आवड होती.शेतात काम करताना त्यांची भक्ती अभंगच्या रुपात त्यांच्या मुखातून बाहेर पडत असे.
सूक्ष्म निरीक्षण, जीवनातील सुख दुःखाला सामन भावनेने पाहणारी बुद्धी, जगण्यातून कळालेले तत्वज्ञान, ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. शिक्षणाचा अभाव आणि घरातील गरिबी असूनही त्या समाधानी वृत्तीने राहिल्या. त्यांच्या काव्यसंग्रहातून भक्तीभावाचा बोध होतो. (Sant Bahinabai Essay in Marathi).
संत बहिणाबाई आणि निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी
या वेगवेगळ्या आहेत हे आपल्यापैकी फार कमी लोकांना माहीत असेल. सतराव्या शतकातील संत तुकारामांच्या शिष्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत बहिणाबाई आणि एकोणीसाव्या शतकातील बहिणाबाई चौधरी या दोन्ही कवयित्रींचा कालखंड, परिस्थिती वेगवेगळी असली तरी अनुभूतीमुळे त्यांच्यात काही साम्य आढळते. त्यांनी गाठलेली अध्यात्मिक उंची, संसाराचा गाडा ओढताना त्यातूनच आपला आनंद शोधणे, अशा अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीत समान आहेत. या दोन्ही बहिणाबाई तेजस्वी तारका आजही आपल्या तेजाने तळपत आहेत. (Sant Bahinabai Chaudhari Information in Marathi).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• माझा आवडता संत निबंध (संत तुकाराम)
• डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती
0 टिप्पण्या